चालू घडामोडी : 24 जानेवारी 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 24 January 2020 | चालू घडामोडी : 24 जानेवारी 2020
चालू घडामोडी – भारतात विकास दर मंदावण्याची स्थिती तात्पुरती आहे – IMF प्रमुख
- भारतात आर्थिक विकासाचा वेग मंदावला असला तरी ही स्थितीत तात्पुरती असून, आगामी काळात विकासाला पुन्हा चालना मिळेल असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांनी शुक्रवारी व्यक्त केला. अमेरिका आणि चीनमध्ये पहिल्या टप्प्यात व्यापार करार झाला असून त्यामुळे व्यापार तणाव कमी होणार आहे.
- त्याशिवाय कर कपातही झाली आहे. हे सकारात्मक संकेत असल्याचे क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांनी सांगितले. ३.३ टक्के विकास दर हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अजिबात समाधानकारक नसल्याचे त्या म्हणाल्या. आर्थिक विकासाचा वेग खूपच कमी असून, आक्रमक आर्थिक धोरणांची तसेच रचनात्मक सुधारणांची आवश्यकता असल्याचे मत क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांनी व्यक्त केले.
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने २०१९-२० मध्ये भारताचा आर्थिक विकास दर ४.८ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. भारतासारख्या मोठया बाजारपेठेचा विकास दर मंदावण्याचा अंदाज आम्ही वर्तवला आहे. पण ती स्थिती तात्पुरती असेल असे आम्हाला वाटते. इंडोनेशिया, व्हिएतनाम या देशांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चालू घडामोडी – ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : फेडररचा शतकमहोत्सव!
- मिल्मॅनवर संघर्षपूर्ण विजय; सेरेना, गतविजेत्या ओसाकाचे आव्हान संपुष्टात- मेलबर्न : गतवर्षी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयांचे शतक नोंदवणाऱ्या तिसऱ्या मानांकित स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने शुक्रवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतही विजयांचा शतकमहोत्सव साजरा केला. मात्र यासाठी तिसऱ्या फेरीत फेडररला ऑॅस्ट्रेलियाच्या जॉन मिल्मॅनशी साडेचार तासांची पाच सेटपर्यंत झुंज द्यावी लागली.
- महिलांमध्ये २३ ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचे आव्हान संपुष्टात आले, तर सेरेनाकडून मार्गदर्शनाचे धडे घेतलेली अमेरिकेचीच अवघी १५ वर्षीय कोको गॉफने गतविजेत्या जपानच्या नाओमी ओसाकाला पराभवाचा धक्का दिला.
- ऑस्ट्रेलियातील वेळेप्रमाणे मध्यरात्रीचे १२ वाजून ५० मिनिटे झाली असताना फेडररने ४-६, ७-६, ६-४, ४-६, ७-६ असा टायब्रेकरवरील लढतीत विजय नोंदवला. विशेष म्हणजे अखेरच्या क्षणी फेडरर ५-८ असा पिछाडीवर होता. मात्र त्यातून त्याने १०-८ अशी बाजी मारली. याचप्रमाणे सहावा मानांकित ग्रीसचा त्सित्सिपासवर राओनिकने ७-५, ६-४, ७-६ असा विजय मिळवला.
- महिलांमध्ये यंदाच्या स्पर्धेतील सर्वात युवा खेळाडू आणि बिगरमानांकित गॉॅफने गतविजेती ओसाकाला पराभूत केले. याबरोबरच गॉफने पाच महिन्यांपूर्वी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत ओसाकाकडून झालेल्या पराभवाची परतफेड केली. गॉफने ६-३, ६-४ असा सरळ दोन सेटमध्ये ओसाकाचा पराभव केला.
- दोन खुल्या टेनिस स्पर्धा जिंकणारी तिसरी मानांकित ओसाकाने असंख्य चुका केल्या. परिणामी पहिला सेट गॉफने ३२ मिनिटांतच जिंकला. पहिल्या सेट जिंकल्यानंतर तिचा आत्मविश्वास उंचावला. दुसऱ्या सेटमध्ये १-१ बरोबरीतून गॉफने ५-४ आघाडी घेतली. तेव्हा सव्र्हिस तिच्याकडेच होती आणि ती संधी तिने जिंकण्यासाठी घेतली.
- सेरेनाचा चीनच्या वॅँग किआंगकडून तीन सेटमधील चुरशीच्या लढतीत ४-६, ७-६, ५-७ असा पराभव झाला. दुसरा सेट जिंकून सेरेनाने आव्हान टिकवले होते. मात्र पुन्हा तिसऱ्या सेटमध्ये सेरेनाचा निभाव लागला नाही. ३८ वर्षीय सेरेना ‘आई’ झाल्यानंतर गेल्या आठ ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धामध्ये जेतेपद पटकावू शकलेली नाही. मार्गारेट कोर्टच्या विक्रमी २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या विक्रमाने तिला पुन्हा हुलकावणी दिली.
- अव्वल मानांकित ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीने चौथ्या फेरीत सहज प्रवेश केला. तिने २९व्या मानांकित एलिना रायबॅकिनाचा ६-३, ६-२ पराभव केला. १९७८ नंतर महिला एकेरीची ऑस्ट्रेलियन विजेती होण्यासाठी बार्टी प्रयत्नशील आहे.
चालू घडामोडी – ‘किंग कोहली’ अव्वल स्थानावर कायम
- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचं कसोटी क्रमवारीतलं अव्वल स्थान कायम राहिलेलं आहे. आयसीसीने शुक्रवारी जाहीर केलेल्या यादीत, विराट ९२८ गुणांसह पहिल्या स्थानी कायम असून, भारतीय संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेच्या क्रमवारीतही सुधारणा होऊन तो आठव्या स्थानी आलेला आहे.
- विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. न्यूझीलंडचा दौरा हा भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे या मालिकेत विराट कोहलीसह भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असेल.
- अशी आहे आयसीसीची कसोटी क्रमवारी –
१) विराट कोहली – ९२८ गुण
२) स्टिव्ह स्मिथ – ९११ गुण
३) मार्नस लाबुशेन – ८२७ गुण
४) केन विल्यमसन – ८१४ गुण
५) डेव्हिड वॉर्नर – ७९३ गुण
६) चेतेश्वर पुजारा – ७९१ गुण
७) बाबर आझम – ७६७ गुण
८) अजिंक्य रहाणे – ७५९ गुण
९) जो रुट – ७५२ गुण
१०) बेन स्टोक्स – ७४५ गुण
चालू घडामोडी – ऑक्सफर्ड शब्दकोशात ‘चाळ’ आणि ‘डब्या’चा समावेश
- नव्या जागतिक आवृत्तीत भारतातील आणखी २६ शब्दांना स्थान
- इंग्रजी संभाषणातील वापर आणि प्रचलित शब्द या निकषांवर जगभरातील नव्या अर्थपूर्ण शब्दांना सामावून घेणाऱ्या ‘ऑक्सफर्ड लर्नर्स डिक्शनरी’मध्ये आता भारतात बोलल्या जाणाऱ्या आणखी २६ शब्दांना स्थान देण्यात आले आहे.
- विशेष म्हणजे यात मराठमोळे डब्बा (जेवणाचा), चाळ (वसती) हे शब्द आणि शादी, हरताळ, आधार (आधार कार्ड) यांचा समावेश आहे. ऑक्सफर्ड शब्दकोशाची ही अद्यायावत दहावी आवृत्ती शुक्रवारी प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीत ३८४ भारतीय (भारतीय इंग्रजी) शब्दांचा समावेश आहे. यावेळी एकूण एक हजार नव्या शब्दांना या कोशाने सामावून घेतले आहे. त्यात चॅटबॉट, फेक न्यूज आणि मायक्रोप्लास्टीक या शब्दांचा समावेश आहे.
- ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून या शब्दकोशाने भाषेतील परिवर्तनावर तसेच तिच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. नव्या आवृत्तीत वापरण्यात आलेली भाषा आणि शाब्दीक उदाहरणे ही बदलत्या काळाशी सुसंगत आणि अद्ययावत असतील, याची दक्षता आम्ही घेतली आहे.
- ऑक्सफर्ड लर्नर्स डिक्शनरीचे संकेतस्थळ आणि अॅप यांच्या माध्यमातून वाचकांशी झालेल्या संवादातून ही नवी आवृत्ती साकारली आहे. या संकतस्थळावर दृकचित्र माध्यमातून स्वाध्याय, संवाद, अभ्यास यांच्याबरोबरच अद्ययावत आय-रायटर आणि आय-स्पीकर साधनांची सुविधा आहे.
- नव्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये अंतर्भूत केलेल्या २६ नव्या भारतीय शब्दांपैकी २२ शब्दांना मुद्रित आवृत्तीमध्ये स्थान दिले आहे, अशी माहिती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या शिक्षण विभागाच्या व्यवस्थापकीय संचालिका फातिमा दादा यांनी दिली.
- या शब्दकोशातील अन्य भारतीय शब्दांत, आंटि (एयूएनटीआयइ) (आन्टी- एयूएनटीवाय या इंग्रजी शब्दाचे भारतीय रूप), बस स्टॅन्ड, टय़ूब लाइट, व्हेज आणि व्हिडिओग्राफ यांचा समावेश आहे.
- ऑक्सफर्ड शब्दकोशाला ७७ वर्षे होत असून त्याचा श्रीगणेशा १९४२ मध्ये जपानमध्ये झाला. या कोशाचे कर्ते अल्बर्ट सिडने यांचा उद्देश हा जगभरातील भाषा अभ्यासकांना इंग्रजी वापरातील शब्दांचा अर्थ समजावा हा होताकरंट आणि उपजिल्हा
ऑक्सफर्ड ऑनलाईन आवृत्तीत अर्थाच्या दृष्टीने चार नवे भारतीय-इंग्रजी शब्द समाविष्ट झाले आहेत. यात करंट (वीजप्रवाह या अर्थाने), लूटर, लुटिंग आणि उपजिल्हा या शब्दांचा समावेश आहे.
# Current Affairs
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents