Current Affairs : 23 नोव्हेंबर 2019 चालू घडामोडी

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
111

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 23 November 2019 | चालू घडामोडी : 23 नोव्हेंबर 2019

चालू घडामोडी – मयंक सिंह देशातील सर्वात तरुण न्यायाधीश

  • एकवीस वर्षीय मंयक प्रताप सिंह हा तरुण विधी सेवा परीक्षा 2018 उत्तीर्ण झाला आहे.
  • त्यामुळे तो आता देशातील सर्वात तरुण न्यायाधीश म्हणून न्यायालयात कामकाज पाहणार आहे. 21 व्या वर्षीच तो आता निकाल सुनावणार आहे.
  • मयंक सिंह हा राजस्थानच्या जयपूर येथील रहिवासी आहे.
  • सन 2018 पर्यंत विधी सेवा परीक्षांसाठी अर्ज करण्याची वयाची किमान वयोमर्यादा 23 वर्षे होती.
  • मात्र, 2019 मध्ये राजस्थान हायकोर्टाने ही मर्यादा 21 वर्षे केली. परीक्षेची वयोमर्यादा घटवण्यात आल्यानेच आपण या परीक्षेला बसू शकलो असे मयंकने म्हटले आहे. या संधीमुळे मी वेळेपूर्वीच बऱ्याच गोष्टी शिकू शकेन, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – ‘ओबोर’प्रश्नी अमेरिका भारताच्या पाठीशी

  • चीनच्या महत्त्वाकांक्षी वन बेल्ट, वन रोड (ओबोर) प्रकल्पाबाबत अमेरिकेने भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
  • अब्जावधी डॉलरच्या या महाकाय प्रकल्पामागील आर्थिक उद्दिष्टे स्पष्ट नसल्यामुळे भारताला वाटणारी चिंता रास्तच आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.
  • अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया विषयक प्रधान उपसहसचिव अॅलिस वेल्स यांनी ही भूमिका मांडली आहे. ‘वुड्रो विल्सन इंटरनॅशनल सेंटर फॉर स्कॉलर्स’ या थिंक टँकसमोर त्या बोलत होत्या.
  • चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला विरोध करणारा भारत हा एकमेव मोठा देश आहे.
  • चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्र (सीपीईसी) पाकव्याप्त काश्मीरमधून जाते आणि हा भाग आपला असल्याचे भारताने वारंवार ठणकावून सांगितले आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी –  अश्वारोहणमध्ये फवाद मिर्झा ऑलिम्पिकसाठी पात्र 

  • आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुहेरी पदकविजेत्या फवाद मिर्झाने अश्वारोहणमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे.
  • 27 वर्षीय फवादने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान गाठून दोन दशकांची भारताची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे.
  • आंतरराष्ट्रीय अश्वारोहण महासंघाकडून 20 फेब्रुवारी, 2020ला यासंदर्भात अधिकृत पुष्टी मिळू शकेल.
  • याआधी इम्तियाझ अनीस (2000, सिडनी) आणि आय. जे. लांबा (1996, अटलांटा) यांनी ऑलिम्पिक अश्वारोहमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
  • ऑगस्ट महिन्यात अर्जुन पुरस्कार पटकावणाऱ्या फवादने सहा पात्रता प्रकारांमध्ये एकूण 64 गुण कमावले.

# Current Affairs


चालू घडामोडी –  विराटचा विक्रम, अनोखी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार 

  • भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावरचा कसोटी सामना हा संस्मरणीय ठरणार आहे.
  • पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या बांगलादेश संघाला भारतीय गोलंदाजांनी 106 धावांवर माघारी धाडलं. यानंतर भारतीय संघाने आपल्या डावाची सावध सुरुवात केली. कर्णधार विराट कोहलीने पहिल्या दिवसाच्या खेळात 32 वी धाव काढत
    अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.
  • कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने 5 हजार धावा काढणारा विराट पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.
  • तसेच त्याने 86 डावांमध्ये ही कामगिरी करत माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगचा विक्रम मोडला आहे. रिकी पाँटींगने 97 डावांमध्ये याआधी अशी कामगिरी करुन दाखवली होती.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम