Krushi Sevak Recruitment 2023 Update : कृषी सेवक भरतीचे वेळापत्रक आले, ऑनलाईन अर्ज सुरु होण्याच्या तारखा जाहीर!
Krushi Sevak Recruitment 2023 Update
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Krushi Sevak Recruitment 2023 Update
Krushi Sevak Recruitment 2023 Update : कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक- ११ ऑगस्ट, २०२३ ते दिनांक- १४ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये जाहिराती विभागस्तरावरून प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत, त्यानुषंगाने सदर पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची माहिती खालीलप्रमाणे.
अर्ज करण्याची पध्दत
प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्यात येईल.
१.२ पात्र उमेदवाराला वेब आधारीत (web-based) ऑनलाईन अर्ज www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाद्वारे दि. १४ सप्टेंबर, २०२३ ते दि. ०३ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.
१.३ विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
२. ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचनाः
अर्ज सादर करण्याचा कालावधी
- ऑनलाईन आवेदन पत्र (Web Based) सादर करावयाचा कालावधी – दि. १४ सप्टेंबर, २०२३
- ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक- दि. ०३ ऑक्टोबर, २०२३
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
कृषी सेवक आवेदन पत्र भरण्याबाबतच्या सूचना पहा
लवकरच 2070 कृषी सेवकांची भरती होणार… | Krushi Sevak Recruitment 2023
Krushi Sevak Recruitment 2023
राज्याच्या कृषी विभागातील कृषी सेवकांच्या रिक्त असलेल्या दोन हजार ५८८ जागांपैकी दोन हजार ७० जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. या रिक्त जागा सरळसेवेच्या कोट्यातील असल्याने आणि या संवर्गातील रिक्त पदांचा आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नसल्याने, एकूण रिक्त जागांपैकी ८० टक्के जागाच भरण्यात येत आहेत. यानुसार कृषी विभागाच्यावतीने दोन हजार ७० जागांच्या भरतीच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी मिळताच, याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले.
कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारित येत असलेली ‘गट-क’ मधील विविध संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया याआधीच सुरु करण्यात आली आहे. या पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच ‘पेसा’ क्षेत्रातील रिक्त पदे निश्चित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असल्याचे चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झाला नसल्यामुळे याबाबतच्या अध्यादेशातील तरतुदीनुसार वाहनचालक व गट-ड संवर्गातील रिक्त जागा वगळून सरळसेवा कोट्यातील अन्य रिक्त पदांच्या ८० टक्के जागा भरण्यात येणार आहेत. ‘गट-क’ संवर्गातील सरळसेवा भरतीची प्रक्रिया आयबीपीएस या कंपनीच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. या संस्थेसमवेत भरतीबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार वरिष्ठ लिपिक, सहायक अधिक्षक, लघुलेखक (निम्नश्रेणी) व लघुलेखक (उच्चश्रेणी) या संवर्गातील पदांच्या भरतीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्यातील आदिवासी क्षेत्रातील (पेसा) विविध १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याचा आदेश राज्यपाल रमेस बैस यांनी दिलेला आहे. राज्यपालांच्या या आदेशात कृषी सहायक संवर्गातील पदांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व लातूर या विभागातील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या अखत्यारितील पेसा क्षेत्रातील पदसंख्या निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी आहे. ही मान्यता न मिळाल्याने जाहिरात देता आलेली नाही. मात्र, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले.
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents