दिनविशेष : २ जानेवारी २०२२

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
192

  २ जानेवारी : जन्म

१९२०: अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल १९९२)

१९३२: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९८५)

१९५९: भारीतय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा जन्म.

१९६०: भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा यांचा जन्म

 २ जानेवारी : मृत्यू

१३१६: दिल्लीचे सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यांचे निधन.

१९३५: स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १८८६)

१९४३: हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे निधन.

१९४४: अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८७३)

१९५२: व्यक्तींचे पुतळे करणारे महान शिल्पकार जो डेव्हिडसन यांचे निधन.

१९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचे निधन.  (जन्म: १२ एप्रिल १९५४)

१९९९: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या विमला फारुकी यांचे निधन.

२००२: पर्यावरणवादी अनिल अग्रवाल यांचे निधन.

२०१५: भारतीय शास्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे निधन

२ जानेवारी  : महत्वाच्या घटना

१७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.

१८८१: लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.

१८८५: पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.

१९०५: मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला.

१९३६: मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.

१९४५: दुसरे महायुद्ध – जर्मनीच्या वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी फ्रेंच, बेल्जियम आणि हॉलंड मधील विमानतळांवर हल्ले केले.

१९५१: रशियाने ल्युना-१ हे अंतरिक्षयान चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.

१९५४: राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली.

१९८५: पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन.

१९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या.

१९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान केली.

१९९९: अमेरिकेत हिमवादळात मिल वॉकीमध्ये१४ इंच टर शिकोगामध्ये १९ इंच हिम पडला. शिकागोचे तापमान -‌‍१३°F इतके कमी झाले.

२०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.

२०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम