भूगोल – संपूर्ण महाराष्ट्र

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
553

महाराष्ट्र राज्याची स्थापना –  1 मे 1960 रोजी झाली.

  • एकुण जिल्हापरिषद 34.
  • विधानसभा आमदार 288 , विधानपरिषद आमदार 78, महा. लोकसभा सदस्य 48.
  • लोकसंख्येच्या बाबतीत 2 रा क्रमांक, क्षेत्रफळात 3 रा क्रमांक.
  • देशातील 9.29: लोकसंख्या महाराष्ट्रात राहाते.
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या ‘पुणे’ ( 94.3 लाख)
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्या ‘सिंधुदुर्ग’ (8.50 लाख)
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा गडचिरोली.
  • महाराष्ट्रातील कमी जंगल असलेला जिल्हा बीड.
  • महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा गोंदिया.
  • महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर.
  • महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर.
  • महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई 1646 मी.
  • महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी.
  • महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्रकिनारा रत्नागिरी.
  • जगातील 1 ले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपुर.
  • पहिला संपुर्ण डिजीटल जिल्हा नागपुर (आॅक्टोबर 2016)

 

भूगोल - संपूर्ण महाराष्ट्र

भौगोलीक परिस्थिती

  • अक्षवृत्तीय विस्तार- १५ अंश ०८ उत्तर ते २२ अंश- ०१ उत्तर अक्षांश
  • रेखावृत्तीय विस्तार- ७२ अंश ०६ पूर्व ते ८० अंश ०९ पूर्व रेखांश
  • क्षेत्रफळ- ०३,०७,७१३ चौ. किमी
  • महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.
  • समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.
  • लोकसंख्या- २०११ च्या जणगणना  ११,२३,७२,९७२,आहे.
  • राजधानी- मुंबई
  • उपराजधानी- नागपूर
  • सांस्कृतिक राजधानी – पुणे
  • ऐतिहासिक राजधानी- कोल्हापूर
  • पर्यटन राजधानी- औरंगाबाद

नैसर्गिक सीमा 

  • वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
  • उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
  • ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
  • पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
  • दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
  • पश्चिमेस : अरबी समुद्र.

राजकीय सीमा व सरहद्द 

  • वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
  • उत्तरेस : मध्यप्रदेश.
  • पूर्वेस : छत्तीसगड.
  • आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
  • दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.

जिल्हे निर्मिती 

  • स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके, 4 प्रशासकीय विभाग होते.
  • सध्यास्थितीत महाराष्ट्रात 36 जिल्हे, 355 तालुके, 535 शहरे, 43663 खेडी, 6 प्रशासकीय विभाग आहेत.
  • 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग 27 वा जिल्हा औरंगाबादपासून – जालना 28 वा जिल्हा
  • 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर 29 वा जिल्हा
  • 26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली 30 वा जिल्हा
  • 1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर 31 वा जिल्हा
  • 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार 32 वा जिल्हा  अकोल्यापासून – वाशिम 33 वा जिल्हा
  • 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली 34 वा जिल्हा  भंडारा  – गोंदिया 35 वा जिल्हा
  • 1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर 36 वा जिल्हा

प्रशासकीय  विभाग

महाराष्ट्राचे मुख्यतः ०६ प्रशासकीय  विभाग आहेत  ते खालील प्रमाणे

प्रशासकीय विभाग मुख्यालय समाविष्ट जिल्हे एकूण जिल्हे
कोकण नवी मुंबई मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर 7
पुणे पुणे पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर 5
नाशिक नाशिक नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर 5
अमरावती अमरावती अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम 5
नागपूर नागपूर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया 6
औरंगाबाद औरंगाबाद औरंगाबाद, जालना, परभणी, हिगोंली, नादेंड, लातूर, बीड, उस्मानाबाद 8

 प्रादेशिक विभाग

महाराष्ट्राचे मुख्यतः ०५ प्रादेशिक  विभाग आहेत  ते खालील प्रमाणे

प्रादेशिक विभाग समाविष्ट जिल्हे एकूण जिल्हे
कोकण मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड 7
पाश्चिम महाराष्ट्र पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर 7
खानदेशा/उत्तर महाराष्ट्र जळगाव, नंदुरबार, धुळे 3
विदर्भ नागपूर, चंदपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम 11
औरंगाबाद औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद 8

 प्रमुख घाट

घाटाचे नाव प्रमुख मार्ग
थळ/कसारा घाट मुंबई-नाशिक
बोरघाट मुंबई-पुणे
आंबा घाट कोल्हापूर-रत्नागिरी
फोंडा घाट कोल्हापूर- पणजी
कुंभाली घाट कराड-चिपळूण
आंबोली घाट बेळगाव-सावंतवाडी
माळशेज घाट आळेफाटा-कल्याण
खंबाटकी घाट पुणे-सातारा
दिवा घाट पुणे-बारामती
वरंद घाट भोरे-महाड
चंदनपुरी घाट पुणे-नाशिक

जलविद्युत प्रकल्प

जलविद्युत प्रकल्प ठिकाण नदी
कोयना जलविद्युत प्रकल्प सातारा कोयना
भातसा व वैतरणा जलविद्युत प्रकल्प ठाणे वैतरणा
जायकवाडी (नाथसागर) औरंगाबाद गौदावरी
एलदरी जलविद्युत प्रकल्प हिगोली पूर्णा
राधानगरी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर योगावती
पेच जलविद्युत प्रकल्प नागपूर पेंच
खोपोली रायगड
भिवपुरी रायगड
भिरा रायगड
भाटगर पुणे मुळा
पाणशेत पुणे मुळा
वरसगाव पुणे मुळा
भडारदरा अहमदनगर प्रवरा
उजनी सोलापूर भिमा
तिलारी कोल्हापूर

औष्णिक विद्युत प्रकल्प

औष्णिक विद्युत प्रकल्प ठिकाण क्षमता मेगावॅट
चोला ठाणे 118
तुर्भे नवीमुंबई 1330
एकलहरे नाशिक 910
परळी बीड 690
फेकरी जळगाव 482
पारस अकोला 62.5
कोराडी नागपूर 1100
खापरखेडा नागपूर 420
दुर्गापूर व बल्लारपूर चंद्रपूर 1840
डहाणू ठाणे 500

खनिज संपत्ती

खनिज जिल्हे
मँगनीज भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग भारतातच्या एकूण उत्पादनापैकी ४० % उत्पादन महाराष्ट्रात होते.
लोहखनिज चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग
बॉक्साइट कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिधुदुर्ग, सातारा, सांगली
क्रोमाईट भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग
चुनखडी यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली
डोलोमाईट यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, रत्नागिरी
तांबे चंद्रपूर
अभ्रक चंद्रपूर, नागपूर
सिलोका/इलेमिनाइट रत्नागिरी, सिंधुदुर्ग

धरणे

धरण नदी जिल्हा
भंडारदरा प्रवरा अहमदनगर
गंगापूर गोदावरी नाशिक
जायकवाडी गोदावरी औरंगाबाद
दारणा दारणा नाशिक
पानशेत अंभी पुणे
मुकशी मुळा पुणे
कोयना कोयना सातारा
तोतलाडोह पेंच नागपूर
भाटघर वेलवडी पुणे
माजलगाव सिंधफणा बीड
मोडकसागर वैतरणा ठाणे
बिंदुसरा बिंदुसरा बीड
येलदरी दक्षिण पूर्णा हिंगोली
खडकवासला मुठा पुणे
पुरमेपाडा बोरी धुळे
राधानगरी भोगावती कोल्हापूर

तुम्हाला माहिती आहे?

  • भारताला सर्वात जास्त जीडीपी महाराष्ट्र राज्यच देतो.
  • भारतात सर्वात जास्त औद्योगिकरण आजवर महाराष्ट्राचेच झाले आहे.
  • भारतात महाराष्ट्राची ओळख सर्वात श्रीमंत राज्य म्हणुन आहे, याची राजधानी मुंबई असुन हे भारतातील सर्वात मोठे शहर आहे शिवाय देशाची आर्थिक राजधानी म्हणुन देखील ओळखल्या जाते.
  • मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या विरूध्द अविरत संघर्ष केला, 1680 पर्यंत एक महान योध्दा म्हणुन त्यांची ओळख त्यांनी निर्माण केली होती, भारतात उत्तम शासनकत्र्यांमधे त्यांची गणना केली जाते.
  • महाराष्ट्र, भारतिय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे एक प्रमुख केंद्र आहे ज्यामुळे राज्याला दरवर्षी देश विदेशातुन करोडो रूपयांचा महसुल प्राप्त होतो.
  • देशातले सगळयात मोठे शेअर मार्केट महाराष्ट्रात मुंबईमधे स्थित आहे.
  • देशातली सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ महाराष्ट्रातील नाशिक जिल्हयात आहे शिवाय जगभरात लागणा.या एकुण कांदयापैकी जवळजवळ अध्र्या कांद्याचे उत्पादन फक्त नाशिक जिल्हयातच होते.
    भारतात रेल्वे सर्वात आधी महाराष्ट्रात 16 एप्रील 1853 ला मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती.
  • मुंबई मधे वाढत्या लोकसंख्येला पाहाता जगातील पहिले योजनाबध्द शहर नवी मुंबईत वसवल्या केले गेले आहे. नव्या मुंबईची निर्मीती 1972 साली करण्यात आली.
  • महाराष्ट्रात बुलढाणा जिल्हयातील लोणार सरोवर खा.या पाण्याकरता प्रसिध्द आहे या सरोवराची निर्मीती एक उल्का पृथ्वीला धडकल्याने झाली आहे. अश्या पध्दतीने तयार झालेले हे बहुदा एकमेव सरोवर आहे.
  • महाराष्ट्रातील शनी शिंगणापुर असे तिर्थस्थळ आहे की या गावी कुणाच्याच घराला दरवाजे नाहीत. चोरी केल्यास चोराला शनीच्या प्रकोपाला सामोरे जावे लागेल अशी मान्यता असल्याने इथे चोरी होत नाही.
  • मोठमोठया कंपन्यांची हेडक्वाॅर्टर्स सर्वात जास्त मुंबईत आहेत. मुंबई महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भारतातील 5 वे मोठे शहर आहे.
  • महाराष्ट्रात जवळपास 350 किल्ले आहेत आणि ही या राज्याकरता गौरवाची बाब आहे. यातले जास्तीत जास्त किल्ले महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज  यांच्याशी निगडीत आहेत.
  • औरंगाबाद जिल्हयातील अजिंठा वेरूळ च्या लेण्या विश्वप्रसिध्द आहेत, या लेण्या नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु राहिल्या आहेत. येथील चित्रकला आणि मुत्र्या अतिशय सुबक आणि सुरेख आहेत.
  • चित्रपटसृष्टी मंुबईत असल्याने महाराष्ट्राला वेगळच वलय प्राप्त झालं आहे. बरेचसे कलाकार मुंबईत वास्तव्याला असल्याने देखील पर्यटकांना महाराष्ट्र कायम खुणावत असतो.
  • भारतात बनलेला पहिला चित्रपट महाराष्ट्रातील दादासाहेब फाळके यांनी नाशिक जिल्हयात तयार केला होता.
  • महाराष्ट्र भारतातील एकमेव असे राज्य आहे ज्यात दोन मेट्रो सिटी आहेत एक मुंबई आणि दुसरे पुणे.
  • पुण्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका एशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणुन प्रसिध्द आहे.
  • महाराष्ट्रातील नागपुर राज्याची राजधानी नसुनही येथे रिझर्व बॅंक आॅफ इंडियाची शाखा आहे.
  • गणेशचतुर्थी हा महाराष्ट्रातील महत्वपुर्ण उत्सव आहे. हा उत्सव संपुर्ण दहा दिवस मोठया भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

 

 

 

 

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम