आनंदाची बातमी ! आरोग्य विभागात मोठी भरती; ‘या’ संवर्गातील 4751 रिक्त जागा भरल्या जाणार – Arogya Vibhag Recruitment 2023

Arogya Vibhag Recruitment 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
3,302

 

Arogya Vibhag Recruitment 2023

ोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आरोग्य विभागात गट क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीचे आयोजन झाले आहे.राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागातील गट क संवर्गातील 4751 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या अंतर्गत येणारी गट-क परिचर्या, तांत्रिक व अ तांत्रिक संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठीची अधिसूचना निर्गमित झाली असून आता इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर आपला अर्ज यासाठी सादर करायचा आहे. 

कोणत्या आणि किती पदासाठी होणार भरती

  • या पदभरतीच्या माध्यमातून अधिक परिचारिका या पदाच्या एकूण 3974 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 1954 जागा, अनुसूचित जमाती अर्थातच शेड्युल ट्राईब प्रवर्गासाठी 321 जागा, अनुसूचित जाती अर्थातच शेड्युल कास्ट प्रवर्गासाठी 338 जागा आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी उर्वरित जागा राहणार आहेत.
  • तसेच इतर पदांमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक १७० जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ११२, ग्रंथपाल १२, स्वच्छता निरीक्षक ९, ईसीजी तंत्रज्ञ ३६ ,आहारतज्ञ १८ ,औषधनिर्माता १६९ , कॅटलॉग/ ग्रंथसूचीकार १९ , समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) ८६ , ग्रंथालय सहाय्यक १६ , व्यवसायोपचारतज्ञ/ ॲक्युपेशनथेरपीस्ट ७ , दूरध्वनी चालक १७ , महिला अधीक्षिका किंवा वॉर्डन वसतिगृहप्रमुख ०५ , अंधारखोली सहाय्यक १० , किरण सहाय्यक २३, सांख्यिकी सहाय्यक ३ , शिंपी १५ , वाहन चालक 34 , गृहपाल १६ रिक्त जागा यापद्धतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 25 मे 2023 पर्यंत या पदांसाठी इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज विहित कालावधी पूर्वी सादर करणे आवश्यक आहे.

 

 

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

आरोग्य विभाग,

Arogya Vibhag Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम