शुभमंगल सामुहिक विवाह योजना
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
शुभमंगल सामुहिक विवाह योजना
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या / शेतमजुरांच्या मुलीच्या सामुहिक विवाहासाठी त्याचप्रमाणे नोंदणीकृत विवाहासाठी शुभमंगल सामुहिक विवाह योजना शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. सदर योजना ही ग्रामीण भागातील शेतकरी / शेतमजुर यांच्या मुलीसाठी त्याचप्रमाणे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी या योजनेतून अनुदान देण्यात येते.
योजनेच्या प्रमुख अटी :
सदर योजनेंतर्गत पात्र ठरण्यासाठी विदयार्थ्यांच्या पालकांचे वार्षिंक उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असून विद्यार्थ्याने मागील वर्षात 50 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे :
▪ जमिनीचा 7/12 उतारा
▪ रहिवासी दाखला
▪ उत्पन्नाचा दाखला
लाभाचे स्वरूप असे :
● या योजनेंतर्गत शेतकरी / शेतमजुर यांच्या कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसुत्र व इतर वस्तुंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपे 10 हजार रुपये अनुदान दिले जाते.
● सामुहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रती जोडप्यामागे 2 हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते.
योजना जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत (DPDC) मार्फत राबविली जाते.
● शुभमंगल सामुहिक विवाह योजनेची व्याप्ती वाढवून, ती केवळ शेतकरी / शेतमजुर यांच्यासाठी न ठेवता अ.जा. / अ.ज./ वि.जा. / भ.ज. / वि.मा.प्र. वगळता अन्य प्रवर्गातील राज्यातील 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या सर्व निराधार / परित्यक्ता / विधवा महिलांच्या फक्त 2 मुलींच्या विवाहाकरीता अनुज्ञेय आहे.
या ठिकाणी संपर्क साधावा :
जिल्हा नियोजन विकास समिती (DPDC)