महाराष्ट्र आरोग्य विभाग अंतर्गत ऑनलाइन अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे अपलोड करायची?

Arogya Vibhag Registration Process 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
302

Arogya Vibhag Registration Process 2023

Arogya Vibhag Registration Process 2023: Maharashtra Arogya Vibhag Online Application Process is started. Under this recruitment, Group ‘C’ cadre includes posts such as nurses, laboratory technicians, health care workers, clerical, typist, driver etc. While Group ‘D’ cadre includes the posts like constable, sweeper, chamber servant. The online application process for this recruitment is starting on 29 August 2023 from 3 PM and the last date to apply is 18 September 2023. Many Candidtaes who are new to this exam must Know How To Apply For Maharashtra Arogya Vibhag Group C And Group D Exam. Here we are giving you step  by step Arogya Vibhag Application Process 2023 so that you can apply for arogya Vibhag Exam 2023 without Any Mistake. Check How To Apply For Arogya Vibhag Exam 2023, Which Documents are required for Maharashtra Arogya Vibhag Application Process and other details at below. Further details about Arogya Vibhag Registration Process 2023 are as given below

महाराष्ट्र आरोग्य विभाग ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत, गट ‘क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवा कर्मचारी, लिपिक, टायपिस्ट, चालक इत्यादी पदांचा समावेश आहे. तर गट ‘ड’ संवर्गात हवालदार, सफाई कर्मचारी, कक्ष सेवक या पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३ पासून सुरू होत आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे. या परीक्षेसाठी नवीन असलेल्या अनेक उमेदवारांना महाराष्ट्र आरोग्य विभाग गट क आणि गट ड परीक्षेसाठी अर्ज कसा करावा हे माहित असणे आवश्यक आहे. . येथे आम्‍ही तुम्‍हाला चरण-दर-चरण आरोग्य विभाग अर्ज प्रक्रिया २०२३ देत आहोत जेणेकरून तुम्‍ही कोणतीही चूक न करता आरोग्‍यविभाग परीक्षा २०२३ साठी अर्ज करू शकता. आरोग्य विभाग परीक्षा 2023 साठी अर्ज कसा करावा, महाराष्ट्र आरोग्य विभाग अर्ज प्रक्रियेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि इतर तपशील खाली तपासा..

Documents Required For Arogya Vibhag Exam 2023 – आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी

अर्ज भरताना वरील सर्व (मुळ प्रमाणपत्रांच्या / कागदपत्रांच्या) प्रती उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

  • शैक्षणिक/व्यावसायिक/तांत्रिक अर्हता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
  • पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाणपत्र / शारिरीक क्षमता
  • जातीचा दाखला
  • वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परिक्षेचे प्रमाणपत्र.
  • उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमिलेअर) सक्षम अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र. महाराष्ट्राचे (डोमेसाईल्ड) रहिवासी प्रमाणपत्र.
  • जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक.
  • प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अंशकालीन/अतिउच्च क्रिडा प्राविण्य गुणवत्ता धारण खेळाडू प्रमाणपत्र / स्वातंत्रय
  • सैनिक नामनिर्देशित पाल्य असल्यास उमेदवारांचे नावे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र.
  • दिव्यांग उमेदवारांचे बाबत जिल्हा शल्य चिकित्सक/वैदयकिय मंडळाचे किमान ४० टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
  • अनाथ असल्याबाबतचे सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र.
  • शासकीय/निमशासकीय कर्मचा-याने त्यांचे अर्ज त्यांच्या विभाग प्रमुखांच्या परवानगीने भरला असल्यास अशा परवानगीचे पत्र.
  • आत्महत्या ग्रस्त शेतकरी यांचे पाल्य असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र.
  • ईडब्ल्यूएस दाखला
  • इतर आवश्यक ती कागदपत्रे.
 

अर्ज करण्याची पध्दत :- Arogya Vibhag Application Procedure

१ प्रस्तुत परिक्षेसाठी सरळसेवा भरती प्रकियेसंदर्भातील सविस्तर जाहिरात आरोग्य विभागाच्या http://arogya.maharashtra.gov.in या संकतेस्थळावर पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंकवर उपलब्ध असून उमेदवारांनी या संकेतस्थळावर अचूक माहिती काळजीपूर्वक पध्दतीने ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
२ परीक्षेसाठी विहित नमुन्यामध्ये उपरोक्त नमूद संकेतस्थळावरीलच ऑनलाईन पध्दतीने सादर केलेलेच अर्ज व परिक्षा शुल्क स्वीकारण्यात येतील

३ इतर कोणत्याही माध्यमाव्दारे अर्ज अथवा शुल्क स्वीकारले जाणार नाही. यापूर्वी आरोग्य विभागाकडे नोकरीकरीता केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जाची प्रत कोणत्याही कार्यालयास समक्ष, ईमेलव्दारे, पोस्टाने पाठवू नये. परिक्षा हॉल तिकीट / वेळापत्रक / परिक्षा केंद्र / निकाल / प्रतीक्षा यादी / आवश्यक कागदपत्र पडताळणी / नियुक्ती आदेश यासंबधीची माहिती फक्त एसएमएस / ई-मेलद्वारे कळविली जाईल. यासंबधात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
४ सदर संकेत स्थळावर प्रस्तुत जाहिरात संदर्भातील भरती प्रक्रिये दरम्यान विभागामार्फत प्रसिध्द केल्या जाणा-या संकेतस्थळाला उमेदवाराने वेळोवेळी भेट देणे व भरतीप्रक्रियेसंदर्भात अदययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची असेल.
५. उमेदवारांनी वेबआधारित ऑनलाईन अर्ज http://arogya.maharashtra.gov.in, या संकतेस्थळावर पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंकवर दिनांक २९/८/२०२३ (दुपारी ०३.०० वाजल्यापासून) ते दिनांक १८/९/२०२३ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत) या कालावधीतच सादर करणे आवश्यक राहील.
६ अर्ज सादर करताना माध्यामिक शालांत प्रमाणपत्रावर असलेल्या नावाप्रमाणेच नोंदणी करणे आवश्यक आहे.

७ ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग केंद्र महाराष्ट्र शासन, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालये, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अथवा अन्य शासकीय कार्यालयात नाव नोंदणी केली असेल त्यांनी देखील ते इच्छुक व पात्र असल्यास विहित नमून्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
८ उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाब आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुचित माध्यमाचा अवलंब केल्याचे किंवा तोतया व्यक्तीची व्यवस्था आढळल्यास किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांने चुकीची माहिती दिल्याचे तसेच प्रमाणपत्र / कागदपत्रे कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याची / तिची निवड रद्दबातल करण्यात येईल. तसेच नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.

९ उमेदवारांना परिक्षेसाठी नियोजित स्थळी व वेळी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
१० शासकीय / निमशासकीय कर्मचा-यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिका-यांची परवानगी घेऊन तसा अर्ज करावा. निवड झालेल्या उमेदवारांना सदर पत्राची प्रत उमेदवारांची निवड झाल्यास प्रमाणपत्र तपासणीवेळी सादर करावी लागेल.
११ ऑनलाईन पध्दतीने अर्ज करताना खालील शैक्षणिक अथवा अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक राहील. ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण अचूक माहिती भरणे आवश्यक राहील. सदर अर्ज भरताना माहिती अपूर्ण असल्यास अथवा चुकीची असल्यास अर्जामध्ये राहिलेल्या त्रुटीसंदर्भात कोणतेही निवेदन स्वीकारले जाणार नाही. याकरीता उमेदवाराने अर्ज परिपूर्ण व योग्य रित्या भरण्याची संपूर्ण जबाबदारी ही उमेदवाराची राहील. निवडीच्या कोणत्याही टप्यावर अर्जातील माहिती चुकीची आढळल्यास परिक्षेला उमेदवाराची निवड रदद करणे याचे संपूर्ण अधिकार सार्वजनिक आरोग्य विभागास राहील. बसून देणे,
एक) प्रोफाईलव्दारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा
12 दावा करणा-या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे पीडीएफ फाईल फॉरमॅट मध्ये संलग्न Upload अपलोड करावीत.

दोन) विविध सामाजिक व समातंर आरक्षणाचा दावा करणा-या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे/ प्रमाणपत्रे (लागू असलेली) संलग्न Upload करणे अनिवार्य आहे.

१२ अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परिक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
१३ परिक्षेची तारीख व रुपरेषा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या http://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
१४ परिक्षेतील गुणानुक्रम व आरक्षण विचारात घेऊन निवड झालेल्या उमेदवारांची नावे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या http://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
१५ जाहिरातीतील कोणतेही मुद्दे शासन निर्णयाच्या विसंगत असल्यास, शासन निर्णय अंतिम राहिल.
१६ नैसर्गिक आपत्तीमुळे व अन्य कारणामुळे विहित दिनांकास परीक्षा घेणे शक्य नसेल तर शासन ठरवून देईल, त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल. याबाबत सर्व उमेदवारांना वर्तमानपत्रातील जाहिरातीव्दारे अथवा आरोग्य विभागाचे http://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन कळविण्यात येईल.

केंद्र निवड :- How To Select Exam Center For Arogya Vibhag

१. केंद्र निवडीचा पर्याय नसून ज्या जिल्हयाच्या पदांकरीता अर्ज केला आहे त्याच जिल्हयात परिक्षा आयोजित करण्याचा प्रयत्न राहील. परिक्षा केंद्राबाबतची माहिती प्रवेश पत्रावर देण्यात येईल.

२. जिल्हा केंद्र अथवा उपकेंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य करण्यात येणार नाही.

 

Educational/Professional/Technical Qualification Certificates and Mark Sheets. Experience Certificate / Physical Ability as per post requirement Caste certificate School Leaving Certificate / Birth Certificate or Secondary School Examination Certificate as proof of age. Certificate from Competent Officer of Non-Criminal (Non-Criminal) Maharashtra (Domestic) Resident Certificate. Registration No. if registered with District Employment and Self Employment Office. Project Affected/Earthquake Affected/Part Time/Extreme Sports Proficiency Quality Holding Athlete Certificate / Independence Names of candidates Certificate issued by Competent Authority if Soldier Nominated Child. In respect of candidates with disabilities, a certificate from the District Surgeon/Medical Board that at least 40% of the disabled are disabled. Certificate of Orphan from Competent Authority. Letter of such permission if Government/Semi-Government employees have filled their application form with the permission of their Head of Department. Certificate issued by competent authority in case of child of suicide victim. EWS certificate Other required documents.

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी


👉या भरती परीक्षेबाबत पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा

👉आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३

👉आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम