चालू घडामोडी : 27 जानेवारी 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
107

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 27 January 2020 || चालू घडामोडी : 27 जानेवारी 2020

चालू घडामोडी – झारखंडमधील झारिया देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर.

  •  भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे हि सर्वांत प्रदूषित असल्याचे ग्रीनपीसच्या अहवालात म्हटले आहे.
  •  झारखंड या राज्यातील झारिया या शहरात कोळसा खाणींचा उद्योग आहे, हे शहर देशातील सर्वांत प्रदूषित शहर आहे..
  •  झारखंडमधील धनबाद हे ठिकाण कोळसा खाणी व उद्योगांसाठी प्रसिद्ध असून ते दुसर्या क्रमांकाचे सर्वात जास्त प्रदूषितठिकाण आहे.
  •  मिझोराम मधील लुंगलेई हे शहर सर्वात कमी प्रदूषित शहर आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – आंध्रप्रदेश विधान परिषद बरखास्त, मुख्यमंत्र्यांचा निर्णय 

  • आंध्रप्रदेश मधील जगनमोहन रेड्डी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत विधान परिषद बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
  •  वायएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवाडा अमरनाथ यांनी याबाबत माहिती दिली. कॅबिनेटच्या बैठकीनंतर आंध्र प्रदेश सरकारचे विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.

 काय आहे प्रकरण 

  • मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना 3 राजधान्या अस्तित्त्वात आणायच्या आहेत, मात्र त्याबाबतचे विधेयक बहुमताअभावी विधानपरिषदेत रखडले आहे.
  • त्यामुळेच वायएसआर काँग्रेसने चंद्राबाबू नायडूंना धक्का देत, थेट विधानपरिषदच बरखास्तीचा निर्णय घेतला आहे.
  •  माजी मुख्यमंत्री अन् टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाकडून सरकारच्या या प्रस्तावाचा विरोध करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
  • नायडू यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. ज्यामध्ये पक्षाचे 21 आमदार विशेष अधिवेशनावर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
  • आध्र प्रदेशमध्ये विधान परिषदेत 58 सदस्य आहेत. जगन मोहन रेड्डी यांच्या हातात राज्याची सत्ता असली तरी विधान परिषदेत चंद्रबाबू नायडू यांचे बहुमत आहे.
  •  या सभागृहात टीडीपीचे 27 तर वायएसआरचे 9 सदस्य आहेत. विधान परिषदेत जगन मोहन रेड्डी यांच्या राज्याच्या 3 राजधान्या या प्रस्तावाला अडकवले गेले.

# Current Affairs


चालू घडामोडी – राजपथावरील संचलनात पहिल्यांदाच घडल्या ‘या’ पाच गोष्टी

  •  प्रजासत्ताक दिनाला राजपथावरील संचलनात देशाच्या संस्कृती आणि सामर्थ्यांचे दर्शन घडवले जाते. पण यावेळी अशा पाच गोष्टी झाल्या ज्या यापूर्वी कधीही झाल्या नव्हत्या.
  •  चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टरचा सहभाग यंदाच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात नवं बरंच काही पहायला मिळालं. त्यानुसार, प्रथमच अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर संचलनात दिसून आलं. ही दोन्ही हेलिकॉप्टर काही दिवसांपूर्वीच भारतीय वायू सेनेमध्ये दाखल झाली आहेत. त्यांचं दर्शन देशवासीयांना आज प्रजासत्ताक दिनानिमित्त घडलं.
  •  महिलेनं केलं पुरुषांच्या तुकडीचं नेतृत्व कॅप्टन तानिया शेरगिल यांनी राजपथावर संचलनादरम्यान पुरूषांच्या तुकडीचं नेतृत्व केलं. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
  • ‘धनुष्य’ तोफ आली जगासमोर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशात तयार झालेली ‘धनुष्य’ तोफ पहिल्यांदाच जगासमोर आली. गेल्या आठवड्यातच या तोफा सैन्यात सहभागी झाल्या होत्या.
  •  सन्यातील महिलांच्या तुकडीने केले स्टंट राजपथवरील संचलनात पहिल्यांदाच सैन्य दलातील महिलांनी मोटरसायकलवर स्टंट केले. ६५ सदस्यांच्या या टीमने ३५० सीसी रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकलवर आपल्या कवायती सादर करुन उपस्थितांना आश्चर्यचकीत केलं.
  • राफेल विमानाची प्रतिकृती दरम्यान, गेल्या काही वर्षात सर्वाधिक काळ चर्चेत राहिलेल्या राफेल लढाऊ विमानांचे यावेळी पहिल्यांदाच जनतेला दर्शन घडले. वायू दलाने आपल्या पथसंचलनात या विमानांची प्रतिकृती सादर केली.

# Current Affairs


चालू घडामोडी – 17,000 फूट उंचावर जवानांनी फडकावला तिरंगा.

  • इंडो-तिबेटिअन बॉर्डर पोलीस जवानांनी (आयटीबीपी) प्रजासत्ताक दिनानिमित्त 17,000 फुट उंचीवर ध्वजारोहण केले. त्यांचा हो फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.तर सध्या या ठिकाणचे तापमान हे उणे 20 डिग्री इतके आहे.
  • अशा बिकट वातावरणातही त्यांच्यामध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह जराही कमी झालेला दिसत नाही. पाढऱ्या पोशाखात असलेल्या अकरा जवानांनी थेट बर्फावर संचलन केले.
  • तसेच प्रत्येकाच्या हाती त्यांनी गन होतीच. शिवाय पहिल्या जवानाच्या हाती उंच तिरंगा होता.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम