One Liners : 18 September | एका ओळीत सारांश : 18 सप्टेंबर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 18 सप्टेंबर 2021
दिनविशेष
- आंतरराष्ट्रीय समान वेतन दिवस – 18 सप्टेंबर.
संरक्षण
- भारतीय लष्कराचे भूदल आणि नेपाळी भूदल यांच्यामधील “सूर्य किरण 2021” नामक संयुक्त सरावाची 15 वी आवृत्ती 20 सप्टेंबर 2021 पासून _____ येथे सुरू होत आहे – पिठोरागढ (उत्तराखंड).
आंतरराष्ट्रीय
- प्रथमच, _____ एक जागतिक मानक विकसित करत आहे, जे वास्तुकार आणि रचनाकार यांना त्यांच्या इमारती आणि उत्पाद कार्बन न्यूट्रल म्हणून प्रमाणित करण्यास अनुमती देईल – आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना (ISO).
राष्ट्रीय
- भारतीय रेल्वेने _______ हा एक कार्यक्रम सुरू केला आहे, जो प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या तत्वाखाली युवकांना सशक्त करण्यासाठी रेल्वे प्रशिक्षण संस्थांद्वारे उद्योग संबंधित कौशल्ये प्राप्त करण्यास प्रशिक्षण प्रदान करण्याचा मार्ग आहे – रेल कौशल विकास योजना.
- ______ संस्थेने IIT दिल्ली येथील फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर (FIIT) आणि रुसिका बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड (झारखंड) यांच्या सहकार्याने महुआ न्युट्रा पेय, जे झारखंड राज्यातील एक वारसा पेय आहे, या उत्पादचे व्यापारीकरण करण्यासाठी करार केला – TRIFED.
- 17 सप्टेंबर 2021 रोजी ____ यांच्या वाढदिवसाला “सेवा दिवस” म्हणून पाळण्यात आला – पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी.
- 17 सप्टेंबर 2021 रोजी _______ संस्थेने SPIN (भारताची क्षमता मजबूत करणे / Strengthening the Potential of India) नावाची एक योजना सुरू केली – खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC).
- भारताचा पहिला विद्युत महामार्ग दिल्ली आणि _____ दरम्यान विकसित केला जाईल – जयपूर.
- 17 सप्टेंबर 2021 रोजी, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या ओव्हरसीज इंडियन अफेयर्स डिव्हिजनच्या सहकार्याने ____ याद्वारे आयोजित केलेल्या पहिल्या “गिरमिटिया परिषद”चे उद्घाटन केले – इंडिया फाउंडेशन.
व्यक्ती विशेष
- _____ यांनी 14 सप्टेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ मर्यादित (NSIC) याचे अध्यक्ष-नि-व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला – सुश्री अलका नांगिया अरोरा.
- आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संघटना (ICAO) याच्या विमानचालन सुरक्षा समितीच्या नवीन अध्यक्षा, ज्या या धोरणात्मक समितीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या – शेफाली जुनेजा.
राज्य विशेष
- हैदराबाद मुक्ती दिवस – 17 सप्टेंबर 2021.
- नागालँडचे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (STPI) केंद्र ____ येथे उभारण्यात आले – कोहिमा.
- ______ सरकारने 17 सप्टेंबर 2021 रोजी ई व्ही रामासामी यांचा 143 वा वाढदिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून साजरा केला – तामिळनाडू.
- _____ सरकारने देशभरातील सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ‘राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET)’ पासून राज्याला वेगळे करणारा कायदा मंजूर केला – तामिळनाडू.
- अरुणाचल प्रदेशच्या _____ याला अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ बी डी मिश्रा यांनी “राज्य लोकशाही पुरस्कार” प्रदान केला – लोंगडिंग जिल्हा.
ज्ञान-विज्ञान
- भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) कंपनीने उच्च-राख असलेल्या भारतीय कोळशाचे मेथनॉलमध्ये रूपांतर करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे आणि ____ येथे त्याचा पहिला प्रायोगिक कारखाना उभारला आहे, जो नीती आयोगाने सुरू केला आहे आणि स्वच्छ ऊर्जा संशोधन उपक्रम अंतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने त्याला वित्तपुरवठा केला – हैदराबाद.
- ____ संस्थेच्या संशोधकांनी “ट्रायबोइलेक्ट्रिक इफेक्ट” वापरून एक उपकरण तयार केले आहे जे पाण्याचे थेंब, पावसाचे थेंब, पाण्याचा प्रवाह आणि समुद्राच्या लाटांपासून वीज निर्माण करू शकते – IIT दिल्ली.
सामान्य ज्ञान
- आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय (ICC किंवा ICCt) – स्थापना: 1 जुलै 2002; ठिकाण: हेग, नेदरलँड.
- आंतरराष्ट्रीय फौजदारी पोलीस संघटना (ICPO-इंटरपोल) – स्थापना: वर्ष 1923; मुख्यालय: ल्योन, फ्रान्स.
- कायमस्वरुपी तंटा निवारण न्यायालय (PCA) – स्थापना: वर्ष 1899; ठिकाण: हेग, नेदरलँड.
- रेल्वे सहकार्य संघटना (OSJD किंवा OSShD) – स्थापना: 28 जून 1956; ठिकाण: वॉर्सा, पोलंड.
- आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संघटना (ICAO) – स्थापना: 4 एप्रिल 1947; मुख्यालय: मॉन्ट्रियल, कॅनडा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents