दिनविशेष : २२ डिसेंबर [राष्ट्रीय गणित दिन]
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
२२ डिसेंबर : जन्म
१६६६: शिखांचे १० वे गुरू गुरू गोविंद सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १७०८)
१८५३: भारतीय तत्त्वज्ञ सरदादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९२०)
१८८७: थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९२०)
१९२९: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर वझीर मोहम्मद यांचा जन्म.
१९४७: भारतीय क्रिकेटपटू दिलीप दोषी यांचा जन्म.
१९७१: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अजिंक्य पाटील यांचा जन्म.
२२ डिसेंबर : मृत्यू
१९४५: रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८६६)
१९७५: पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू झाला. (जन्म: ९ जून १९१२)
१९८९: आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक सॅम्युअल बेकेट यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९०६)
१९९६: संगीत समीक्षक व पत्रकार रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे यांचे निधन.
२००२: प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते दिलीप कुळकर्णी यांचे निधन.
२०११: मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९३७)
२२ डिसेंबर : महत्वाच्या घटना
६०९: मुहम्मद यांनी पहिल्या प्रकटीकरण प्राप्त करण्याचा दावा केला.
१८५१: भारतातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.
१८८५: सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले.
१९२१: भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले.
१९९५: प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्कर यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.
राष्ट्रीय गणित दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents