चालू घडामोडी : 15 नोव्हेंबर 2019 Latest

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
126

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 15 November 2019 | चालू घडामोडी : 15 नोव्हेंबर 2019

चालू घडामोडी – मद्रास हायकोर्ट : सरकारी नोकरीत जाती आधारीत पदोन्नती घटनाविरोधी

  • सरकारी नोकरीत जाती आधारीत पदोन्नती देणं घटनाविरोधी आहे असं मद्रास हायकोर्टाने म्हटलं आहे.
  • मद्रास हायकोर्टाचा हा निर्णय तामिळनाडू सरकारसाठी मोठा धक्का मानला जातो आहे.
  • दिलेल्या निर्णयात सरकारी नोकरीत जाती आधारीत पदोन्नती देणं हे घटनाविरोधी असल्याचं स्पष्ट केलं आहे.
  • जस्टिस एमएम सुंदरेश आणि जस्टिस आरएमटी तीका रामन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
  • कोणतंही आरक्षण हे आपोआप दिलं जात नाही जेव्हा गरज असेल तेव्हाच दिलं जातं.
  • त्यामुळेच ते बाहेर द्यायचं असो वा अंतर्गत द्यायचं असो त्यावर विचार व्हायलाच हवा असंही कोर्टाने म्हटलं आहे.
  • या विषयासंदर्भात ज्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्याबाबत सुनावणी करताना हा निर्णय देण्यात आला आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी –  BRICS-युवा वैज्ञानिक मंच’ याची चौथी परिषद ब्राझीलमध्ये संपन्न

  • ब्राझील या देशाच्या ब्राझिलिया या शहरात ‘BRICS-युवा वैज्ञानिक मंच’ (BRICS -Young Scientist Forum) याची चौथी परिषद आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2019 या काळात झाला.
  •  या परिषदेत युवा वैज्ञानिकाचा प्रथम पुरस्कार भारताच्या रवी प्रकाश यांना देण्यात आला आहे.
  • बेंगळुरूच्या ICAR-राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेमधले पीएचडी अभ्यासक असलेले रवी प्रकाश यांनी छोट्या व सीमान्त ग्रामीण दुग्ध उत्पादकांसाठी स्वदेशीच स्वस्त असे दुग्ध शीतकरण संयंत्र तयार केले आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी –  भारताला नियोजित वेळेत ‘एस-४००’ क्षेपणास्त्रे देणार- पुतिन

  • भूपृष्ठावरून हवेत मारा करणारी एस-४०० क्षेपणास्त्रे भारताला नियोजित वेळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे.
  • भारत आणि रशियामध्ये करण्यात आलेल्या याबाबतच्या कराराविरुद्ध अमेरिकेने इशारा दिला आहे.
  • भूपृष्ठावरून हवेत मारा करणारी एस-४०० ही ट्रम्फ क्षेपणास्त्रे संपादित करण्याची इच्छा असल्याचे भारताने २०१५ मध्येच जाहीर केले होते.
  • पुतिन गेल्या वर्षी भारतात आले होते तेव्हा त्याबाबतचा ५.४३ अब्ज डॉलरचा करार करण्यात आला होता. एस-४०० क्षेपणास्त्रांचा पुरवठा योजनेनुसारच केला जाईल, असे पुतिन यांनी येथे ११ व्या ब्रिक्स परिषदेनंतर सांगितले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात ब्रिक्स परिषदेच्या वेळी द्विपक्षीय चर्चा झाली.
  • रशियासमवेतच्या एस-४०० कराराला अमेरिकेने विरोध दर्शविला असून रशियाकडून शस्त्रे आणि लष्करी सामग्री घेणाऱ्या देशांवर र्निबध घालण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने दिला आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – अर्सेलरमित्तलच्या एस्सार स्टीलवरील अधिग्रहणाला हिरवा कंदील

  • मोठा कर्जभार असलेल्या एस्सार स्टीलवरील अधिग्रहणाचा ब्रिटनच्या अर्सेलरमित्तलचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
  • एस्सार स्टीलच्या खरेदीला सर्वोच्च न्यायालयाने अर्सेलरमित्तलला शुक्रवारी मंजुरी दिली.
  • त्याचबरोबर कंपनीला कर्ज देणाऱ्या बँका तसेच अन्य धनकोंना समान दर्जा देणारा राष्ट्रीय कंपनी विधि अपील लवादाचा निर्णयही खारीज केल्याने, या लिलावातून बँकांची कर्जफेडही सुकर होणार आहे.
  • विविध बँका, वित्तसंस्थांचे ५४,५४७ कोटी रुपये थकविणाऱ्या एस्सार स्टीलचा बँकांनी केलेल्या लिलाव प्रक्रियेत अर्सेलरमित्तल यशस्वी ठरली होती.
  • नादारी व दिवाळखोरी संहितेंतर्गत अर्सेलरमित्तलने ४२,००० कोटी रुपयांना एस्सार स्टील खरेदीची तयारी दर्शविली.
  • मात्र त्याला काही वित्तपुरवठादारांनी विरोध दर्शविला होता.
  • हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी विधि अपील न्यायाधिकरणतही गेले. तेथे लिलावातून येणाऱ्या रकमेवर बँका व प्रत्यक्ष कंपनी परिचलन पतपुरवठादार यांचा समान दर्जा देणारा निर्णय झाला.

 # Current Affairs


चालू घडामोडी – सजग’ गस्तीनौकेचे जलावतरण

  • भारतीय बनावटीच्या गस्तीनौकेचे गुरुवारी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांच्या हस्ते गोवा शिपयार्ड येथे जलावतरण झाले.
  • त्यांनी या गस्तीनौकेचे ‘सजग’ असे नामकरण केले.
  • यावेळी श्रीपाद नाईक, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव सुभाष चंद्रा, तटरक्षक दलाचे महासंचालक के. नटराजन उपस्थित होते.
  • भारतीय तटरक्षक दलासाठी पाच गस्तीनौका बांधणीचा प्रकल्प गोवा शिपयार्डने हाती घेतला आहे. त्यापैकी ‘सजग’ ही तिसरी गस्तीनौका आहे.
  • पाच गस्तीनौकांच्या प्रकल्पाचे १३ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.
  • या नौकांचा वापर प्रादेशिक सागरी सीमांमधील अनन्य आर्थिक क्षेत्राच्या रक्षणासाठी केला जाणार आहे.
  • अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि संगणकीय नियंत्रण कक्षाने युक्त अशी ही ‘सजग’ नौका भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यातील सर्वात आधुनिक नौका आहे.
  • २४०० टन वजनाच्या या नौकेत बचावकार्यासाठी आणि चाचेगिरीविरोधी शीघ्रकृती नाव, तोफा, इत्यादी शस्त्रास्त्रे उपलब्ध आहेत.

 # Current Affairs


चालू घडामोडी – दिव्यांशी सिंघल -गुगल डुडल स्पर्धेची विजेती

  • हरियाणा येथील गुरूग्रामधील दिव्यांशी सिंघल या सात वर्षीय मुलींने तिच्या कल्पनेतून साकारलेल्या डुडलची यंदा बाल दिनानिमित्त गुगलकडून निवड करण्यात आली होती. ‘
  • मी मोठी झाल्यावर, मी आशा करते…’ ही यंदाच्या गुगल डुडलची संकल्पना होती.
  • दिव्यांशीनं ‘झाडं चालू लागली’ या संकल्पनेवर डुडल रेखाटलं होतं.
  • विशेष म्हणजे भारतातील इयत्ता पहिली ते दहावीमधील तब्बल एक लाख मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. गुगलकडून २०१९ च्या बाल दिनानिमित्त दिव्यांशीने रेखाटलेल्या डूडलची निवड करण्यात आली होती.
  • बाल दिनाच्या दिवशी गुगलनं या खास डुडलद्वारे बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
  • मात्र, हे डुडल रेखाटण्याअगोदर दिव्यांशीने नेमंक असं काय पाहिलं होतं, ज्यामुळे तिच्या मनात असा विचार आला याबद्दल तिने माहिती दिली आहे

 # Current Affairs


 

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम