Talathi Recruitment 2023 Apply Now – खुशखबर! तलाठी भरतीला आणखी मुदतवाढ 4644 जागांसाठी तलाठी भरती अर्ज सुरू

खुशखबर! तलाठी भरतीला अजून मुदतवाढ 4644 जागांसाठी तलाठी भरती अर्ज सुरू

  • पदसंख्या: 4644
  • शेवटची तारीख: 25/07/2023
8,620

Talathi Bharti New Update

Talathi Bharti New Update : तलाठी भरती परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे , तलाठी भरती अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे. तलाठी भरती परीक्षेला राज्यातील तरुणांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. याआधी अनेक तरुण आजही अर्ज करत आहेत. आता ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु झाली असून, आपण तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकता. तसेच आता अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२३ आहे.

Talathi Recruitment 2023

Talathi Recruitment 2023 : भूमी अभिलेख विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या ४६४४ पदांसाठी सोमवारपर्यंत दहा लाखांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ जुलै होती, परंतु प्राप्त अर्जाची संख्या अपेक्षेपेक्षा अधिक आल्याने उमेदवारांना अर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली आहे.

आता 25 जुलै २०२३ पर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे. तसेच तलाठी पदासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. या अर्जांची 25 जुलैनंतर छाननी केली जाईल. त्यानंतर, परीक्षा होईल. ऑक्टोबरमध्ये परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही उमेदवारावर जमाबंदी विभागाची भूमिका आहे. अन्याय होणार नाही, अशी उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

ऑनलाईनच या पदभरतीसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे.

२ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार आहे.या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे.

महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  सदर ऑनलाइन परीक्षा टीसीएस या खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

Talathi Recruitment 2023 Apply Now - खुशखबर! तलाठी भरतीला आणखी मुदतवाढ 4644 जागांसाठी तलाठी भरती अर्ज सुरू

App Download Link : Download App

  • एकच प्रश्नपत्रिका : महत्वाची अपडेट म्हणजे तलाठी भरती परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका नसेल. राज्यातील सर्व जिल्हातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.
  • टीसीएसकडून होणार परीक्षा : परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरव्यवहाराची मागील उदाहरणे पाहता महाराष्ट्र शासनाने महत्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा टीसीएस कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. ही परीक्षा घेण्यासाठी टीसीएस कंपनीकडून १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत.
  • उमेदवारांचा प्रतिसाद : राज्यातील लाखो तरुण तलाठी भरती परीक्षेची तयारी करीत आहेत. त्यामुळे या परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे. सुमारे पाच लाख उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
  • एकाच जिल्ह्यातून अर्ज : तलाठी भरती परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरल्यास ते बाद करण्यात येतील याची नोंद घ्या.

Talathi Recruitment 2023 Apply Now - खुशखबर! तलाठी भरतीला आणखी मुदतवाढ 4644 जागांसाठी तलाठी भरती अर्ज सुरू

Talathi Bharti New Update
Talathi Bharti New Update

 

एकूण जागा : 4644 

पदाचे नाव & तपशील: तलाठी 

शैक्षणिक पात्रता: पदवीधर  (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी 

Fee: खुला वर्ग रु. १०००/-  – राखीव वर्ग : ९००/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  १८  25 जुलै 2023 

 

पदाचे नाव पद संख्या 
तलाठी  ४६४४ पदे

 

Educational Qualification For Talathi Bharti 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तलाठी
(महसूल विभाग)
जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे. 

  • महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  • शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
    ७. २ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-
  • पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन
  • आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.

Talathi Bharti 2023 Important Dates 

Talathi Bharti 2023 Important Dates

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा – ऑनलाईन अर्जाची लिंक २६ जून २०२३ पासून सुरु होणार

 अधिकृत वेबसाईट

पेसा क्षेत्रातील यादी

List of Documents required for Talathi Bharti 2023

Following is list of the required documents required for talathi bahrti 2023.

Talathi Recruitment 2023 Apply Now - खुशखबर! तलाठी भरतीला आणखी मुदतवाढ 4644 जागांसाठी तलाठी भरती अर्ज सुरू

विभागाचे नाव आणि रिक्त पदे

1- कोकण विभाग – 550 रिक्त पदे
2- नासिक विभाग- 689 रिक्त पदे
3- पुणे विभाग-602 रिक्त पदे
4- औरंगाबाद विभाग – 685 रिक्त पदे
5- नागपूर विभाग- 478 रिक्त पदे
6- अमरावती विभाग- 106 रिक्त पदे

अशा पद्धतीनं करा अप्लाय

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जदाराचे स्वतःचे gmail account आवश्यक आहे.
  • अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.
  • अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल
  • सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक (Details List of Document for Talathi Bharti 2023 is given on this Link)

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

आत्ताच प्राप्त माहिती नुसार राज्यातील नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, पुणे तसेच अमरावती विभागातील या तलाठ्यांच्या ४ हजार ६४४ पदभरतीसाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली आहे. १५ जून २०२३ पासून प्रक्रिया सुरू होणार असतानाच शासनाने अनुकंपाधारकांची २० टक्के पदे भरण्याचे आदेश दिल्याने आता ही प्रक्रिया थोडी लांबणार आहे. या नवीन शासन निर्णयामुळे जागांच्या गणितामध्ये फरक पडणार आहे. आता नवीन पदांचा तपशील आणि अनुकंपा भरतीसाठी आवश्यक असलेल्या निर्णयाची पुनरर्चना झाल्यावर तलाठी भरतीचा नवीन मुहूर्त निघणार आहे. या नवीन बदल मुले उमेदवार मात्र थोडे नाराज झाले आहे, कारण आता पर्यंत विविध कारणामुळे तलाठी भरती पुढे ढकलणे सुरूच आहे, त्यात या वेळेस भरतीचे अपेक्षित तारीख आल्यावर सुद्धा हि भरती अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. 

तलाठी भरती प्रक्रियेत उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार असल्याचे समजते. साधारण गटासाठी १ हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार होते. त्यामुळे राज्यातील लाखो उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी लिंक खुली होण्याची प्रतीक्षा लागली होती. तशातच राज्य शासनाचे अनुकंपाधारकांच्या २० टक्के जागा भरण्याचे आदेश दिल्याने आकडेवारी आता आरक्षणनिहाय बदलणार आहे

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    

——————————

Talathi Recruitment 2023

Talathi Recruitment 2023 : राज्यभरात रिक्त असलेल्या तलाठ्यांच्या जागा भरण्यासाठी मे महिन्याच्या सुरुवातीला बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तलाठी भरतीसाठी TCS कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे मात्र, या बैठकीनंतर भरती केव्हा होणार याविषयी सरकारकडून केवळ घोषणाच होत आहेत प्रत्यक्षात तलाठी पदासाठी जाहिरात अद्यापही प्रसिद्ध झालेली नाही.  राज्य शासनाच्या विविध विभागांत हजारो पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे लाखो बेरोजगार युवक नोकरीच्या शोधात असल्याचे परस्परविरोधी चित्र आहे त्यातच गत काही महिन्यांपासून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तलाठ्यांची ४ हजारांच्यावर पदे भरण्याची घोषणा करीत आहेत या भरतीसाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या आहेत मात्र, मे महिना संपला तरी तलाठी पदाच्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही त्यामुळे, सुशिक्षित बेरोजगार युवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने ७५ हजार जागांवर मेगाभरती करण्याचा संकल्प केला आहे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डिसेंबर २०२२ मधील विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्नोत्तरामध्ये तलाठी पदभरती करण्याचे सूतोवाच केले होते राज्यात तलाठी भरती २०१६ मध्ये जिल्हा निवड समितीच्या वतीने घेण्यात आली होती. त्यानंतर २०१९ पासून अद्यापही भरती झालेली नाही त्यामुळे, तलाठ्यांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. तरीही प्राप्त माहिती  नुसार तलाठी भरतीची जाहिरात लवकरच येणे अपेक्षित असल्याचे समजते.

 

महसूल व वन विभागाचा डिसेंबर २०२२च्या शासन निर्णयानुसार नव्याने ३११० तलाठी पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली होती. पूर्वीच्या १०१२ रिक्त पदांसह ४११२ पदांची भरती करण्याचे शासनाद्वारे वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, भरती प्रक्रिया अद्यापही रेंगाळलेली आहे. शिंदे- फडणवीस सरकारने पारदर्शक पदभरतीसाठी टीसीएस आणि आयबीपीएससारख्या विश्वासू संस्थांची निवड २०२२ च्या शासन निर्णयाद्वारे केली. त्यानंतर तलाठी भरतीला गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, अद्याप काहीच झालेले नाही.

Talathi Bharti GR

१. नाशिक विभाग 1035
२. औरंगाबाद विभाग 847
३. कोकण विभाग 731
४. नागपूर विभाग 580
५. अमरावती विभाग 183
६. पुणे विभाग 746

 

बैठका, परिपत्रकांचा भडिमार तलाठी पदभरती संदर्भात जमाबंदी
आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख विभाग यांच्या अध्यक्षतेखाली टीसीएस तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत ४ मे २०२३ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात माहिती अजूनही माहिती समोर येऊ शकलेली नाही. त्यामुळे तलाठी पदभरती संदर्भात फक्त कागदी घोडे नाचवून विविध परिपत्रकांच्या भडिमारामुळे उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यापुढे कुठलेही परिपत्रक जाहीर न करता सरळ जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.

 

अGR डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करावे.

 

जाहिरात पहा    


Talathi Recruitment 2023

तलाठी भरती प्रक्रिया ४९९७ जागेंसाठी पुढील महिनात सुरु होणार

  1. पेसा क्षेत्रात सर्वच तलाठी पदे ही अनुसूचित जमाती या प्रवर्गातून भरावयाची असा राज्यापालांचा यापूर्वीचा आदेश होता. त्यानुसार राज्यातील तब्बल ११ जिल्हे हे पेसा क्षेत्रात येत असल्याने या सर्व जिल्ह्यात सरसकटपणे अनुसूचित जमाती (एस.टी.) या प्रवर्गातूनच शासकीय विभागातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, शिक्षक अशी विविध पदांची भरती करण्यात येणार होती. परंतु, अनेक जिल्ह्यांत आदिवासींसह इतरही प्रवर्गांची लोकसंख्या असल्याने हा त्या लोकसंख्येवर अन्याय होता. त्याविरोधात तीव्र आक्षेप नोंदविण्यात आले. त्याचीच दखल घेत या निर्णयात बदल करण्याची मागणी झाल्यानंतर २०१९ साली राज्यपालांनी त्याबाबत अध्यादेशही दिले होते. यात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पदभरती करण्याबाबत अनुमती देण्यात आली. परंतु, त्याबाबत शासन आदेशाची प्रतीक्षा होती. त्यामुळे तलाठी भरतीची डिसेंबरपूर्वीच घोषणा होऊन अन् एप्रिलपर्यंत भरती पूर्ण करण्याची घोषणाही तांत्रिक कारणामुळे हवेतच विरली.
  2. अखेर २०२३ मध्ये प्रक्रिया सुरू झाली. पेसाबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले. त्यात बिंदू नामावलीसह इतरही काही दुरुस्त्या आहेत का? बिंदू नामावली प्रमाणे रिक्त पदे किती? रिक्त पदांमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती याची संपूर्ण माहिती विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात आली होती.
  3. त्यांच्याकडून अहवाल येणे प्रलंबित असल्यानेच भरतीबाबत घोषणा करूनही ती तत्काळ करणे शासनाला शक्य झाले नव्हते. ही रखडून पडलेली भरती आता नुकताच शासन निर्णय जाहीर झाल्याने लवकरच जात प्रवर्गानुसार तलाठी पदांची फेर संख्या निश्चित करून भरती पूर्ण करण्याचे सूतोवाच शासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे तलाठीसह १७ संवर्गांच्या भरतीचा प्रश्न निकाली निघाला आहे.

आदिवासी लोकसंख्येनुसार अशी होणार पदभरती

  • ५० टक्क्यापेक्षा अधिक : एस.टी. प्रवर्गातूनच १०० टक्के तलाठी पदे भरणार
  • २५ ते ५० टक्क्या दरम्यान आदिवासी लोकसंख्येसाठी : ५० टक्के पदांची संधी
  • २५ टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या असल्यास : २५ टक्के पदे भरणार जागा वाढणार प्रमाणानुसार ही पदे भरली जातील.
  • एस. टी. प्रवर्गाची लोकसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांत सर्वसाधारणसह एस.सी, ओबीसी व इतर घटकांच्या जागा वाढतील.

राज्यातील 36 जिल्ह्यांत सुमारे साडेचार हजारांहून अधिक तलाठ्यांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी राज्यातील 11 आदिवासी जिल्ह्यातील पेसा क्षेत्राची कोणती लोकसंख्या धरायची याची बिंदू नामावली काढण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शन मागविले आहे. त्यामुळे तलाठीपदांची भरती लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात 36 जिल्हे असून, महसूल विभागानुसार कामकाज सुरू असते. याच महसूल विभागांतर्गत अगदी गावपातळीवर तलाठी यांच्यामार्फत सर्व कारभार सुरू असतो. मात्र, राज्यात सुमारे 4 हजार 600 हून अधिक तलाठ्यांची पदे रिक्त आहेत.

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

तलाठी भरती,

Talathi Recruitment 2023,

Talathi Bharti 2023,

talathi bharti 2022,
talathi bharti – तलाठी भरती,
talathi bharti 2023,
talathi bharti,
talathi bharti 2023 online form date,
talathi bharti 2022 online form date,
talathi bharti 2022 online form date maharashtra,

talathi bharti 2022 application form,

talathi bharti 2022 exam date,

talathi bharti question paper,

talathi bharti 2022 online form last date,

talathi bharti 2022 syllabus,

talathi bharti syllabus,

talathi bharti 2023 online form link,

talathi bharti previous year question paper,

Talathi Bharti New Update

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम