शाहू फुले आंबेडकर पारितोषिक योजना
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
शाहू फुले आंबेडकर पारितोषिक योजना
महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील योगदानामूळे महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रगत सामाजिक सुधारणावादी राज्य म्हणून घेतले जाते. अशा सामाजिक न्याय क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्थांना शाहू फुले आंबेडकर पारितोषिक देण्यासाठी सदर योजना राबविली जाते.
योजनेच्या प्रमुख अटी :
• समाजकल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणारी नोंदणीकृत संस्था असावी.
• सामाजिक सेवेचा कालावधी 15 वर्षे असणे आवश्यक.
• संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांचा पोलीस अधिक्षक / पोलीस आयुक्त यांचेकडील चारित्र्य पडताळणी अहवाल.
आवश्यक कागदपत्रे :
• चारित्र्य पडताळणी अहवाल.
• संस्था नोंदणी प्रमाणपत्र.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
एकूण 6 विभागातील प्रत्येकी एक प्रमाणे 6 संस्थांना प्रत्येकी 15 लाखप्रमाणे पारितोषिकाची रक्कम देण्यात येते. स्मृतीचिन्ह, चांदीचास्क्रोल, सन्मानपत्र
या ठिकाणी संपर्क साधावा :
संबंधीत जिल्हयांचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय.