नवीन अपडेट – ११५०० पदांच्या आरोग्य विभाग भरतीत अपडेट!!

Arogya Vibhag Recruitment 2022

4,284

Arogya Vibhag Bharti 2022 New Update

 

Arogya Vibhag Recruitment 2022: राज्यभरात आरोग्य विभागामध्ये परिचारिकांसह वेगवेगळ्या पदांच्या ११ हजार ५०० जागा रिक्त असून त्याविषयी येत्या सोमवारी अंतिम निर्णय होऊन महिनाभरात पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करीत भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. यासोबतच शिक्षकांच्या रिक्त असलेल्या ५० हजार जागादेखील लवकरच भरल्या जातील, असेही महाजन यांनी सांगितले.

जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त जागांविषयी महाजन यांना विचारले असता त्यांनी संपूर्ण राज्यभरात असलेल्या रिक्त जागांविषयी माहिती देताना सांगितले की, आरोग्य विभागातील ११ हजार ५०० जागा रिक्त आहेत. त्यासाठी ११ लाख अर्ज आले आहेत, मात्र त्याकडे महाविकास आघाडी सरकारने एवढ्या वर्ष लक्ष दिलेच नाही व ही भरती होऊ शकली नसल्याचे ते म्हणाले. मात्र आता या जागा भरण्यासाठी येत्या सोमवारी बैठक घेणार असून संबंधितांना सूचना देऊन त्याचदिवशी माझी त्यावर स्वाक्षरी घेण्याचे कळविले असल्याचे महाजन म्हणाले. महिनाभरात ही भरती प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगितले.

Aarogya Vibhag Bharti 2022

कोविड काळात राज्यात मागील दोन ते अडीच वर्षात कंत्राटी कामगार म्हणून वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना आरोग्य विभागाच्या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी. पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे. यात वैद्यकीय सहायक, आशा वर्कर अंगणवाडी सेविका तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोविड काळात जीवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे.

Arogya Vibhag Bharti 2022

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Arogya Vibhag Recruitment 2022,

आरोग्य विभाग,

आरोग्य विभाग भरतीत अपडेट,

Arogya Vibhag Bharti 2022 New Update

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम