मैदानी चाचणी संपली, पोलीस भरती लेखी परीक्षा दोन एप्रिलला !
Pune Police Bharti 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Pune Police Bharti 2023
Pune Police Bharti 2023 :
शहर पोलिस दलामध्ये भरती प्रक्रिया सुरू असून, इच्छुक उमेदवारांची मैदानी चाचणी शुक्रवारी पूर्ण झाली. त्यानंतर पोलिस शिपाई पदासाठी दोन एप्रिल रोजी लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती पोलिस दलाकडून देण्यात आली. दरम्यान, या भरती प्रक्रियेत पहिल्यांदाच पाच तृतीयपंथीयांनी सहभाग नोंदविला आहे. पुणे शहर पोलिस दलासाठी ‘पोलिस भरती-२०२१’ प्रक्रियेस तीन डिसेंबर रोजी प्रारंभ झाला. इच्छुक उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर शारीरिक चाचणीसाठी मैदानी परीक्षा घेण्यात आली.
यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मेरीट यादी पाच-सहा दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस मुख्यालयातील अधिकारी दशरथ हटकर यांनी दिली. दरम्यान, गृह विभागाच्या परिपत्रकानुसार पोलिस चालकपदाची लेखी परीक्षा २६ मार्च रोजी होणार आहे. तर, पोलिस शिपाई पदाची लेखी २ एप्रिल रोजी घेतली जाणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ९ डिसेंबर २०२२ रोजी दिलेल्या आदेशानंतर तृतीयपंथीयांना पोलिस भरतीमध्ये पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. पुणे शहर पोलिस दलामध्ये शिपाई आणि चालक भरतीसाठी नऊ तृतीयपंथीयांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. परंतु त्यापैकी एका महिला उमेदवाराने चुकून अर्ज भरला होता. तर, उर्वरित आठपैकी पाच तृतीयपंथीयांनी शुक्रवारी (ता. १७) मैदानी परीक्षेत सहभाग घेतल्याची माहिती पोलिस मुख्यालयाकडून देण्यात आली.
पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई चालक भरती प्रकीयेला 18 फेब्रुवारी पोसून सुरुवात झाली आहे. त्यातील महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रीया येत्या गुरुवार (दि.9 March 2023) पासून सुरु करण्यात येणार आहे. मध्यतंरी पोटनिवडणूक प्रक्रियेमुळे या भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती मात्र पुन्हा ही प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.
त्यानुसार गुरुवारी महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु होणार असून ज्या महिला उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्यांनी महा आयटी वेबसाईटवरून प्रवेशपत्र प्राप्त करावे. प्रवेशपत्रावरील तारखेनुसार शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करीता पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे उपस्थित रहावे, अशी माहिती पोलीस उप आयुक्त रोहिदास पवार यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती लेखी परीक्षा,
पोलीस भरती,
Pune Police Bharti 2023,
मैदानी चाचणी
Table of Contents