चालू घडामोडी : 12 डिसेंबर 2019

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
109

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 12 December 2019 | चालू घडामोडी :12 डिसेंबर 2019

चालू घडामोडी – कॅबिनेटने विमान (दुरुस्ती) विधेयक 2019 ला मंजुरी दिली

  • विमान दुरुस्ती विधेयकात कायद्याच्या कक्षेत हवाई वाहतुकीसाठी सर्व क्षेत्राचे नियम आणण्याचा प्रस्ताव आहे. ही सुधारणा आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संस्था – आयसीएओच्या सुरक्षा परिस्थितीस देखील पूर्ण करेल.
  • हे भारतातील तीनही विमानन नियामक – डायरेक्टरेट जनरल ऑफ एव्हिएशन (डीजीसीए), ब्युरो ऑफ सिव्हिल एविएशन सिक्युरिटी (बीसीएएस) आणि विमान अपघात अन्वेषण ब्यूरो (एएआयबी) यांना त्यांची भूमिका अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्यास मदत करेल.
  • नागरी उड्डयन मंत्रालयाने १ जुलै, २०१ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, विमान कायद्यानुसार दोन श्रेणी कारावास किंवा १० लाख दंड किंवा दोन्ही कलम १ च्या अंतर्गत दंडनीय गुन्ह्यासाठीची तरतूद आहे. यात नोंदीविना विमान उड्डाण करणे, उड्डाण करणे अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. हवाबंदपणाचे वैध प्रमाणपत्र नसलेले विमान, योग्य पायलट परवान्याशिवाय विमान उड्डाण करणे इ.

# Current Affairs


चालू घडामोडी – ICC T20I Ranking : विराट कोहली TOP 10 मध्ये दाखल, लोकेश राहुलचीही प्रगती

  •  विराट आपल्या १५ व्या स्थानावरुन थेट दहाव्या स्थानावर आला आहे.
  • विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. मुंबईतल्या अखेरच्या टी-20 सामन्यात विराट कोहलीने विंडीजच्या गोलंदाजांची पिसं काढली.
  • पहिल्या आणि अखेरच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या विराटला मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं. या कामगिरीचा ICC क्रमवारीत विराटला चांगलाच फायदा झालेला आहे.
  • तसेच याव्यतिरीक्त लोकेश राहुलच्या स्थानातही सुधारणा झाली आहे. नवव्या स्थानावरुन राहुल आता सहाव्या स्थानावर पोहचला आहे. मात्र रोहित शर्माची एका स्थानाने घसरण झाली असून तो नवव्या स्थानावर पोहचला आहे.
  • विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेनंतर आयसीसीने आपली अधिकृत क्रमवारी जाहीर केली आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर 15 दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खाते वाटप केले आहे.

  • उद्धव ठाकरे – मुख्यमंत्री
  • एकनाथ शिंदे (शिवसेना) – गृह, नगरविकास, पर्यावरण, पर्यटन आणि संसदीय कामे
  • सुभाष देसाई (शिवसेना) – उद्योग, उच्च व तंत्र शिक्षण, क्रीडा व युवा, रोजगार
  • जयंत पाटील (राष्ट्रवादी) – वित्त व नियोजन, गृहनिर्माण, अन्नपुरवठा व कामगार
  • छगन चंद्रकांत भुजबळ (राष्ट्रवादी) – ग्रामीण विकास, सामाजिक न्याय, जलसंपदा, राज्य उत्पादन शुल्क
  • बाळासाहेब थोरात (कॉंग्रेस) – महसूल, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय
  • नितीन राऊत (कॉंग्रेस) – ओबीसी विकास, महिला व बाल विकास व मदत व पुनर्वसन 

# Current Affairs


चालू घडामोडी – कायदा अस्तित्वात; विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

  • नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता याचं कायद्यात रूपांतर झालं आहे. गुरूवारी रात्री राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षरी केली. लोकसभेनंतर राज्यसभेतही या विधेकाला मंजुरी देण्यात आली आहे.
  • नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेतही आठ तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूनं १२५ तर, विरोधात १०५ मतं पडली. त्यानंतर गुरूवारी रात्री राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली. एएनआयनं यासंबंधीतील वृत्त दिलं आहे. धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९ मध्ये करण्यात आली आहे.
  • या दुरूस्तीचा कोणाला फायदा नाही ?
    श्रीलंकेतील तामिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही.

    देशातील कोणत्या भागाला असणार नाही हे लागू?
    ही दुरुस्ती घटनेच्या सहाव्या अनुसूचित समाविष्ट केलेल्या आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतील आदिवासी भागांना, तसेच बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन, १८७३ मध्ये अधिसूचित केलेल्या भागांना लागू असणार नाही.

    कोणत्या अटींमध्ये करण्यात आलेत बदल?
    सध्या कोणत्याही परदेशी व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतामध्ये कमीत कमी ११ वर्ष राहणं आवश्यक आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामध्ये ही अट शिथिल करून ती सहा वर्ष करण्यात आली आहे. यासाठी भारतीय नागरिकत्व कायदा, १९५५ मध्ये काही बदल करण्यात आलेत. ज्यामुळे भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्यांना कायदेशीररीत्या सोयीचं पडेल.

    आसाममध्ये हिंसक निदर्शनं
    नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आसाममध्ये हिंसक निदर्शनं सुरूच असून गुरुवारी गुवाहाटीत कथित पोलीस गोळीबारात दोन जण ठार झाले. निदर्शक आणि सुरक्षा दलांचे जवान यांच्यात रस्त्यांवर संघर्ष उफाळला असून, राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरी समाजाचे नेते यांनी लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे. जखमींना जेथे आणण्यात आलं होतं, त्या गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दोघा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना राज्यातील परिस्थितीचे वर्णन ‘गंभीर’ असं केलं. तर, ‘परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र संपूर्ण राज्यभरात चकमकी झडत आहेत’, असं दुसऱ्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम