अनुताई वाघ (1910-1992) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १९१० - मृत्यू : १९९२)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
5,304

अनुताई वाघ  या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचे काम केले. पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक यांचेसोबत त्यांनी बालशिक्षणाचे कार्य केले.

अनुताई वाघ (1910-1992) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

अनुताई वाघ
अनुताई वाघ

जन्म : १७ मार्च १९१० (मोरगाव पुणे)

वडील : बालकृष्ण वाघ

आई : यमुनाबाई वाघ

शिक्षण : बी. ए.

जीवन

अनुताईंचे वडील बालकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. वयाच्या तेराव्या वर्षी इ.स. १९२३ साली शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा विवाह झाला. परंतु सहा महिन्यांतच त्यांना वयाच्या तेराव्या वर्षी वैधव्य आले.

असे असूनसुद्धा तत्कालीन सामाजिक रूढींचे बंधन झुगारून त्यांनी शिक्षण घेतले व शिक्षिका म्हणून काम करीत असताना त्यांना ताराबाई मोडक भेटल्या आणि त्यांनी ताराबाईंच्या बोर्डी (ठाणे) येथे आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रात प्रवेश केला व तेथे इ.स. १९४७ ते १९९२ अशी ४७ वर्षे त्यांनी निरपेक्ष वृत्तीने ग्रामशिक्षणाचे कार्य चालवले.

पुढे कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण केंद्राच्या चालक, राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकरिणी सदस्य, अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचे शिक्षणविषयक ग्रंथ इंग्रजी, हिंदी, गुजराथीतून अनुवादित झाले. प्रबोधनासाठी वाहिलेल्या शिक्षणपत्रिका व स्त्रीजागृतीसाठी असलेल्या ‘सावित्री’ मासिकाच्या त्या संपादिका होत्या.

कोसबाडच्या टेकडीवर आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. या संस्थेलाच ‘कोसबाड प्रकल्प’म्हणून ओळखले जाते. आदिवासींच्या शिक्षणासाठी पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका ट्रेनिंग काॅलेज इ. शैक्षणिक संस्था सुरू केल्या.

कार्य :

– बोर्डी (ठाणे) येथे आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रामध्ये १९४७ ते १९९२ अशी ४७ वर्षे निरपेक्ष वृत्तीने ग्रामशिक्षणाचे कार्य केले.

– कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण केंद्राच्या चालक.

– राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकारीणी सदस्य म्हणून कार्य.

– अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणून कार्य.

 

पुस्तके :

१) बालवाडी कशी चालवाव (१९५६)                                                २) कुराणशाळा

३) विकासाच्या मार्गावर                                                                      ४) शिक्षणमित्र माला

५) अजब सातभाई                                                                              ६) आटपाट नगरात

७) सकस आहार गीते                                                                       ८) टिल्लूची करामत

९) कोसबाडच्या टेकडीवरून (१९८०)                                       १०) सहजशिक्षण आणि गुरूमाऊलीचा संदेश

११) दाभणेच्या जंगलात                                                                  १२) विकासवाडी दर्शन नाटक

 

पुरस्कार :

  • १९७२ महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका किताब.
  • १९७५ दलित मित्र किताब.
  • १९७८ इचलकरंजीकचा ‘फाय फाऊंडेशन’ पुरस्कार.
  • १९८० आदर्श माता, सावित्रीबाई फुले, बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार.
  • १९८५ जमनालाल बजाज पुरस्कार
  • १९९२ अशा भोसले पुरस्कार ( दीनानाथ प्रतिष्ठाण)
  • १९८५ पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.
अनुताई वाघ (1910-1992) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
अनुताई वाघ (1910-1992) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
  • मासिके :

शिक्षणपत्रिका – संपादिका                         सावत्री – संपादिका

त्यांच्या विधायक व भरीव कार्याबद्दल त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांपैकी महाराष्ट्र शासनाने १९७२ साली ‘आदर्श शिक्षिका’ व १९७५ साली ‘दलित मित्र’ हे किताब देऊन त्यांचा गौरव केला.

तसेच त्यांना १९७८ साली इचलकरंजीचा ‘फाय फाउंडेशन पुरस्कार’, १९८० साली ‘आदर्श माता’, ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ व ‘बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार’, १९८५ साली ‘जमनालाल बजाज पुरस्कार’, १९९२ साली दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा ‘आशा भोसले पुरस्कार’ तसेच ‘रमाबाई केशव ठाकरे पुरस्कार’ इ. पुरस्कार देऊन विविध संस्थांनी सन्मानित केले. १९८५ साली केंद्र शासनाने ‘पद्मश्री’ किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

त्यांचे बोर्डी येथे अल्प आजाराने निधन झाले.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम