नवीन अपडेट- तलाठी भरती- महसूल विभाग भरतीची जाहिरात प्रकाशित होण्याच्या वाटेवर!
Maharashtra Talathi Bharti 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Maharashtra Talathi Bharti 2023
Maharashtra Talathi Bharti 2023 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने ७५ हजार जागांवर मेगाभरती करण्याचा संकल्प केला असला तरी अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि वारंवार आश्वासन देण्यात आलेल्या तलाठी पदभरतीची जाहिरात अद्यापही न आल्याने सर्वसामान्य पदवीधरांचा प्रचंड हिरमोड झाला आहे. राज्यात तलाठीच्या ४११२ जागा रिक्त असतानाही महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे पदभरती रखडली आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाजमाध्यमांवर तसेच डिसेंबर २०२२ मधील विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्नोत्तरामध्ये तलाठी पदभरती करण्याचे सूतोवाच केले असले तरी पदभरतीचा मुहूर्त जुळून आलेला नाही. जिल्हा निवड समितीद्वारे २०१५च्या आधीपर्यंत तलाठी पदभरती ही एखादा अपवाद सोडल्यास दरवर्षी होत असे. परंतु २०१६ आणि त्यानंतर थेट २०१९ मध्ये पदभरती घेण्यात आली. त्यानंतर २०१९ पासून अद्यापही भरती झालेली नाही. नवीन अपडेट नुसार सध्या भरतीच्या हालचालींना वेग आला असून लवकरच तलाठी भरती अपेक्षित आहे.
महसूल व वन विभागाचा डिसेंबर २०२२च्या शासन निर्णयानुसार नव्याने ३११० तलाठी पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली होती. पूर्वीच्या १०१२ रिक्त पदांसह ४११२ पदांची भरती करण्याचे शासनाद्वारे वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, भरती प्रक्रिया अद्यापही रेंगाळलेली आहे. शिंदे- फडणवीस सरकारने पारदर्शक पदभरतीसाठी टीसीएस आणि आयबीपीएससारख्या विश्वासू संस्थांची निवड २०२२ च्या शासन निर्णयाद्वारे केली. त्यानंतर तलाठी भरतीला गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, अद्याप काहीच झालेले नाही.
बैठका, परिपत्रकांचा भडिमार तलाठी पदभरती संदर्भात जमाबंदी
आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख विभाग यांच्या अध्यक्षतेखाली टीसीएस तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत ४ मे २०२३ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात माहिती अजूनही माहिती समोर येऊ शकलेली नाही. त्यामुळे तलाठी पदभरती संदर्भात फक्त कागदी घोडे नाचवून विविध परिपत्रकांच्या भडिमारामुळे उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यापुढे कुठलेही परिपत्रक जाहीर न करता सरळ जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
तलाठी भरती,
महसूल विभाग भरती,
तलाठी भरती अपडेट,
Maharashtra Talathi Bharti 2023,
Talathi Bharti 2023
Table of Contents