मोठी बातमी! ३२,००० हजार शिक्षक भरतीचं वेळापत्रक फायनल

Maharashtra Shikshak Recruitment 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,550

Maharashtra Shikshak Recruitment 2023

 

खासगी संस्थांना मुलाखतीचे बंधन खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकांची पदे भरताना एका पदासाठी तीन उमेदवारांना राज्य स्तरावरूनच मुलाखतीसाठी त्या संस्थेत पाठविले जाणार आहे. त्या तिघांमधून एकाची मुलाखतीद्वारे निवड करायची आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील भरतीसाठी उमेदवारांना कितीही जिल्हे तथा शाळांची निवड करण्याचे स्वातंत्र्य असणार आहे.सोलापूर : राज्यातील खासगी अनुदानित शैक्षणिक संस्था व जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक भरतीला आता प्रारंभ झाला आहे. जानेवारीअखेर ३२ हजार पदांची भरती होणार आहे. आता संस्था व जिल्हा परिषद शाळांना रिक्त पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी तीन आठवड्यांची (७ नोव्हेंबरपर्यंत) मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर उमेदवारांकडून प्रत्येक प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत. 

 

जिल्हा परिषदांच्या जवळपास ६३ हजार शाळांमध्ये ३० हजारांवर शिक्षक तर खासगी संस्थांमध्येही १५ हजारांवर शिक्षक कमी आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक नसतानाही तब्बल साडेसहा-सात वर्षे जिल्हा परिषद शाळांचा गाडा तसाच ओढला जात होता. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मोठी शिक्षक भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

 

आता जिल्हा परिषद शाळांमधील अंदाजे २३ हजार आणि खासगी अनुदानित संस्थांमधील सात ते नऊ हजार पदांची भरती सुरु झाली आहे. १६ ऑक्टोबरपासून संस्थांसह ज्या जिल्हा परिषदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम झाली, त्यांना पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्याचे आदेश निघाले आहेत. तीन आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. दरम्यान, सध्या राज्यातील २४ जिल्ह्यांची बिंदुनामावली अंतिम झाली असून आणखी दहा जिल्हा परिषदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून पडताळली जात आहे.

 

‘या’ जिल्ह्यांची बिंदुनामावली पडताळणी
सोलापूर, लातूर, सातारा, जालना, अकोला, यवतमाळ, वाशिम, पुणे या जिल्ह्यांची बिंदुनामावली सध्या मागासवर्गीय कक्षाकडून पडताळली जात आहे. काही शिक्षकांच्या मान्यता, नेमणूक कधीपासून, कोणत्या प्रवर्गातून झाली या बाबी तपासल्या जात आहेत. काही प्रकरणातील अर्धवट कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जात आहे. आठ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल.

 

भरती प्रक्रियेचे टप्पे…

  • – १६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत ‘पवित्र’वर जाहिराती अपलोड करणे
  • – १५ नोव्हेंबरनंतर तीन आठवड्यात उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरून देणे
  • – डिसेंबरअखेर ते ३० जानेवारीपर्यंत गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांना नेमणुका

 

खासगी संस्थांना मुलाखतीचे बंधन
खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकांची पदे भरताना एका पदासाठी तीन उमेदवारांना राज्य स्तरावरूनच मुलाखतीसाठी त्या संस्थेत पाठविले जाणार आहे. त्या तिघांमधून एकाची मुलाखतीद्वारे निवड करायची आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील भरतीसाठी उमेदवारांना कितीही जिल्हे तथा शाळांची निवड करण्याचे स्वातंत्र्य असणार आहे.

 

 


देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा!! राज्यात येत्या तीन महिन्यात ३० हजार शिक्षकांची भरती । Maharashtra Shikshak Recruitment 2023

Maharashtra Shikshak Recruitment 2023

राज्यात येत्या तीन महिन्यात शिक्षकांची ३० हजार पदे भरली जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केली. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Devendra fadnavis on teachers recruitment: येत्या तीन महिन्यात राज्यात ३० हजार शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस म्हणाले की, २०१२ पासून शिक्षकांची भरती प्रक्रिया बंद होती. तेव्हापासूनची रिक्त पदे नव्या शैक्षणिक सत्रापूर्वी भरली जातील.

देशाच्या स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार नोकरभरती केली जाणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने दोन महिन्यापूर्वी केली होती. मात्र अजूनपर्यंत एकही पदभरतीची जाहिरात काढण्यात आलेली नाही. मात्र अशातच आता फडणवीसांनी ३० हजार शिक्षकांच्या भरती करण्याची घोषणा केली आहे.

 

फडणवीस म्हणाले की, सर्वच जिल्ह्याकडून वाढीव मागण्या आल्या आहेत. मात्र आचारसंहिता असल्यामुळे सर्वच मागण्या मान्य करणे किंवा नव्या घोषणा करणे शक्य नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात नियोजन विभागाची बैठक पार पडली. यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

राज्यात शिंदे फडणवीस सरकारचा शपथविधी झाल्यानंतर तत्काळ ७५ हजारपदांच्या नोकर भरतीची घोषणा केली होती. मात्र, अजूनपर्यंत कुठलीच भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे ७५ हजार पदांची भरती म्हणजे नुसते गाजर असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. जानेवारी महिन्यात जर भरती प्रक्रिया सुरु झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिला आहे. त्यानंतर नुकतीच राज्यसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

 

महाराष्ट्रात एकूण रिक्तपदांची संख्या लाखांच्या जवळपास आहे. मात्र भरती प्रक्रिया ठप्प असल्याने याविरोधात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आपल्या मागण्यांसाठी मोहीम सुरु केली आहे.

 

offer

App Download Link : Download App

Maharashtra Shikshak Recruitment 2023


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

शिक्षकांची भरती,

देवेंद्र फडणवीस,

Maharashtra Shikshak Recruitment 2023,Maharashtra Shikshak Recruitment 2023

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम