(MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024; संपूर्ण वेळापत्रक, अर्जाची DIRECT LINK

Maha TET Exam 2024 Update

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
872

Maha TET Exam 2024 Update

Maha TET Exam 2024 : MAHA TET 2024 अधिसूचना आणि अर्जाचा फॉर्म प्रसिद्ध झाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) ने 9 सप्टेंबर 2024रोजी MAHATET अधिसूचना 2024 अधिकृत वेबसाइट- mahatet.in वर प्रसिद्ध केली. MAHA TET अर्ज 2024 अधिकृत अधिसूचनेसह प्रसिद्ध करण्यात आला आहे

या परिपत्रकामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेचे वेळापत्रक देण्यात आलेले आहे. या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे. दोन पेपर असल्याने सकाळच्या सत्रात एक आणि दुपारच्या सत्रात एक असे परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्यात इ. 1ली ते 5वी व इ.6 वी ते इ.8वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्ती होण्यासाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ या बातमीत देण्यात आला आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 9 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


मागील अपडेट 

Maha TET Exam 2024

Maha TET Exam 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परी- क्षेचे (टीईटी) अर्ज जानेवारीत घेतले जाणार आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात पहिली ऑनलाईन टीईटी परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. चार वर्षांच्या कालावधीनंतर शिक्षण विभागाकडून ही टीईटी घेतली जाणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया आणि त्याचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे समजते. 


(MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024; संपूर्ण वेळापत्रक, अर्जाची DIRECT LINK

Maha TET Exam 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ऑफलाइन घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‘टीईटी’ यापुढे ऑनलाइन घेण्यात येणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षेची अधिसूचना लवकरच जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. फेब्रुवारी २०२४ मध्ये संबंधित ऑनलाइन परीक्षेचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात येणार आहे. 

 

(MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024; संपूर्ण वेळापत्रक, अर्जाची DIRECT LINK

App Download Link : Download App

काय आहेत ऑनलाईन परीक्षेचे फायदे..

  • टीईटी वेळेत घेऊन निकाल लवकर जाहीर करण्यास होणार मदत
  • परीक्षेतील गैरप्रकारांना पूर्ण आळा बसणार
  • परीक्षेसाठी आवश्यक मनुष्यबळाचा वापर कमी होणार
  • परीक्षा पारदर्शक होण्यास मदत होणार
  • ऑफलाईन परीक्षेत होत असलेल्या चुका टाळण्यास होणार मदत

आयबीपीएस आयटी कंपनीमार्फत संबंधित परीक्षा घेण्याची निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्‍यांनी दिली. प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात (टीईटी) पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या वर्गासाठी टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळ, सर्व माध्यम अनुदानित, कायम विनाअनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षकपदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते.

गेल्या दोन वर्षांत टीईटीमध्ये गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या कारभारावर संशय निर्माण झाला होता. अनेकांना नोकरीपासून वंचित राहावे लागले आहे. यापुढे गैरव्यवहार होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आता शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाइन घेण्याची तयारी सुरू केली आहे.

गेल्या दोन वर्षांत टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली नाही. मुळातच टीईटी परीक्षेत अनेक बोगस उमेदवार सापडले असताना त्यांच्यावर अद्याप कठोर कारवाई केली गेली नाही. शासन जानेवारी अधिसूचना जाहीर करून फेब्रुवारी २०२४ ला पुन्हा एकदा शिक्षक पात्रता परीक्षा घेणार आहे.


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

Maha TET Exam 2024,Maha TET Exam 2024,Maha TET Exam 2024,Maha TET Exam 2024,Maha TET Exam 2024

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम