आरोग्य विभागातील सर्व पदे लवकरच भरणार – आरोग्यमंत्री!!
Arogya Vibhag Recruitment 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Arogya Vibhag Recruitment 2023
Arogya Vibhag Recruitment 2023 :आताच प्राप्त नवीन अपडेट नुसार, राज्य सरकारने राज्यात ७५ हजार नोकर भरतीची घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक पदांच्या जाहिरातीच प्रकाशित झालेल्या नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दोन महिन्यानंतर टप्याटप्प्याने आरोग्य विभागातील सर्व २३,००० हजार रिक्त जागा भरणार असल्याचे सांगितले आहे.
राज्यात पोलिस शिपाई भरती सोडल्यास वर्ग-३ आणि वर्ग-४ पदांच्या पदभरतीच्या कोणत्याच मोठ्या जाहिराती आलेल्या नाहीत. महाराष्ट्रात एकूण रिक्त पदांची संख्या पावणेतीन लाखांच्या आसपास आहे. रिक्त पदे आणि दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पदे रिक्त झाली आहेत, २०१९ च्या निवडणुकीत ७२ हजार पदांची मेगा नोकर भरतीची घोषणा झाली होती.. ती मेगा भरती फोल ठरली. आता पुन्हा अमृत महोत्सवाचे गोंडस नाव देऊन ७५ हजार पदभरतीची घोषणा करून पाच-सहा महिने झाले तरी प्रत्यक्षात जाहिराती आल्याच नाहीत. अशी व्यथा स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी मांडली आहे.
जवळपास तीन वर्षे उलटून गेली तरी जिल्हा परिषद भरतीची परीक्षा झाली नाही. आरोग्य विभागाच्या भरतीचा गोंधळ काही केल्या मिटत नाही. तसेच महसूल, बांधकाम, समाज कल्याण, जलसिंचन या विभागांची तर अजून जाहिरातच नाही. म्हणजे नुसतेच गाजर असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षार्थीनी केला आहे. पुढील महिन्यात संबंधित प्रक्रिया वेगाने सुरू झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही स्पर्धा परीक्षार्थीनी दिला.
- पदाचे नाव: आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आणि लॅब टेक्निशियन आणि अधिक.
- एकूण रिक्त पदे: १०,१२७ पदे
- अधिकृत अधिसूचना जारी करण्याचा कालावधी: ०१ जानेवारी २०२३ – ०७ जानेवारी २०२३
- अर्ज करण्याची तारीख – 8 ते 22 जानेवारी 2023
- परीक्षेची तारीख: 25 मार्च २०२३ आणि 26 मार्च २०२३
- निकाल जाहीर करण्याचा कालावधी: २७ मार्च ते २७ एप्रिल 2023
Maharashtra Arogya Vibhag Mega Bharti 2023
आरोग्य विभागात साडेचार हजार भरती जाहीर
- राज्य सरकारकडून अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने 75 हजार नोकर भरती करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
- त्यामध्ये आरोग्य विभागात साडेचार हजार जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
- पोलिस विभागात 18 हजार जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.
- सध्या त्या संबंधित अर्ज भरती प्रक्रिया सुरू आहे.
- ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेमध्ये जवळपास दहा हजार जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
- लवकरच राज्यात शिक्षक भरती करण्याचा निर्णय राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे. तसेच कौशल्य विकास विभागामार्फत खाजगी कंपन्यांमध्ये एक लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी करार करण्यात आला आहे.
- येणाऱ्या काळात रोजगार मेळावे घेऊन हा रोजगार देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे.
नवीन अपडेट- आरोग्य विभाग पदभरती परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर!! Arogya Vibhag Bharti 2022
Sr. No | Event | Duration | Dates |
1. | Determination of vacancies as per reservation | 2 Months | up to 31st December 2022 |
2. | Advertisement Released Date | 1 Week | 1st to 7th of January 2023 |
3. | Application Starting Dates | 15 Days | 8th to 22nf of January 2023 |
4. | Scrutiny of Application | 1 Week | 23rd to 30th of January 2023 |
5. | List of Eligible Candidates | 3 Days | 31st to 2nd of February 2023 |
6. | Zilla Parishad and Zilla Selection Committee/Board to take action regarding the organization of actual examination | 1 Month | 3rd February to 3rd of March 2023 |
7. | Admit Card for Eligible Candidates | 1 Week | 4th to 11th March 2023 |
8. | Exam Organized (Online/ Offline Mode)
Health Supervisor – (11.00am to 01.00pm) Drug Manufacturer – (3.00pm to 05.00pm) Health Servant (Male), Health Servant – (11.00am to 01.00pm) Laboratory Technician – (03.00pm to 05.00pm) |
2 Days | Health Supervisor, Drug Manufacturer – 25th of March 2023
Health Servant (Male), Health Servant, Laboratory Technician – 26th of March 2023 |
9. | Final Result | 1 Month | 27th March to 27th April 2023 |
Arogya Vibhag Bharti Required Qualification
Those who are well qualified in class 10th or 12th/ /BSc/MSc/B.Pharm/B.Sc.Nursing/ITI/M. Pharm and other relevant fields can apply for the Maharashtra Arogya Bharti 2023.
Name of Posts | Qualifications |
Arogya Sevak | 12th Passed |
Arogya Sevika | 12th Passed + GNM / ANM Course |
Medical Officer | MBBS |
Nursing Tutor | Bsc Nursing |
Supervisor | Graduation |
Technician | Diploma |
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Arogya Vibhag Recruitment 2023,
आरोग्य विभाग
Table of Contents