दिनविशेष : १३ फेब्रुवारी [जागतिक रेडीओ दिन]

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
299

१३ फेब्रुवारी  : जन्म

  • १७६६: प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १८३४)
  • १८३५: अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचा जन्म. (मृत्यू: २६ मे १९०८)
  • १८७९: प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९४९)
  • १८९४: इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै १९८६)
  • १९१०: वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९९९)
  • १९११: लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८४)
  • १९४५: अभिनेता विनोद मेहरा यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९०)

१३ फेब्रुवारी : मृत्यू

१८८३: जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्‍नर यांचे निधन. (जन्म: २२ मे १८१३)
१९०१: गायक नट लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १८६३)
१९६८: संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक गोपाळकृष्ण भोबे यांचे निधन.
१९७४: इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक सूर रंग उस्ताद अमीर खॉं यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१२)
२००८: हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते राजेन्द्र नाथ यांचे निधन.
२०१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार यांचे निधन. (जन्म: १६ जून १९३६)

१३ फेब्रुवारी : महत्वाच्या घटना

  • १६३०: आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथे पोहोचला.
  • १६६८: स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
  • १७३९: कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.
  • १९६०: फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.
  • १९८४: युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.
  • १९८८: कॅनडात कॅल्गारी येथे १५वे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
  • २००३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
  • २०१०: पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार, ६० जखमी.

जागतिक रेडीओ दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम