One Liners : 16 सप्टेंबर | एका ओळीत सारांश : 16 September
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 16 सप्टेंबर 2021
दिनविशेष
- 2021 साली “ओझोन थराच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस” किंवा “जागतिक ओझोन दिवस” (16 सप्टेंबर) याची संकल्पना – ‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल – कीपिंग अस, अवर फूड, अँड वॅक्सीन्स कूल!‘
संरक्षण
- शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) सदस्य राष्ट्रांमधील संयुक्त “पीसफूल मिशन’ नामक युद्धसरावाचे सहावे संस्करण ____ येथे 13 ते 25 सप्टेंबर 2021 या काळात आयोजित करण्यात आला आहे – ऑरेनबर्ग, रशिया.
- 15 सप्टेंबर 2021 रोजी पाणबुडीमधून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर, स्वदेशी प्रणाली विकसित करणारे अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स आणि भारत यांच्या गटात सामील झालेला अण्वस्त्र-धारी नसलेला पहिला देश – दक्षिण कोरिया.
आंतरराष्ट्रीय
- 24 सप्टेंबर 2021 रोजी _____ येथे होणाऱ्या ‘क्वाड्रिलॅटरल फ्रेमवर्कच्या नेत्यांची शिखर परिषद’ यामध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बिडेन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत – वॉशिंग्टन डिसी, अमेरिका.
- आयुर्वेद आणि इतर भारतीय पारंपारिक औषधांच्या क्षेत्रातील मानकांचे बळकटीकरण आणि विकास करण्याच्या विशिष्ट उद्देशाने, फार्माकोपिया कमिशन फॉर इंडियन मेडिसिन अॅन्ड होमिओपॅथी (PCIM&H) आणि ____ यांच्यात 13 सप्टेंबर 2021 रोजी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या – अमेरिकन हर्बल फार्माकोपिया
- _____ या संस्थेच्या सहकार्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने 14 सप्टेंबर 2021 रोजी ‘BRICS यंग सायंटिस्ट फोरम’चे सहावे संस्करण आयोजित केले – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज, बंगळुरू.
- SCO (शांघाय सहकार्य संघटना) गटाच्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेची 21 वी बैठक 17 सप्टेंबर 2021 रोजी ____ येथे आयोजित केली जाईल – दुशान्बे, ताजिकिस्तान.
- ______, संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) आणि संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) या संस्थांनी 23 सप्टेंबर 2021 रोजी नियोजित “खाद्यान्न प्रणाली शिखर परिषद’च्या पूर्वसंध्येला “ए मल्टी-बिलियन-डॉलर ऑपर्चुनिटी” या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला – संयुक्त राष्ट्रसंघ खाद्यान्न आणि कृषी संघटना (FAO).
- “आफ्रिका फूड प्राइज 2021” याचा भारतीय विजेता – अर्ध-शुष्क उष्ण कटिबंधांसाठी आंतरराष्ट्रीय पिके संशोधन संस्था (ICRISAT), हैदराबाद.
- संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) याद्वारे देण्यात येणाऱ्या ‘बेस्ट टूरिझम व्हिलेज’ पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त केलेली तीन भारतीय खेडे – लधपुरा खास (मध्य प्रदेश), कोंगथोंग (मेघालय) आणि पोचमपल्ली (तेलंगणा).
राष्ट्रीय
- 15 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने वाहन उद्योग आणि ____ उद्योगासाठी 26,058 कोटी रुपये खर्चाच्या उत्पादनसंलग्न प्रोत्साहन (PLI) योजनेला मंजुरी दिली – ड्रोन उद्योग.
- केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) _____ याला ‘सीमाशुल्क अधिसूचित विमानतळ’ म्हणून घोषित केले – कुशीनगर विमानतळ, उत्तर प्रदेश.
- वर्ष 2019-20 आणि वर्ष 2020-21 यासाठी हिंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार – प्रथम पारितोषिक’ याचा विजेता – राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (RINL) – विशाखापट्टनम स्टील प्लांट.
- 15 सप्टेंबर 2021 रोजी ____, RMI आणि RMI इंडिया या संस्थांच्या सहकार्याने, ग्राहक आणि उद्योगासोबत काम करून शून्य-प्रदूषण वितरण करणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी “शून्य” नावाचा उपक्रम सुरू केला – नीती आयोग.
- _____ याने ‘भारतातल्या शहरी नियोजन क्षमतेतल्या सुधारणा’ (Reforms in Urban Planning Capacity in India) याबाबत अहवाल प्रकाशित केला – नीती आयोग.
- नवीन तंत्रज्ञानासह कृषीक्षेत्राचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 14 सप्टेंबर 2021 रोजी ‘डिजिटल कृषी अभियान’ अंतर्गत प्रायोगिक प्रकल्पांसाठी ____ या खासगी कंपन्यांसोबत पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या – सिस्को, निंजाकार्ट, जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड, आयटीसी लिमिटेड आणि एनसीडीईएक्स ई-मार्केट्स लिमिटेड (NeML).
- केंद्रीय सरकारने ____ या कालावधीसाठी “डिजिटल कृषी अभियान” सुरु केले आहे, ज्याअंतर्गत होणाऱ्या प्रकल्पांमध्ये मुख्यत: नवीन तंत्रज्ञान, जसे की कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉक चेन, रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस तंत्रज्ञान, ड्रोन यांचा वापर करता येईल – वर्ष 2021 – वर्ष 2025.
- भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर 2021 रोजी ____ येथे पहिल्यांदाच “जागतिक बौद्ध परिषद” आयोजित करणार आहे – नवा नालंदा महाविहार परिसर, नालंदा, बिहार.
व्यक्ती विशेष
- ‘चायना रूम’ या पुस्तकाचे लेखक – संजीव सहोटा (भारतीय वंशाचे ब्रिटिश कादंबरीकार).
क्रिडा
- ऑगस्ट 2021 यासाठी “आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) प्लेयर ऑफ द मंथ’ – इंग्लंडचा जोए रूट (पुरुष) आणि आयर्लंडची एमेर रिचर्डसन (महिला).
राज्य विशेष
- जम्मू व काश्मीरच्या दुर्गम भागात घरोघरी डिजिटल बँकिंग आणि आर्थिक सेवांना पुरविण्यासाठी, उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी 14 सप्टेंबर 2021 रोजी पम्पोर येथे _____ याचा प्रारंभ केला – मिशन ‘वन ग्राम पंचायत – वन DIGI-पे सखी‘.
- छत्तीसगड सरकारने ____ येथे सेवाग्राम आश्रम स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे – नवा रायपूर.
ज्ञान-विज्ञान
- भारतीय उपखंडात प्रथमच आणि आशियात अशी तिसरी नोंद झाली आहे की, ______ येथे मिळालेल्या ज्युरासिक खडकांमधून (अंदाजे 160-168 दशलक्ष वर्षांपूर्वीचे) “स्ट्रोफोडुसजैसलमेरेन्सिस” (जीनस स्ट्रोफोडस) हे नाव देण्यात आलेल्या हायबोडोन्ट शार्कच्या नवीन प्रजातीच्या दाताचे अवशेष शोधले गेले – जैसलमेर प्रदेश, राजस्थान.
सामान्य ज्ञान
- सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (CDSL) – स्थापना: वर्ष 1999; मुख्यालय: मुंबई.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) – स्थापना: 15 जून 1909; मुख्यालय: दुबई, संयुक्त अरब अमिराती.
- भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) – स्थापना: 28 जानेवारी 2009; मुख्यालय: नवी दिल्ली.
- भारतीय बँक संघ (IBA) याची स्थापना – 26 सप्टेंबर 1946.
- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) – स्थापना: वर्ष 1954; मुख्यालय: बेंगळुरू, कर्नाटक.
- संरक्षण गुप्तचर विभाग (DIA) याची स्थापना – 1 मार्च 2002.
- भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था (BSI) – स्थापना: 13 फेब्रुवारी 1890; मुख्यालय: कोलकाता, पश्चिम बंगाल.
- भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था (ZSI) – स्थापना: 1 जुलै 1916; मुख्यालय: कोलकाता.
- राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (NTCA) याची स्थापना – डिसेंबर 2005.
- राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण (NBA) – स्थापना: 1 ऑक्टोबर 2003; ठिकाण: चेन्नई, तामिळनाडू.
- भारतीय वन सर्वेक्षण संस्था (FSI) – स्थापना: 1 जून 1981; मुख्यालय: देहरादून, उत्तराखंड.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents