अण्णा हजारे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
जन्म : १५ जून १९३६
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अण्णा हजारे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती (१९३६)
संपूर्ण नाव: किसन बाबूराव हजारे
जन्म : १५ जून १९३६ (भिंगार, अहमदनगर महाराष्ट्र)
निवासस्थान : राळेगणसिद्धी
राष्ट्रीयत्व : भारतीय
टोपणनाव: अण्णा
शिक्षण: सातवी
पेशा : समाजसेवा
कारकिर्दीचा काळ : १९६२-१९७८ (सैन्यदल)
प्रसिद्ध कामे – माहितीचा अधिकार, भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती
कार्यकाळ – १९७८ पासून (समाजसेवक)
वडिल : कै. बाबूराव
आई : कै. लक्ष्मीबाई
बालपण :
किसन हजारेंचा जन्म जून १५, इ.स. १९३७ रोजी भारताच्या मुंबई इलाख्यातील भिंगार मधील खोमणे वाड्यात झाला. हे गाव आता महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यात आहे. हजारेंचे वडील बाबूराव हजारे तेथील आयुर्वेद आश्रम औषधशाळेत मजूर होते. बाबूरावांचे वडील ब्रिटिश फौजेत सैनिक होते. १९४५मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर बाबूरावांनी सुरुवातीला भिंगारमध्येच बस्तान बसवले, पण नंतर १९५२ साली ते राळेगण सिद्धी या आपल्या मूळ गावी परतले.
किसन यांना सहा लहान भावंडे होती व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आत्याने किसनची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्या त्याला मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात मदत व्हावी म्हणून किसनने शिक्षण सोडून नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी सुरुवातीस दादरजवळ फुले विकली व नंतर स्वतःचेच दुकान थाटले व आपल्या दोन भावांना राळेगण सिद्धीहून बोलावले
प्रकाशित साहित्य : माझे गाव माझे तिर्थ (लेखक – अण्णा हजारे)
- भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीय समाजसेवक आहेत.
- १९९० साली समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार.
- १९९२ साली पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित
- ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला.
- माहितीचा अधिकार कायद्यासाठी आंदोलने
- भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलने
- लष्करात असतांना पाच पदके.
लष्करी सेवा :
- १९६२ मध्ये सैन्यात भरती.
- १९६३ मध्ये त्यांना वाहनचालकाचे पद दिले गेले.
- १९७८ मध्ये त्यांनी भारतीय लष्कराचा राजीनामा दिला.
उपोषणे : एकूण १६ उपोषणे, त्यापैकी १३ उपोषणे महाराष्ट्र सरकारच्या विरोधात तर ३ उपोषणे केंद्र सरकारच्या विरोधात.
- १५ वे आणि १६ वे उपोषण हे जनलोकपाल विधेयकासाठी.
- १९८० साली पहिले यशस्वी उपोषण – अहमदनगर जिल्ह्यातील नापासांची शाळा
- १ ते ६ मे १९९४ भ्रष्टाचार विरोधातील उपोषण (पाचवे उपोषण)
- ९ ऑगस्ट २००३ ला उपोषणास सुरूवात – माहितीचा अधिकार कायदा. (नववे उपोषण)
- ९ फेब्रुवारी २००४ ला उपोषणास सुरूवात – माहितीचा अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी (दहावे उपोषण).
- ९ ऑगस्ट २००६ ला उपोषण सुरूवात – माहितीचा अधिकार कायद्यात सुधारणा मान्य नव्हती. (आकरावे उपोषण)
पुरस्कार :
वर्षे | पुरस्काराचे नाव | पुरस्कार देणारी संस्था |
२००७ | जिट गिल मेमोरिअल अवॉर्ड | वल्ड बैंक |
२००५ | मानद डॉक्टरेट | गांधीग्राम रूरल युनिव्हर्सिटी |
२००३ | इंटिग्रिटी पुरस्कार | ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल |
१९९८ | केअर इंटरनॅशनल पुरस्कार | केअर (संस्था) |
१९९७ | महावीर पुरस्कार | – |
१९९६ | शिरोमणी पुरस्कार | – |
१९९२ | पद्मभूषण पुरस्कार | राष्ट्रपती |
१९९० | पद्मश्री पुरस्कार | राष्ट्रपती |
१९८९ | कृषिभूषण पुरस्कार | महाराष्ट्र सरकार |
१९८६ | इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार | भारत सरकार |
२०१५ | मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार | वनराई फाउंडेशन |
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents