Aditya Birla Capital Scholarship | आदित्य बिर्ला कॅपिटल शिष्यवृत्ती 2024-25

Aditya Birla capital scholarship

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख: 25/10/2024
210

नमस्कार मित्रांनो , आज आपण आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप (Aditya Birla capital scholarship) विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला ही स्कॉलरशिप हवी असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात , काय आहे Aditya Birla capital scholarship आणि त्यासाठी काय लागणार आहे, कोण या स्कॉलरशिप साठी पात्र आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही स्कॉलरशिप तुम्हाला कशा प्रकारे मिळू शकते इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

९ वी ते १२ वी व पदवी मध्ये शिकणार्‍या आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा 

आदित्य बिर्ला कॅपिटल शिष्यवृत्ती 2024-25

अदित्य बिर्ला कॅपिटल शिष्यवृत्ती 2024-25 हा एक महत्त्वपूर्ण शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे, जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा आर्थिक भार हलका करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आला आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात सहाय्य करणे, त्यांच्या शिक्षणाच्या दिशेने प्रोत्साहन देणे आणि त्यांची स्वप्ने साकार होण्यासाठी मदत करणे आहे. या लेखाच्या माध्यमातून या शिष्यवृत्तीबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Aditya Birla capital scholarship
Aditya Birla capital scholarship

आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड आणि त्याअंतर्गत समाविष्ट फाउंडेशन कंपन्यांकडून 2024-25 या वर्षात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती प्रोग्राम अर्ज सुरू करण्यात आलेला आहे. संबंधित स्कॉलरशिप प्रोग्राम संपूर्णतः आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या माध्यमातून राबविण्यात येईल.

अदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन (Aditya Birla Capital Foundation) चे  महत्त्वपूर्ण कार्य

अदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन समाजात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवते. आरोग्यसेवा, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि क्रीडा यांसारख्या क्षेत्रांमध्ये हा फाउंडेशन विशेष कामगिरी करत आहे. या उपक्रमामुळे लाखो लोकांना मदत मिळाली आहे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यात फाउंडेशनचे महत्त्वाचे योगदान आहे.

Aditya Birla Capital Scholarship शिष्यवृत्तीचे मुख्य उद्दिष्ट

आदित्य बिर्ला कॅपिटल शिष्यवृत्ती 2024-25 हे कार्यक्रम विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत देते. अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडण्याची वेळ येऊ शकते, परंतु या शिष्यवृत्तीमुळे आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मदत मिळते. शिष्यवृत्ती अंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या तसेच पदवी अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते.

शिष्यवृत्तीची रक्कम आणि उपयोजन

या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक श्रेणीप्रमाणे विविध रक्कम दिली जाते:

  • नववी ते बारावी इयत्ता: रु. 12,000 पर्यंत
  • पदवी(जनरल) अभ्यासक्रम: रु. 18,000 पर्यंत
  • पदवी(प्रोफेशनल) अभ्यासक्रम: रु. 48,000 पर्यंत

विद्यार्थ्यांना दिलेली ही आर्थिक मदत शिक्षण शुल्क, हॉस्टेल शुल्क, पुस्तके, स्टेशनरी, इंटरनेट, ऑनलाईन शिक्षण यांसारख्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी उपयोगी ठरते. आर्थिक मदती सोबतच विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये मदत होईल अशा प्रकारचे मार्गदर्शन देखील दिले जाते. जसे करिअर काउंसलिंग आणि लाईफ स्किल्स सेमिनार.

Aditya Birla Capital Scholarship | आदित्य बिर्ला कॅपिटल शिष्यवृत्ती 2024-25

आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप पात्रता (eligibility)

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील अर्हता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

  1. इयत्ता 9 ते 12 मध्ये शिकणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
  2. अर्जदारांनी त्यांच्या मागील शैक्षणिक वर्षात किमान 60% गुण मिळवलेले असावेत.
  3. अर्जदारांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  4. भारतातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.
  5. अदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड आणि बडी4स्टडीच्या कर्मचाऱ्यांची मुले शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.
  6. विशेषतः मुलींच्या अर्जांना प्राधान्य दिले जाईल, कारण महिलांचे शिक्षण आणि सशक्तीकरण हा ABCF च्या महत्त्वपूर्ण उद्दिष्टांपैकी एक आहे.

Aditya Birla Capital Scholarship शिष्यवृत्तीची निवड प्रक्रिया

शिष्यवृत्तीची निवड प्रक्रिया बहुस्तरीय असून, गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये होते:

  1. प्राथमिक निवड: अर्जदाराच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन प्राथमिक निवड यादी तयार केली जाते.
  2. कागदपत्र पडताळणी: निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची सत्यता पडताळण्यात येते.
  3. फोन मुलाखत: निवड प्रक्रिया अधिक निश्चित करण्यासाठी काही विद्यार्थ्यांची फोनवर मुलाखत घेतली जाते.
  4. शिष्यवृत्ती नियुक्ती: मुलाखतीनंतर अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

हे सुद्धा वाचा : Reliance Foundation Scholarship 2024 : 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये रिलायन्स स्कॉलरशिप मिळणार

ऑनलाइन अर्ज कसा करावा? (ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे)

शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सोपी असून विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करता येतो:

  1. आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  2. वेबसाईट उघडल्यानंतर तुमच्यासमोर Apply Now असा बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करून लॉगिन करून घ्या, तुम्ही रजिस्ट्रेशन केले नसेल तर आधी  रजिस्ट्रेशन करून त्यानंतर लॉगिन करा.
  3. लॉगिन केल्यानंतर बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप 2024-25 चा Application Form तुमच्यासमोर उघडेल. आता स्टार्ट अप्लिकेशन या बटणावर क्लिक करा.
  4. विद्यार्थ्यांचे संपूर्ण माहिती व्यवस्थित व काळजीपूर्वक भरून घ्या. त्यानंतर विचारण्यात आलेली आवश्यक कागदपत्र योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करा.
  5. शेवटच्या टप्प्यात Terms & Conditions यावर टिकमार्क करून तुमच्या अर्जाची एक वेळेस तपासणी करा.
  6. तुमच्याकडून भरण्यात आलेली सर्व माहिती बरोबर असल्यास Submit या बटनावर क्लिक करून तुमचा अंतिम अर्ज दाखल करा.
  7. अशा पद्धतीने तुमचा एप्लीकेशन फॉर्म यशस्वीरित्या पूर्ण भरून झालेला असेल.
  8. भविष्यकाळातील कामासाठी त्या फॉर्मची पीडीएफ किंवा प्रिंट-आऊट काढून तुमच्याजवळ ठेवा.

शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना विद्यार्थ्यांना खालील कागदपत्रे आवश्यक असतात:

  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मागील शैक्षणिक वर्षाची गुणपत्रिका
  • शासकीय ओळखपत्र (जसे की आधार कार्ड, मतदाता ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, पॅन कार्ड)
  • चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश पुरावा (शुल्क पावती, प्रवेश पत्र, संस्थेचे ओळखपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र)
  • अर्जदाराचा किंवा पालकाचा बँक खात्याचा तपशील
  • उत्पन्नाचा पुरावा (ग्रामपंचायत, सरपंच, तहसीलदार इत्यादींनी दिलेला)

शिष्यवृत्तीचे फायदे

आदित्य बिर्ला कॅपिटल शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चाचा ताण कमी होतो आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये सातत्य राखता येते. यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जाऊन शिक्षणात प्रगती करणे शक्य होते.

शिष्यवृत्तीचे अर्ज करण्याची अंतिम तारीख

विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्वरित अर्ज प्रक्रिया पूर्ण करून आपली संधी गमावू नये.

पुढील लिंक वर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा : Apply Now 

९ वी ते १२ वी व पदवी मध्ये शिकणार्‍या आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा 

कोणत्या अभ्यासक्रमाला स्कॉलरशिप मिळणार ते खालील यादी मध्ये पाहू शकता.

S.No. Degree Name Category
1 B.A (Bachelor of Arts) General Graduation
2 B.Com General Graduation
3 B.Com- Travel and Tourism
Management
General Graduation
4 B.Ed General Graduation
5 B.Pharm General Graduation
6 B.Sc General Graduation
7 B.A (Travel and Tourism
Management)
General Graduation
8 Bachelor of Mass
Media(BMM)
General Graduation
9 Bachelors of Languages General Graduation
10 Bachelor of Commerce in
Banking & Insurance
General Graduation
11 Bachelor of Arts (Economics) General Graduation
12 Bachelor of Science
(Statistics)
General Graduation
13 BS MS Integrated General Graduation
14 Bachelor of Social Works Professional Graduation (3 Years)
15 Bachelors of Mass Comm Professional Graduation (3 Years)
16 BBA/ BBM/ BBS Professional Graduation (3 Years)
17 BCA Professional Graduation (3 Years)
18 BHM Hotel Management Professional Graduation (3 Years)
19 B.Sc.(IT) Professional Graduation (3 Years)
20 B.Pharm. Professional Graduation (3 Years)
21 Bachelor of Financial and
Investment Analysis
Professional Graduation (3 Years)
22 Bachelor of Management
Studies
Professional Graduation (3 Years)
23 Bachelor of Business Studies Professional Graduation (3 Years)
24 Bachelor of Accounting and
Finance
Professional Graduation (3 Years)
25 B.Arch Professional Graduation (4 Years)
26 B.Tech/B.E. Professional Graduation (4 Years)
27 B.V.Sc. & A.H. Professional Graduation (4 Years)
28 BA.LLB Bachelor of Law -Integrated Professional Graduation (4 Years)
29 Bachelor in Interior Design Professional Graduation (4 Years)
30 Bachelor of Design Professional Graduation (4 Years)
31 BDS Dental Professional Graduation (4 Years)
32 BFA Fine Arts Professional Graduation (4 Years)
33 BFD Fashion Design Professional Graduation (4 Years)
34 BFT Fashion Technology Professional Graduation (4 Years)
35 BPT Physiotherapy Professional Graduation (4 Years)
36 LLB Professional Graduation (4 Years)
37 MBBS Professional Graduation (4 Years)
38 B.Sc. Nursing Professional Graduation (4 Years)
39 BAMS (Bachelor of Ayurveda,
Medicine and Surgery)
Professional Graduation (4 Years)
40 BHMS (Bachelor of
Homeopathic Medicine and
Surgery)
Professional Graduation (4 Years)
41 B.Tech + M.Tech Integrated
(5 Years)
Professional Graduation (4 Years)
42 Bachelor in Audiology &
Speech Language Pathology
(BASLP)
Professional Graduation (4 Years)
43 Bachelor of Occupational
Therapy
Professional Graduation (4 Years)
44 Bachelor of Optometry Professional Graduation (4 Years)
45 Integrated Programme in
Management
Professional Graduation (4 Years)

निष्कर्ष

आदित्य बिर्ला कॅपिटल शिष्यवृत्ती 2024-25 ही आर्थिक मदतीसाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे, जी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या स्वप्नांना पंख देते. जर तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी पात्र असाल, तर त्वरित अर्ज करा आणि आपल्या शैक्षणिक भविष्यासाठी एक मोठे पाऊल उचला.

Aditya Birla Capital Scholarship | आदित्य बिर्ला कॅपिटल शिष्यवृत्ती 2024-25

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम