दिनविशेष : १४ जानेवारी [भूगोलदिन / अयनदिन / संक्रमणदिन]
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
- भूगोलदिन
- अयनदिन
- संक्रमणदिन
१४ जानेवारी : जन्म
१८८२: संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणावर काम करणारे कृतीशील विचारवंत रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९५३)
१८८३: जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर निना रिकी यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९७०)
१८९२: भारतीय क्रिकेटपटू दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट १९९३)
१८९६: भारताचे अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८२)
१९०५: मराठी अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९९१)
१९०८: ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत द्वा. भ. कर्णिक यांचा जन्म.
१९१९: गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी यांचा जन्म. (मृत्यू: १० मे २००२)
१९२३: अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००९)
१९२६: ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांचा जन्म.
१९३१: ऊर्दू शायर सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट २००८)
१९७७: भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर नरेन कार्तिकेयन यांचा जन्म.
१४ जानेवारी : मृत्यू
१७४२: धुमकेतू साठी प्रसिद्ध असलेले ब्रिटीश अंतरीक्षशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १६५६)
१७६१: पानिपतच्या तिसर्या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १७३०)
१७६१: पानिपतच्या ३ र्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचे निधन. (जन्म: २ मार्च १७४२)
१८९८: इंग्लिश लेखक आणि गणितज्ञ लुईस कॅरोल यांचे निधन.
१९२०: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८६४)
१९९१: संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९१७)
२००१: माहितीपट निर्माते फली बिलिमोरिया यांचे निधन.
१४ जानेवारी : महत्वाच्या घटना
१७६१: मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे
भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.
१९२३: विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
१९४८: लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.
१९९४: मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.
१९९८: ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर.
२०००: ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents