One Liners : एका ओळीत सारांश,14 डिसेंबर 2021

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
51

एका ओळीत सारांश, 14 डिसेंबर 2021

Admin

संरक्षण

  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केलेल्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राद्वारे डागल्या जाणाऱ्या टॉर्पेडो प्रणालीचे 13 डिसेंबर 2021 रोजी _____ राज्यातील व्हीलर बेटावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले – ओडिशा.

अर्थव्यवस्था

  • _____ या सार्वजनिक कंपनीने ‘धन रेखा’ या नावाने एक वैयक्तिक बचत जीवन विमा योजना सादर केली – भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC).

आंतरराष्ट्रीय

  • _____ या कंपनीने त्याचे डेनिम पोशाख बनवण्यासाठी भारताने बनवलेले खादी डेनिम कापड वापरण्यास सुरुवात केली आहे – पॅटागोनिया (अमेरिकेचा फॅशन ब्रँड).
  • मातीचे आरोग्य पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि जैवविविधता पुनर्संचयित करण्यासाठी _____ राज्यातील तीन जिल्ह्यांतील भारतीय आदिवासी शेतकऱ्यांचा सामुदायिक उपक्रम संयुक्त राष्ट्रसंघ अन्न आणि कृषी संघटना (FAO) याच्या “कृतीत मृदा जैवविविधता” विषयक प्रकाशनामध्ये प्रसिद्ध केला – राजस्थान (प्रतापगड, डुंगरपूर आणि बांसवाडा जिल्हे).
  • ‘लोवी इन्स्टिट्यूट एशिया पॉवर इंडेक्स 2021’ यानुसार, लष्करी सामर्थ्य आणि शक्ती याच्या बाबतीत आशियातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र म्हणून भारताचा क्रमांक – चौथा.
  • ‘लोवी इन्स्टिट्यूट एशिया पॉवर इंडेक्स 2021’ यानुसार, लष्करी सामर्थ्य आणि शक्ती याच्या बाबतीत जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र – अमेरिका (त्याखालोखाल चीन, जपान).
  • वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिल (WTTC) याची जागतिक शिखर परिषद 14-16 मार्च 2022 या कालावधीत _____ येथे आयोजित केली जाईल – मनिला (फिलीपिन्स).
  • _____ या उपक्रमाला “UNESCO मीडिया अँड इन्फॉर्मेशन लिटरसी आलायन्स” या संस्थेकडून ‘2021 ग्लोबल मीडिया अँड इन्फॉर्मेशन लिटरसी अवार्ड्स’ मधील प्रथम पुरस्कार मिळाला – आउट ऑफ द बॉक्स लिटरसी इनिशिएटिव्ह (मनिला).

राष्ट्रीय

  • आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (ABRY) अंतर्गत सर्वाधिक लाभार्थी असलेल्या राज्यांच्या यादीत _____ खालोखाल तामिळनाडू आणि गुजरात अव्वल स्थानावर आहेत – महाराष्ट्र.
  • ‘लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम-2013’ अन्वये दाखल केल्या जाणारया लोकसेवकांविरुद्धच्या तक्रारींचे व्यवस्थापन करण्यासाठी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष (अध्यक्ष, भारतीय लोकपाल) यांनी कार्यरत केलेले डिजिटल व्यासपीठ – लोकपालऑनलाइन.
  • ______ कंपनीने आयात खर्च कमी करण्यासाठी ग्रीन हायड्रोजन उत्पादनासाठी अल्कलाइन इलेक्ट्रोलायझर तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणासाठी भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) सोबत करार केला – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL).

व्यक्ती विशेष

  • 70 वी मिस युनिव्हर्स 2021 – हरनाझ संधू (भारताची तिसरी मिस युनिव्हर्स).

क्रिडा

  • ‘फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2021’ याचा विजेता – मॅक्स वरस्टपेन.
  • नोव्हेंबर 2021 यासाठी ‘ICC प्लेअर ऑफ द मंथ’ – ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (पुरुष) आणि वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज (महिला).

राज्य विशेष

  • शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अध्यापन प्रक्रिया अधिक उत्तरदायी बनवण्यासाठी राज्यभरातील शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी आसाम सरकारचे अभियान – गुणोत्सव.
  • _____ राज्यात 01 जानेवारी 2022 पासून प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे – सिक्कीम.
  • पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ____ येथे श्री काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन केले – वाराणसी.

ज्ञान-विज्ञान

  • ‘टॅट्रीग्रेड स्टेल्थ’ नावाचे परिधान, जगातील अशा प्रकारचे पहिले आहे जे व्यक्तीला अत्याधिक तापमानाचा सामना करण्यास सक्षम करते, जे ____ या स्टार्ट-अप कंपनीने विकसित केले आहे – वीर एडवांस्ड रिसर्च (हैदराबाद).

सामान्य ज्ञान

  • नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प – महाराष्ट्र.
  • अमराबाद व्याघ्र प्रकल्प – तेलंगणा.
  • पीलीभीत व्याघ्र प्रकल्प – उत्तरप्रदेश.
  • भोर व्याघ्र प्रकल्प – महाराष्ट्र.
  • राजाजी व्याघ्र प्रकल्प – उत्तराखंड.
  • ओरंग व्याघ्र प्रकल्प – आसाम.
  • कमलांग व्याघ्र प्रकल्प – अरुणाचल प्रदेश.
  • श्रीविलीपुथुर मेगामलाई व्याघ्र प्रकल्प – तामिळनाडू.

 


One Liners : एका ओळीत सारांश,14 डिसेंबर 2021
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम