मुदतवाढ – आरोग्य विभागामध्ये 1,729 पदांची मेगा भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

Arogya Vibhag Recruitment 2024

  • पदसंख्या: 1729
  • शेवटची तारीख: 15/02/2024
10,265

Arogya Vibhag Recruitment 2024

महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी गट-अ” पदांच्या एकूण 1729 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 18 फेब्रुवारी 2024 आहे.

 

मुदतवाढ - आरोग्य विभागामध्ये 1,729 पदांची मेगा भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

 

 

एकूण जागा : 1729

पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी गट-अ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

मुदतवाढ - आरोग्य विभागामध्ये 1,729 पदांची मेगा भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 01 फेब्रुवारी 2024

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 18 फेब्रुवारी 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 01 फेब्रुवारी 2024 पासुन सुरु होतील)  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Arogya Vibhag Recruitment 2024

 

मुदतवाढ - आरोग्य विभागामध्ये 1,729 पदांची मेगा भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

 

 

मूर्तिजापूर गाव-खेड्यांमध्ये ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, आयुर्वेदिक रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, परिचर, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषधी निर्माता आदींवर असते; परंतु मूर्तिजापूर तालुक्यात शासकीय आरोग्य यंत्रणेच्या रुग्णालयामध्ये तब्बल ६० अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये कमालीची नाराजी वाढत आहे. 

 

मूर्तिजापूर तालुक्यातील खेडे भागात रुग्णांच्या सेवेसाठी शासनाची चार प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि काही आयुर्वेदिक रुग्णालय आहेत. आधीच शासनाने शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे आदी दवाखान्यामध्ये पदभरती करताना लोकसंख्येच्या तुलनेत कमी पदांना मंजरी दिली आहे.

मूर्तिजापूर तालुका

  • १४७ एकूण गावे
  • १,७४,६५० लोकसंख्या
  • ८९,६८९ पुरुष
  • ८४,९६१ स्त्रिया

तालुक्यातील आरोग्य केंद्रात एकूण १९० पदे मंजूर असून, १३० पदे भरलेली आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे.

चालकाचे पद रिक्त म्हणून…

वाहन चालकाचे पद रिक्त असल्यामुळे रुग्णालयाकडे वाहन असूनही निकडीचा प्रसंग उद्भवल्यास गरजू रुग्णांना इतरत्र हलविणे कठीण जात आहे, त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दड सहन करीत खासगी वाहनातून व खासगी रुग्णवाहिकेतून शहरातील रुग्णालय गाठवे लागते

रिक्त पदे भरण्याची मागणी
मूर्तिजापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेत रिक्त असलेल्या विविध पदांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांची चांगली होरपळ होत आहे. शासनाने तालुक्यातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावी, अशी मागणी होत आहे.

 

 

मुदतवाढ - आरोग्य विभागामध्ये 1,729 पदांची मेगा भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

 

 

 

मुदतवाढ - आरोग्य विभागामध्ये 1,729 पदांची मेगा भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

App Download Link : Download App

 

 

 

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

 


आरोग्य विभाग गट क व ड सरळसेवा भरती २०२३ कागदपत्र तपासणी जिल्हा / विभाग स्तरावर !

Arogya Vibhag Recruitment 2024

 

आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील परीक्षा राज्यातील २९ जिल्हयामध्ये १०८ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक ३०/११/२०२३ ते ०७/१२/२०२३ व दिनांक १२/१२/२०२३ या तारखांना आयोजित करण्यात आलेली होती. परिक्षा झाल्यानंतर मे. टि.सी.एस.- आय.ओ.एन. यांचेकडून दि.१५-१२-२०२३ पासून संबंधित उमेदवाराच्या लॉगिन आय.डी. वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका (Answer Sheet) व उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देण्यात आली होती. उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.१८-१२-२०२३ ते दि. २०-१२-२०२३ या कालावधीत टि.सी.एस. कडून लिंक खुली करून देण्यात आली होती.

 

दर प्राप्त आक्षेपांबाबत टीसीएस कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करणेत येऊन ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप / हरकत समितीमार्फत स्विकृत झालेत त्या पदांच्या अंतिम (Answer Key) उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या (Log in) लॉग इन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. यापुर्वीच प्रसिध्द केल्यानुसार आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली आहे त्या संवर्गासाठी Normalization सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिध्द होईल.

त्यानंतर कार्यालयनिहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिध्द करण्याची कार्यवाही येईल. गुणवत्तेने निवड यादीत स्थान मिळविणा-या सर्व संबंधित उमेदवारांना याव्दारे आगाऊ सूचित करण्यात येते की, त्यांनी कागदपत्रे तपासणीकरिता सोबतच्या तक्त्यातील शैक्षणिक अर्हतेचे व इतर आवश्यक कागदपत्रे मुळ प्रतीसह साक्षाकित प्रती तयार करुन ठेवाव्यात.
उमेदवारांची आवश्यकतेनुसार Bio-metric verification करण्यात येईल. हंगामी फवारणी कर्मचा-यांचे केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेली प्रमाणपत्रे ग्राहय धरण्यात येईल.

कागदपत्र तपासणी जिल्हा / विभाग स्तरावर पडताळणी प्रक्रिया करण्यात येईल.

उमेदवारांचा व शासनाचा अनावश्यक कालापव्यय टाळण्यासाठी या आगाऊ सूचना सर्व उमेदवारांसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे. जाहिरातीमधील नमूद अटी व शर्ती तसेच प्रचलित शासन निर्णयाव्दारे सर्व उमेदवारांची कागदपत्रे तपासणी व त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल.
ज्या उमेदवारांकडे खालील कागदपत्रांपैकी एखादे प्रमाणपत्र उदा. अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी रु.१००/- च्या स्टॅम्प पेपरवर सदरील कागदपत्रे नियुक्तीपासून ०१ महिन्यात सादर करण्यात येईल अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रदद करण्यात येईल तसेच सादर केलेले कोणतेही शैक्षणिक, आरक्षण, अनुभव कागदपत्रे बोगस / बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती आदेश रदद करण्यात येईल. या आशयाचे प्रतिज्ञापत्र कागदपत्रे तपासणीवेळी उमेदवाराने सादर करावयाचे आहे. कोणतेही शैक्षणिक, जात किंवा अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे किंवा बनावट आढळल्यास संबंधित नियुक्ती धारकाची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल व शासन सेवेसाठी कायमचे अपात्र करून फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येईल.

 

 

गट क व ड सरळसेवा भरती २०२३ कागदपत्र तपासणी

 

 


आरोग्य विभागामध्ये २३,११२ पदे रिक्त, आरोग्य विभागात महाभरती प्रक्रिया २०२४!

Arogya Vibhag Recruitment 2024

सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे राज्यातील ग्रामीण भागात सार्वजिनक आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. सर्वच विभागातील सरळसेवा, पदोन्नतीची २३ हजार ११२ पदे रिक्त असल्याने रुग्णांना अपेक्षित असलेली आरोग्य सेवा देण्यात आरोग्य विभागाला अपयश येत आहे. टेक्निशियन नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना महागड्या चाचण्या, तपासण्या खासगी रुग्णालयांतून कराव्या लागतात. अनेक रुग्णालयांत औषधांचा तुटवडा जाणवतो. राज्यात विशेषत: ग्रामीण भागात जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून फार्मासिस्ट, टेक्निशियन, वेगवेगळ्या चाचण्यांच्या तपासणीसाठी आवश्यक असलेले लॅबचे कर्मचारी अपुरे आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत, ग्रामीण रुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी असूनही रुग्णांना खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यास भाग पाडतात. केवळ एका वैद्यकीय अधिकाऱ्याला वाढत्या रुग्णसेवेचा ताण पडतो.

सार्वजनिक आरोग्य विभागात ‘अ’ गटातील क्लासवनची सरळसेवेची २५४४ पदे तर पदोन्नतीची १११३ तर ‘ब’ गटाची सरळसेवेची ९११ आणि पदोन्नतीची १८५ पदे रिक्त आहेत. शिवाय वैद्यकीय अधिकारी व्यतिरिक्त असलेली ११ हजार ६७९ सर्वाधिक पदे रिक्त असल्याने आरोग्य विभाग ‘ऑक्सिजन’वर आहे. या व्यतिरिक्त आरोग्यसेवक, आशा सेविका या ग्रामीणमध्ये आरोग्य विभागाचा ‘कणा’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांचीही संख्या अपुरी असल्याने गावपातळीवर त्याचा परिणाम दिसून येतो. सरकारी योजना खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर खरंच पोहचतात का? हा देखील संशोधनाचा भाग ठरतो. माता व अर्भक मृत्यू दर घटविण्याच्या दृष्टीने माता व बालक यांचे आरोग्य सुधारणे, पायाभूत सेवा व कर्मचारी दोन्ही दृष्टीने दुय्यम पातळीवर रुग्णालय सेवा सुधारणे, राज्यातील आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका व इतर निम्न वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कौशल्ये व ज्ञान अद्ययावत करून त्यांना प्रशिक्षित करण्याची गरज असते. मात्र रिक्त पदांमुळे या सेवा रुग्णांपर्यंत पोहोचत नाहीत.

आरोग्य संस्थांच्या इमारतींची देखभाल व दुरूस्ती नसल्याने रुग्णालय, केंद्रांची दुरवस्था झालेली आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा विभाग १८११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १०५८० उपकेंद्रे, आणि ३७ आश्रम शाळांद्वारे राज्यातील ग्रामीण जनतेला प्राथमिक आरोग्य सेवा पुरवीत आहे. उपकेंद्रांमध्ये प्रसूतीपूर्व तपासणी, किरकोळ आजारांवर उपचार, माता आणि बाल आरोग्य सेवा, संशयित क्षय, हिवताप, आणि कुष्ठरुग्णांची तपासणी अशा आरोग्य सेवा पुरविल्या जातात. मात्र वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून दोनवेळाच येत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे. पथक येणार असल्याची माहिती मिळताच मात्र अधिकारी न चुकता हजर राहतात. इतरवेळी मात्र कर्मचाऱ्यांवरच केंद्र सुरु असते.

अतिदक्षता विभाग, विशेष नवजात दक्षता विभाग, जळीत विभाग, सी. टी. स्कॅन, सोनोग्राफी सेवा अनेक रुग्णालयात बंद असते. अनेकदा मशीन नादुरुस्त असल्याने रुग्णांना आठ आठ दिवस वाट पाहावी लागते. मशिन आहे तर टेक्निशियन नाही अशीही स्थिती राज्यात जिल्हा आणि सामान्य रुग्णालयांत आहे. राज्यात १०० खाटांची एकूण २८ उपजिल्हा रुग्णालये, ३० खाटांची ३८७ ग्रामीण रुग्णालये मंजूर आहेत. त्यापैकी ३६० ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत. या ग्रामीण रुग्णालयांत एक वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, बालरोगतज्ज्ञ, वैद्यकीय चिकित्सक व भूलतज्ज्ञ यांच्या सारखे तज्ज्ञ रुग्णांना वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

 

 

मुदतवाढ - आरोग्य विभागामध्ये 1,729 पदांची मेगा भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

App Download Link : Download App

 

 

 

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम