One Liners : एका ओळीत सारांश, 19 डिसेंबर 2021
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 19 डिसेंबर 2021
संरक्षण
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) 18 डिसेंबर 2021 रोजी _____ किनारपट्टीवरील डॉ. एपिजे अब्दुल कलाम बेटावरून ‘अग्नी पी’ या नवीन पिढीच्या आण्विक सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्रची यशस्वी चाचणी घेतली – ओडिशा.
आंतरराष्ट्रीय
- संयुक्त राष्ट्रसंघाने ‘भ्रष्टाचारविरोधी कायद्याच्या प्रभारी अंमलबजावणी प्राधिकरणांसाठी रियाध ग्लोबल इनिशिएटिव्ह नेटवर्क’, ज्याला ____ म्हणतात, यासाठी एक मसुदा ठराव स्वीकारला – GlobE नेटवर्क.
राष्ट्रीय
- पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी _____ येथे गंगा द्रुतगती मार्गाचे भूमिपूजन केले – शाहजहांपूर, उत्तर प्रदेश.
- राष्ट्रीय छात्र सेना (NCC) आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) या संस्थानी _____ दरम्यान NCC कॅडेट्सनी गोळा केलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याचा पुनर्वापर करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली – पुनीत सागर अभियान.
- ‘राष्ट्रीय एकता गीत’ ______ यांनी 22 भाषांमध्ये रचले आहे – राष्ट्रीय छात्र सेना (NCC) कॅडेट्स.
- डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (DRDO-DRDE) ही संस्था मानवांसाठी धोकादायक असलेल्या विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी _____ येथे एक प्रगत जैविक संरक्षण प्रयोगशाळा स्थापन करणार आहे – ग्वाल्हेर, मध्य प्रदेश.
- पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (EAC-PM) मोठ्या राज्यांमध्ये प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात अव्वल ठरणारे राज्य म्हणून _____ याचे नाव दिले आहे – पश्चिम बंगाल.
- केंद्रीय सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी _____ येथे आणखी पाच मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क (MMLPs) स्थापन करण्यासाठी करार केला – मुंबई महानगर प्रदेश, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि दिघी बंदर औद्योगिक वसाहत.
- भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्र _____ येथे स्थापन केले गेले आहे – हैदराबाद, तेलंगणा.
व्यक्ति विशेष
- इंटरनॅशनल ऑटोमोबाईल फेडरेशन (FIA) याचे युरोपीय नसलेले पहिले अध्यक्ष – मोहम्मद बेन सुलायेम (संयुक्त अरब अमिराती).
राज्य विशेष
- ______ सरकारने लडाख आणि केरळ या राज्यांमध्ये दोन “कामगार वाणिज्य दूतावास” स्थापन करण्याचा निर्णय घेतला – झारखंड.
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी _____ या खेड्यात ‘सैन्य धाम’चे भूमिपूजन केले – गुनियाल (डेहराडून, उत्तराखंड).
- महिला गोवा पोलीस अधिकार्यांचे एक नवीन पथक जे केवळ महिलांनाच नाही तर लहान मुले आणि पर्यटकांना देखील संरक्षण देईल – गोवा पोलीस पिंक फोर्स.
सामान्य ज्ञान
- युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) – स्थापना: 9 ऑक्टोबर 1874; मुख्यालय: बर्न, स्वित्झर्लंड.
- जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) – स्थापना: 14 जुलै 1967; मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड.
- जागतिक खाद्यान्न कार्यक्रम (WFP) – स्थापना: 19 डिसेंबर 1961; मुख्यालय: रोम, इटली.
- जागतिक हवामानशास्त्र संघटना (WMO) – स्थापना: 23 मार्च 1950; मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड.
- जागतिक पर्यटन संघटना (WTO) – स्थापना: 1 नोव्हेंबर 1974; मुख्यालय: मॅड्रिड, स्पेन.
App Download Link : Download App
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents