चालू घडामोडी : 19 जानेवारी 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
139

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 19 जानेवारी 2020  | चालू घडामोडी : 19 January  2020

चालू घडामोडी – राष्ट्रीय गंगा अभियानाच्या अंतर्गत पाणथळ प्रदेशांचे संवर्धन केले जात आहे

  •  ‘नमामि गंगे’ कार्यक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) यांनी गंगा नदीच्या खोर्‍यात येणार्‍या पाणथळ प्रदेशांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

पाणथळ प्रदेश म्हणजे काय?

  •  पाणथळ प्रदेश हा समुद्र किंवा भूमीप्रदेश याजवळ सापडतो आणि तो हंगामीही असू शकतो. त्या प्रदेशात वर्षातले काही महीने किंवा बारमाही काळात पाणी भरलेले असते. ते पर्यावरणात एक महत्वपूर्ण भूमिका बजावतात जसे की, पुराचे पाणी सामावून घेतात, येथे माश्यांना पाण्यातील वनस्पती खाद्य म्हणून पुरवते, प्राण्यांना निवारा देते, तळाशी जमणारा गाळ काढून पाणी शुद्ध करते.
  •  नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढविणे आणि जलस्त्रोतांचे पुनर्भरण करणे यासाठी पाणथळ प्रदेशांचे संवर्धन करणे आवश्यक आहे, कारण हे प्रदेश जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढवते आणि नदीचा प्रवाह कायम राखण्यास मदत होते.
  •  प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधल्या पाणथळ प्रदेशांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
  •  NMCG संस्था राज्य पाणथळ प्रदेश प्राधिकरण या संस्थांच्या सहकार्याने अश्या प्रदेशांची ओळख पाठवविणार आहे त्यांच्या संवर्धंनासाठी आणि व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन योजना तयार केली जाणार.

1971ची रामसार परिषद

  •  1971 साली इराणी शहर रामसार येथे झालेल्या रामसार परिषदेत ‘पाणथळ प्रदेशांच्या संवर्धनार्थ रामसार करारनामा’ मंजूर करण्यात आला.

# Current Affairs


चालू घडामोडी – राष्ट्रीय लसीकरण दिन

  •  19 जानेवारी 2020 रोजी पल्स पोलिओ कार्यक्रम 2020 याचा एक भाग म्हणून संपूर्ण देशभरात राष्ट्रीय लसीकरण दिन  पाळला गेला.
  •  भारतातल्या वयवर्षे पाच वर्षांखालील सुमारे 17.4 कोटी बालकांना पोलिओ लसीचे दोन थेंब पाजण्यात आले.

मोहिमेविषयी

  •  पोलिओ (बालपक्षाघात) म्हणजे विषाणूमुळे येणारा लुळेपणा होय. पाच वर्षे वयापर्यंतच्या लस न दिलेल्या सर्व मुलांना- विशेषतः पावसाळयात याच्यापासून धोका असतो.
  •  पोलिओ विषाणूचे तीन प्रकार असून यामध्ये पी 1, पी 2, पी 3 असे प्रकार आढळून येतात. यापैकी पी 2 हा विषाणू जगातून पूर्णपणे नष्ट झाला आहे. सन 2011 नंतर देशात एकही पोलिओ रुग्ण आढळून न आल्याने भारताला 27 मार्च 2014 रोजी पोलिओ निर्मुलन प्रमाणपत्र मिळाले.
  •  जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) सन 1988 मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार भारतात सन 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी दोनदा राबविण्यात येत आहे.
  •  राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन मोहिमेत थेंबाची तोंडी लस (Oral Polio Vaccine – OPV) वापरली जाते. शिवाय इंजेक्शन लसीचा (Inactivated Polio Vaccine -IPV) पर्याय देखील उपलब्ध आहे. याचा पहिला डोस बाळ 6 आठवडयाचे झाल्यावर देतात.
  • या लसीचे 1-2 महिन्याच्या अंतराने तीन डोस दिले जातात. चौथा डोस यानंतर 6-12 महिन्यात देतात. यानंतर दर 5 वर्षांनी एक इंजेक्शन देतात.

चालू घडामोडी – बजरंगाची कमाल ! Rome Ranking Series मध्ये भारतीय मल्ल चमकले बजरंग-रवीची सुवर्णपदकाची कमाई

  • Rome Ranking Series स्पर्धेत विनेश फोगाट पाठोपाठ भारताच्या पुरुष मल्लांनीही आपला डंका वाजवला आहे. ६५ किलो वजनी गटात बजरंग पुनिया तर ६१ किलो वजनी गटात रवी कुमार दहीयाने सुवर्णपदकाची कमाई केली.
  • २५ वर्षीय बजरंगने अंतिम सामन्यात दमदार पुनरागमन करत अमेरिकेच्या जॉर्डन मायकल ऑलिव्हरवर ४-३ ने मात करत यंदाच्या वर्षाचं पहिलं सुवर्णपदक मिळवलं. याआधी उपांत्य फेरीतही बजरंगने अमेरिकेच्याच झेन रेदरफोर्डची कडवी झुंज मोडून काढली होती. या सामन्यातही बजरंगने ५-४ असा विजय मिळवला होता.
  •  अंतिम सामना गमावल्यानंतर अमेरिकेच्या कुस्तीपटूनेही बजरंगच्या खेळाचं कौतुक केलं.
  •  आपल्या ५७ किलो वजनी गटातून न खेळता ६१ किलो वजनी गटाचा पर्याय निवडणाऱ्या रवी कुमार दहीयानेही बहार आणली.
  •  कझाकस्तानच्या नुरबोलत अब्दुलायेव्हचा १२-२ ने फडशा पाडला. रवीने आपल्या नवीन वजनी गटात आश्वासक खेळ करत तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र ७४ किलो वजनी गटात जितेंद्र कुमार आणि ८६ किलो वजनी गटात दीपक पुनिया यांचं आव्हान संपुष्टात आलं

# Current Affairs


चालू घडामोडी – खलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : जलतरणात महाराष्ट्राला चार सुवर्ण

  • कुस्तीत विजय पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी सुवर्णपदक मिळवून दिले.
  • ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची सुवर्णपदकांची लयलूट सुरूच आहे. महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी रविवारी चार सुवर्णपदके पटकावली. तसेच कुस्तीत विजय पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी सुवर्णपदक मिळवून दिले.
  •  जलतरण प्रकारात मिहीर आंब्रे याने मुलांच्या २१ वर्षांखालील गटात १०० मीटर बटरफ्लाय आणि ४ बाय १०० मीटर मिडले रिले प्रकारात सुवर्णपदक पटकावले. अपेक्षा फर्नाडिस हिने १७ वर्षांखालील गटात ४०० मीटर वैयक्तिक मिडले शर्यत विक्रमी वेळेत पार करत सुवर्णपदक मिळवले. तसेच केनिशा गुप्ताने १०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
  •  वेटलिफ्टिंगमध्ये प्राजक्ता खालकरने ६४ किलो गटात, अभिषेक निपणेने ७३ किलो गटात तर किरण मराठे याने युवा गटात सुवर्णपदक पटकावले.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम