Current Affairs : 26 नोव्हेंबर 2019 चालू घडामोडी

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
101

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 26 November 2019 | चालू घडामोडी : 26 नोव्हेंबर 2019

चालू घडामोडी – कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती

  • भाजपा आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. राज्यपालांकडून हंगामी अध्यक्षांची निवड करण्यात येते.
  • त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली आहे.
  • हंगामी अध्यक्षपदाच्या शर्यतीत बाळासाहेब थोरात, बबनराव पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील, के सी पाडवी, दिलीप वळसे पाटील यांचीही नावं होती.
  • याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सर्वाधिक आठ वेळा मी निवडून आल्याने विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी माझी निवड व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती.
  • हंगामी अध्यक्षपदासाठी सभागृहाचा जो सर्वांत वरिष्ठ सदस्य असतो त्याची परंपरेनुसार निवड केली जाते याचे पालन राज्यपाल करतील अशी आशा आहे, असंही थोरात यांनी सांगितलं होतं.

# Current Affairs


चालू घडामोडी – अमेरिकेचे नौदल प्रमुख स्पेन्सर यांची हकालपट्टी

  • नेव्हीसील (नौसैनिक) प्रकरण योग्य प्रकारे न हाताळल्याने लष्करी अधिकारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात असल्याचे चित्र निर्माण झाले , असा आरोप करून अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी नौदल प्रमुख रिचर्ड स्पेन्सर यांना पदावरून काढून टाकले.
  • इराकमध्ये एडवर्ड गॅलघर या नेव्ही सीलने २०१७ मध्ये इराकमध्ये प्रेताबरोबर स्वत:चे छायाचित्र काढले होते .
  • त्या प्रकरणात त्याची पदावनती करण्यात आली, पण नंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या नौदल सीलला ( नौसैनिक) परत पूर्वीच्या पदावर आणले होते.

# Current Affairs


चालू घडामोडी – डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : स्पेनची सहाव्या विजेतेपदावर मोहोर

  • राफेल नदालने डेनिस शापोव्हालोव्हला नमवून स्पेनला रविवारी सहावे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले.
  • माद्रिद येथे झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने कॅनडाचा २-० असा पराभव केला.
  • अंतिम सामन्यात रॉबटरे बॉटिस्टा एग्युटने फेलिक्स ऑगेर-अ‍ॅलिआसिमेचा ७-६ (७/३), ६-३ असा पराभव करून स्पेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
  • मग नदालने शापोव्हालोव्हला ६-३, ७-६ (९/७) असे पराभूत केले.
  • ३३ वर्षीय नदालसाठी हे वर्ष संस्मरणीय ठरले. त्याने फ्रेंच आणि अमेरिकन अशा दोन ग्रँडस्लॅम जेतेपदासहित जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान प्राप्त केले आहे.
  • त्यामुळे डेव्हिस विजेतेपदाने त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
  • ६ स्पेनने डेव्हिस चषक स्पर्धेत २०००, २००४, २००८, २००९, २०११, २०१९ अशी सहा जेतेपदे पटकावली आहेत.
  • ४-१ नदालने स्पेनच्या चार (२००४, २००९, २०११, २०१९) डेव्हिस चषक विजेतेपदांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, तर रॉजर फेडररने स्वित्र्झलडला फक्त २०१४ मध्ये एकमेव डेव्हिस चषक जिंकून दिला आहे

# Current Affairs


चालू घडामोडी – ब्राझीलच्या फ्लमेंगा क्लबला किताब

  • फ्लमेंगा क्लबने काेपा लिबर्टाडाेरेसमध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला.
  • त्यानंतर येथील चाहत्यांनी या क्लबच्या ऐतिहासिक  विजयाचे काैतुक करताना थेट व्हिक्ट्री परेड काढली.
  • लॅटिन अमेरिकेतील फुटबाॅलच्या प्रचंड लाेकप्रियतेचा प्रत्यय या चाहत्यांनी आणून  दिला.
  • ब्राझीलच्या या क्लबने शनिवारी ९.५६ वाजता रिव्हर प्लेटवर २-१ ने मात केली आणि कोपा लिबर्टाडोरेस किताब जिंकला.
  • त्यानंतर रविवारी रात्री क्लबने ८.५२ वाजता ब्राझीलच्या लीगचे विजेतेपद पटकावले आहे.
  • रिओ दि जानेरो फ्लमेंगा क्लबने काेपा लिबर्टाडाेरेसमध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला.
  • त्यानंतर येथील चाहत्यांनी या क्लबच्या ऐतिहासिक विजयाचे काैतुक करताना थेट व्हिक्ट्री परेड काढली.
  • लॅटिन अमेरिकेतील फुटबाॅलच्या प्रचंड लाेकप्रियतेचा प्रत्यय या चाहत्यांनी आणून दिला.
  • ब्राझीलच्या या क्लबने शनिवारी ९.५६ वाजता रिव्हर प्लेटवर २-१ ने मात केली आणि  कोपा लिबर्टाडोरेस किताब जिंकला. त्यानंतर रविवारी रात्री क्लबने ८.५२ वाजता ब्राझीलच्या लीगचे विजेतेपद पटकावले आहे.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम