महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाय योजना.
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाय योजना.
रल्वे परिसर तसेच चालत्या रेल्वेमध्ये गुन्ह्यांना आळा घालणे, गुन्हे दाखल करणे, तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकाराची आहे. रेल्वे सुरक्षा दल सरकारला यात मदत करते.
महिला प्रवाशांसह अन्य प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुढील उपाययोजना करण्यात आल्या आहेत:
1) संवेदनशील मार्गांवर 2200 रेल्वे गाड्यांवर दररोज रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात असतात.
2) 182 हा सुरक्षा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.
3) ट्विटर, फेसबुक सारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी रेल्वे, प्रवाशांच्या नियमित संपर्कात आहे.
4) महिला प्रवाशांसाठी आरक्षित डब्यांमध्ये पुरुष प्रवाशांनी केलेल्या प्रवेशा विरोधात मोहिम हाती घेण्यात आली असून, ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तिंवर रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
5) महानगरांमध्ये धावणाऱ्या महिला विशेष गाड्यांमध्ये महिला आरपीएफ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
6) चोरी, तस्करी सारख्या गुन्ह्यांविरोधात सावधानता बाळगण्यासाठी सार्वजनिक घोषणा प्रणालीच्या माध्यमातून सातत्याने घोषणा दिल्या जात आहेत.
7) 2019 डब्यांमध्ये आणि 511 रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
8) नवीन EMU गाड्यांच्या डब्यांमध्ये आपत्कालीन संवाद प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents