चालू घडामोडी : 04 डिसेंबर 2019

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
109

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 04 December  2019  | चालू घडामोडी :  04 डिसेंबर 2019

चालू घडामोडी – सिंगापूर-भारताचा संयुक्त हवाई सराव 

  • सिंगापूरच्या हवाई दलाने भारतासमवेत प्रशिक्षण सरावासाठी प्रगत एफ १६ लढाऊ विमाने तैनात केली असून भारतीय हवाई दलाची सहा सुखोई लढाऊ विमाने या प्रशिक्षणात सहभागी होत आहेत.
  • पश्चिम बंगालमधील कलाईकुडा हवाई दल केंद्रावर संयुक्त लष्करी सराव करण्यात येणार असून रिपब्लिक ऑफ सिंगापूर एअरफोर्स व भारतीय हवाईदल यांचा त्यात समावेश आहे. १२ डिसेंबपर्यंत हा सराव चालणार आहे.
  • संयुक्त लष्करी कवायतींचे हे दहावे वर्ष असून यात हवाई सागरी प्रशिक्षणाचा समावेश आहे. भारतीय नौदलाची यंत्रणा यात वापरली जाणार आहे, असे सिंगापूरच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. 
  • रिपब्लिक ऑफ सिंगापूर एअरफोर्सने सहा एफ १६ सी/डी लढाऊ विमाने तैनात केली असून भारतीय हवाई दलाने सहा एसयू ३० एमके आय लढाऊ विमाने तैनात केली आहेत.
  • या वर्षीच्या संयुक्त सरावाचे महत्त्व सांगताना सिंगापूर हवाईदलाचे ब्रिगेडियर जनरल हो कुम ल्युएन यांनी सांगितले की, पहिला संयुक्त सराव हा २००८ मध्ये झाला होता.
  • नंतर सरावाचे कार्यक्रम वाढत गेले. भारतीय हवाई दलाच्या पूर्व कमांडचे एअर मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी सांगितले की, या सरावातून दोन्ही देशांची हवाई दले व्यावसायिक कौशल्ये मिळवू शकतील.
  • दोन्ही देशात संयुक्त सरावासाठी पहिल्यांदा २००७ मध्ये करार करण्यात आला नंतर त्याला मुदतवाढ देण्यात आली.

# Current Affairs


चालू घडामोडी – आर्थिक आघाडीवर निराशा! विकास दर पोहोचला ४.५ टक्क्यांवर

  • आर्थिक आघाडीवर वाईट बातमी आहे. देशाच्या विकासाचा वेग मंदावला आहे. दुसऱ्या तिमाहीत विकास दर घटून ४.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या सहा वर्षात विकास दर सर्वात खालच्या स्तरावर पोहोचला आहे. पहिल्या तिमाहीत विकास दर ५ टक्के होता.
  • सरकारने शुक्रवारी संध्याकाळी आकडे जाहीर केले. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकारकडून वेगवेगळया पातळयांवर प्रयत्न सुरु आहेत. तरीही विकास दराला गती मिळू शकलेली नाही. कृषी, उत्पादन आणि सर्व्हिस सेक्टरमध्येही घट झाली आहे.
  • दुसऱ्या तिमाहीत मायनिंगमध्ये ०.१ टक्के, बांधकामात ८.५ टक्क्यांवरुन ३.३ टक्के, उत्पादन क्षेत्र ६.९ टक्क्यांवरुन एक टक्का, सर्व्हिस सेक्टर ७.३ टक्क्यावरुन ६.८ टक्क्यापर्यंत घट झाली आहे.
  • विकास दरात सातत्याने घसरण होत असून बेरोजगारी वाढत आहे. बँकिंग आणि गृहनिर्माण क्षेत्र अडचणीत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये कर्मचारी कपात सुरु आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी –‘अल्फाबेट’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सुंदर पिचाई यांची नियुक्ती

  •  गुगलची मुख्य मातृकंपनी असलेल्या ‘अल्फाबेट’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर ‘गुगल’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • यापूर्वी इंटरनेट क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गुगल कंपनीचे संस्थापक लॅरी पेज व सर्जेई ब्रिन हे अनुक्रमे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष या पदावरून पायउतार होत असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले होते.
  • पिचाई (वय ४७) हे सध्या गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून अनेक वर्षे त्यांनी हे पद सांभाळले.
  • आता ते अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतील. पिचाई यांनी या बढतीबाबत ट्वीट संदेशात म्हटले आहे की, नवीन जबाबदारीबाबत आपल्याला उत्सुकता आहे.
  • तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक आव्हानांवर मात करण्यावर आपला भर राहील, लॅरी व सर्जेई यांचे आपण आभारी आहोत कारण त्यांनी सहकार्य, शोध व व्रतस्थ वृत्तीने काम करण्याची नवी संस्कृती रूजवून कंपनीचा पाया भक्कम केला आहे.

# Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम