चालू घडामोडी : 22 जानेवारी 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
137

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 22 January 2020 | चालू घडामोडी :  22 जानेवारी 2020

चालू घडामोडी – अमृतादेवी बिष्णोई स्मृती पुरस्कार

  • बिष्णोई समाज पर्यावरणावर अतोनात प्रेम करणारा समाज असून वन्यजीवांना आपल्या कुटुंबाप्रमाणेच मानतो.
  •  वन्यजीव संवर्धनासाठी उल्लेखनीय धर्य व शौर्य दाखविणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्ती अथवा संस्थेला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. २००३ पासून सुरू करण्यात आलेल्या पुरस्कारासाठी कोणत्याही वयोमर्यादेची अट नाही.
  •  राजस्थानातील जोधपूरपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या खेजडली गावात १७८७ साली अमृतादेवी बिष्णोई यांच्या नेतृत्वाखाली बिष्णोई समाजातील ३६३ पुरुष, महिला आणि लहान मुलांनी झाडांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते.
  • या अमृतादेवी बिष्णोई यांच्या स्मरणार्थ वने आणि वन्यजीवांच्या संवर्धन आणि विकासाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना या पुरस्कारने सन्मानित केले जाते. झाडे वाचवण्यासाठी १९७३ साली झालेल्या ‘चिपको आंदोलना’ची प्रेरणा अमृतादेवींच्या याच लढय़ातून घेण्यात आली होती.
  • बिष्णोई समाज पर्यावरणावर अतोनात प्रेम करणारा समाज असून वन्यजीवांना आपल्या कुटुंबाप्रमाणेच मानतो. पर्यावरण संरक्षणात या समाजाचं योगदान मोठं आहे. या समाजाचे लोक जात-पात-धर्म याच्यावर विश्वास ठेवत नाहीत.
  •  बिष्णोई म्हणजे बीस आणि नऊ यांचे मिश्रण. वीस आज्ञा आणि नऊ तत्त्वे. या २९ बाबींचे पालन करणारा हा समाज बिष्णोई म्हणून ओळखला जाऊ लागला. सलमान खानच्या काळवीट हत्या खटल्यात याच समाजाचे लोक फिर्यादी आणि साक्षीदारदेखील होते. ते मागे हटले नाहीत आणि तो ही केस हरला. निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संतुलन ही या समाजाने आपली आद्य कर्तव्ये मानल्यानेच राजस्थानसारख्या शुष्क वाळवंटातील जैवविविधता (जीविधता) अबाधित ठेवण्यात या समाजाचा मोलाचा वाटा आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – एक जूनपासून ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेला सुरूवात

  •  यापूर्वी चार राज्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली होती.
  •  ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजना १ जून पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिली. या योजनेअंतर्गत ग्राहक एका रेशन कार्डाचा वापर देशभरात कोणत्याही ठिकाणी करू शकणार आहे.
  •  यापूर्वी ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेचा पायलट प्रोजेक्ट चार राज्यांमध्ये लागू करण्यात आला होता. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि गुजरात या राज्यांमध्ये रेशन कार्डाच्या पोर्टेबिलिटीची सुविधा देण्यात आली होती. रामविलास पासवान यांनी या योजनेचं ऑनलाइन उद्घाटनदेखील केलं होतं. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास देशभरात ही योजना देशभरात लागू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली होती.

भ्रष्टाचाराला आळा बसणार 

  • या योजनेमुळे रेशन कार्ड धारक देशभरातील कोणत्याही रेशनच्या दुकानांमधून स्वस्त दरांमध्ये धान्य खरेदी करू शकणार आहे. या योजनेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या कामगारांनाही अनुदानित धान्यापासून वंचित राहावं लागणार नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – झारखंडमधील झारिया देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर

  • ग्रीनपीसचा वायू प्रदूषण अहवाल जाहीर; मिझोराममधील लुंगलेइ हे ठिकाण सर्वात कमी प्रदूषित
  •  भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे सर्वात प्रदूषित असल्याचे ग्रीनपीसच्या अहवालात म्हटले आहे. झारखंडमधील कोळसा खाणींचा उद्योग असलेले झारिया हे देशातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे स्पष्ट झाले असून दिल्लीचा क्रमांक दहावा लागला आहे.
  •  दिल्ली वर्षांपूर्वी आठव्या स्थानावर होते. झारखंडमधील धनबाद हे ठिकाण कोळसा खाणी व उद्योगांसाठी प्रसिद्ध असून ते देशातील दुसरे प्रदूषित ठिकाण आहे. यात पीएम १० कणांचे प्रमाण देशातील २८७ शहरांत मोजण्यात आले.
  • मिझोराममधील लुंगलेइ हे ठिकाण सर्वात कमी प्रदूषित असून त्या खालोखाल मेघालयच्या डोवकी या ठिकाणांचा कमी प्रदूषणात दुसरा क्रमांक आहे. देशातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी दहा उत्तर प्रदेशात असून त्यात नॉइडा, गाझियाबाद, बरेली, अलाहाबाद, मोरादाबाद, फिरोजाबाद यांचा समावेश आहे. दक्षिणेकडे सर्वाधिक प्रदूषित शहरात एकूण २८ ठिकाणांचा समावेश असला, तरी त्यात केरळमधील एकही ठिकाण नाही.
  •  ग्रीनपीसच्या भारतीय शाखेने एअरोपोकॅलप्स ४ अहवाल मंगळवारी जारी केला असून त्यात देशातील शहरांच्या हवा प्रदूषणाचा ताळेबंद मांडला आहे. २०१८ मध्ये देशातील एकूण २८७ शहरांच्या हवेचे ५२ दिवस निरीक्षण करून असे सांगण्यात आले, की २३१ शहरांत पीएम १० कणांचे प्रमाण हे धोकादायक पातळीपेक्षा अधिक आहे. भारतात पीएम दहा कणांचे २४ तासांना १०० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर तर वर्षांला सरासरी ६० मायक्रोग्रॅम घनमीटर इतके प्रमाण सुरक्षित मानले गेले आहे. झारखंडमधील झारिया येथे पीएम १० कणांचे प्रमाण प्रतिघनमीटरला ३२२ मायक्रोग्रॅम होते. धनबाद व नॉइडात ते प्रतिघनमीटरला २६४ मायक्रोग्रॅम होते. गाझियाबादेत २४५ मायक्रोग्रॅम होते.
  • कर्नाटकातील बंगळूरु, रायचूर, बेळगावी, तुमकुरु, कोलार, बिजापूर, हुबळी, धारवाड, बागलकोट ही शहरे जास्त प्रदूषित आहेत.
  •  तमिळनाडूत त्रिची, थुतूकोडी, मदुराई, चेन्नई तर तेलंगणात कोठूर, हैदराबाद, रामगुंडम, करीमनगर, वारंगळ, खम्मम, संगारेड्डी, पटेनतुरू, अदिलाबाद ही शहरे प्रदूषित आहेत. आंध्र प्रदेशातील विजयवाडा, विशाखापट्टनम, काकीनाडा, राजमुंद्री, श्रीकाकुलम, अनंतपूर ही ठिकाणे प्रदूषित आहेत. केरळमध्ये एकाही शहरातील हवेत पीएम १० कणांचे प्रमाण धोकादायक दिसले नाही. तेथे कमाल प्रमाण दर घनमीटरला ५७ मायक्रोग्रॅम होते.

सरकारला शिफारस

  •  भारत सरकारने नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एनसीएपी) तयार केला असून त्यात जास्त शहरांचा समावेश करावा, असे ग्रीनपीसचे म्हणणे आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – राज्यात मुंबई सर्वाधिक प्रदूषित:ग्रीनपीस इंडिया संस्थेचा अहवाल

  • ग्रीनपीस इंडिया संस्थेचा अहवाल
  •  नागपूर, मुंबई : भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे हवा गुणवत्तेच्या बाबतीत धोक्याच्या पातळीत आली असून महाराष्ट्रातील २० शहरांचा यात समावेश आहे. मुंबई हे राज्यातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून गणले गेले आहे. मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा राष्ट्रीय गुणवत्ता निर्देशांकापेक्षा तीनपटीने खालावला आहे. मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत आहे. ग्रीनपीस इंडिया या पर्यावरण संस्थेच्या वतीने दरवर्षी एक पर्यावरणीय अहवाल सादर केला जातो. या वर्षीच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.
  •  हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत (पीएम १०) मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे. या शहरातील हवेची गुणवत्ता जागतिक आरोग्य संघटनेच्या हवा प्रदूषणाबाबत असलेल्या मानकापेक्षा आठपट अधिक आहे. मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत असल्याचे ग्रीनपीसच्या अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईतील वाढती वाहतूक, वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या बांधकामामुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असल्याचे दिसून येते. सुमारे वर्षभरापूर्वी राज्यातील हवेच्या प्रदूषणाच्या अहवालातदेखील मुंबईतील हवेत पीएम घटक आणि नायट्रोजन ऑक्सॉईडच्या उत्सर्जनात वाढ झाल्याचे स्पष्टपणे आढळून आले होते.
  •  जानेवारी २०१९ मध्ये भारतासाठी पहिला राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. याअंतर्गत २०१७ पासून २०२४ पर्यंत शहरातील वायू प्रदूषणाचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या प्रत्येक शहरासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्रीनपीसच्या अहवालात असेही म्हटले आहे की, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केवळ १२२ सर्वाधिक प्रदूषित शहरे ओळखली आहेत. ही १२२ शहरे २८ राज्ये आणि नऊ केंद्रशासित प्रदेशांतील आहेत. त्यातील १६६ शहरांनी राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे या शहरांचाही समावेश सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत करावा.
  • २० शहरे अतिप्रदूषित
  •  हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत(पीएम१०) मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे.
  •  डोंबिवली, चंद्रपूर, उल्हासनगर, ठाणे, पुणे, अमरावती, नागपूर, जालना, लातूर, कोल्हापूर, पिंपरी, चिंचवड, नाशिक, सांगली, जळगाव, अकोला, सोलापूर, नवी मुंबई, औरंगाबाद आणि भिवंडी येथील हवेची गुणवत्ता राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकापेक्षा व जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडापेक्षा आठपट अधिक आहे.
  •  ग्रीनपिसच्या अभ्यासानुसार, डोंबिवली, ठाणे, पिंपरी, चिंचवड, नवी मुंबई आणि भिवंडी ही शहरे नव्याने मानकापेक्षा अधिक हवा प्रदूषित शहरांच्या यादीत आली आहेत.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम