चालू घडामोडी : 10 जानेवारी 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs :10 january 2020 | चालू घडामोडी : 10 जानेवारी 2020
चालू घडामोडी – काश्मीरच्या स्थितीचा आढावा घेणार १६ देशांचे प्रतिनिधी
- अमेरिकेचे राजदूत केन जस्टर यांच्यासह १६ देशांच्या राजदूतांना केंद्र सरकार काश्मीरचा आढावा दौरा घडवणार आहे. गुरुवारपासून सुरु होणारा हा दौरा दोन दिवस चालणार आहे.
- ५ ऑगस्ट २०१९ रोजी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर परदेशी राजदूतांचा हा पहिलाच अधिकृत दौरा आहे.
- परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, विविध देशांच्या दिल्लीस्थित दुतावासात नियुक्तीवर असलेले हे राजदूत गुरुवारी पहिल्यांदा श्रीनगर येथे जातील आणि तिथली परिस्थिती जाणून घेतील.
- त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जम्मूला भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते उपराज्यपाल जी. सी. मुर्मू आणि सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांची भेट घेतील.
- या प्रतिनिधीमंडळात अमेरिका, बांगलादेश, व्हिएतनाम, नॉर्वे, मालदीव, दक्षिण कोरिया, मोरोक्को, नायजेरिया आणि इतर देशांचे राजदूत सहभागी होणार आहेत.
- ब्रझीलच्या राजदूतांनाही या दौऱ्यावर जायचे होते परंतू दिल्लीत महत्वाचे काम असल्याने त्यांनी दौऱ्यातून माघार घेतली.
- यापूर्वी युरोपियन संघाच्या २३ खासदारांनी जम्मू-काश्मीर राज्याचा दौरा केला होता तसेच कलम ३७० रद्द केल्यानंतरच्या तिथल्या परिस्थितीची माहिती जाणून घेतली होती.
- मात्र, या दौऱ्याचे आयोजन आणि व्यवस्था एका एनजीओच्यावतीने करण्यात आली होती.
चालू घडामोडी – ३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन
- संसदीय व्यवहाराच्या मंत्रिमंडळ समितीने ३१ जानेवारी रोजी संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन घेण्याची शिफारस केली आहे. ३१ जानेवारी ते ३ एप्रिल या कालावधीत संसदेचे अधिवेशन पार पडेल, असे सांगण्यात येत आहे.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. संसदेचे हे अर्थसंकल्पी अधिवेशन दोन सत्रांत बोलावले जाणार आहे.
- नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येतो.
केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारसीनंतर राष्ट्रपती संसदीय अधिवेशन सुरू करण्याचे निर्देश देतात. - राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतरच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे पहिले बजेट असणार आहे.
- दरम्यान, जागतिक पातळीवरील आर्थिक मंदीची झळ देशालाही सहन करावी लागत आहे. देशातील मंदीचे ढग गडद होताना दिसत आहे.
- २०१९-२० मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर ५ टक्केच राहण्याचा अंदाज खुद्द सरकारकडून वर्तविला गेला आहे. बाजारपेठेत वस्तू व सेवांची ग्राहकांकडून घसरलेली मागणी अद्यापही रुळावर येण्याची शक्यता नसून खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीचा ओघही रोडावताच राहण्याचे भाकीत केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने वर्तविले आहे.
चालू घडामोडी – नाशिकचा हर्षवर्धन ठरला यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’
- नाशिकचा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पुण्यातील बालेवाडीत पार पडलेल्या ६३व्या कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेवर ३-२ने विजय मिळवत हा किताब पटकावला आहे.
- हर्षवर्धनचा विजय होताच मैदानात एकच जल्लोष करण्यात आला.
- यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हर्षवर्धनला मानाची गदा देऊन गौरविण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही पैलवान पुण्याच्या काका पवारांच्या तालमितील आहेत.
- पुण्याच्या बालेवाडीत ६३व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली.
- कालच्या सामन्यात गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी विजेता बाला रफिक शेख आणि उप महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांचा धक्कादायक पराभव झाला होता.
- त्यामुळे आज नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर आणि लातूरच्या शैलेश शेळकेमध्ये होणाऱ्या अंतिम लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents