चालू घडामोडी : 14 डिसेंबर 2019
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 14 December 2019 | चालू घडामोडी : 14 डिसेंबर 2019
चालू घडामोडी – ‘दिशा’ विधेयक मंजूर; बलात्काऱ्यांना 21 दिवसात फाशी
- आंध्र प्रदेश विधानसभेने आज (दि.13) ‘दिशा विधेयक’ पारित केले आहे. बलात्काराच्या गुन्ह्याची प्रकरणे 21 दिवसात निकाली काढत दोषींना मृत्यूदंड देण्याची तरतूद यामध्ये आहे.
- महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून मृतदेह जाळण्याची घटना काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये घडली होती. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश सरकारने हे विधेयक पारित केले आहे.
- राज्याचे मुख्यमंत्री वाय.एस.जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटने हे ‘दिशा’ विधेयक मंजूर केले आहे.
काय आहे तरतूद?
- ‘दिशा’ विधेयकात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल झाल्यापासून
21 दिवसात सुनावणी पूर्ण करावी लागणार आहे. - विधेयकात भारतीय दंड विधानाच्या 354 कलमात दुरुस्ती करण्यात आली असून 354 (ई) हे कलम बनवण्यात आलं आहे.
- या प्रकारच्या प्रकरणात साक्षीपुरावे आहेत, तेथे तपास 7 दिवसांत पूर्ण करावा लागणार आहे.
- 14 दिवसांत कोर्टात सुनावणी झाल्यानंतर 21 दिवसात शिक्षा देण्यात येण्याची तरतूद यामध्ये आहे.
चालू घडामोडी – मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
- मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
- सहाव्या भारत-मालदीव संयुक्त आयोगाच्या बैठकीसाठी अब्दुल्ला शाहिद भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत.
- मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पहिल्या वर्षात केलेल्या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवचे परराष्ट्र मंत्री शाहिद यांच्याकडे प्रशंसा केली. भारत आणि मालदीव यांच्यातील वाढत्या सहकार्याबद्दल आणि गेल्या वर्षभरातल्या द्विपक्षीय सहकार्याच्या सकारात्मक परिणामांबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले
चालू घडामोडी – दिल्लीत आर्थिक जनगणनेस प्रारंभ
- राजधानी दिल्लीत सातव्या आर्थिक जनगणनेला शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला.
- सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत “कॉमन सर्व्हिस सेंटर’ (सीएससी) या “एसपीव्ही’शी करार केला आहे.
- प्रथमच संपूर्ण जनगणना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर एका ऍप्लिकेशनच्या सहाय्याने आयोजित केली जात आहे; जी अचूकता व डेटा सुरक्षितता सुनिश्चित करेल.
- दिल्ली हे 26वे राज्य आहे, जेथे सर्वेक्षण सुरू केले गेले आहे, तर 20 राज्यांमध्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशात प्रक्रिया सुरू आहे.
चालू घडामोडी – ब्रिटनच्या पंतप्रधानपदी पुन्हा बोरिस जॉन्सन
- ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत हुजूर पक्षाने (Conservative Party) दणदणीत विजय मिळवला आहे.
- ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्त्वात हुजूर पक्षाने बहुमताचा ३२६ हा आकडाही पार केला.
- १९८० च्या दशकात मार्ग्रेट थॅचर यांच्या काळातील विजयानंतर हुजूर पक्षासाठी हा सर्वात मोठा विजय मानला जातो.
- भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी ११ वाजता हाऊस ऑफ कॉमन्सच्या एकूण ६५० जागांपैकी ६४२ जागांचे निकाल जाहीर झाले होते.
- यापैकी बोरिस जॉन्सन यांच्या हुजूर पक्षाने ३५८ जागा मिळवल्या होत्या. तर मजूर पक्षाने यापैकी २०३ जागांवर विजय मिळवला.
# Current Affairs
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents