चालू घडामोडी : 1 ऑगस्ट 2021
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 1 AUGUST 2021 | चालू घडामोडी : १ ऑगस्ट २०२१
चालू घडामोडी –
Q1] कोणत्या व्यक्तीने 29 जुलै 2021 रोजी पेरू देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली?
1) पेद्रो कॅस्टिलो
2) गुईडो बेलिडो
3) अॅलन वॅग्नर
4) वाल्डो मेंडोझा
उत्तर :- 29 जुलै 2021 रोजी पेद्रो कॅस्टिलो यांनी पेरू (दक्षिण अमेरिकेतील एक देश) देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
चालू घडामोडी –
Q2] कोणत्या दिवशी “जागतिक वनरक्षक दिवस” साजरा करतात?
1) 29 जुलै
2) 27 जुलै
3) 30 जुलै
4) 31 जुलै
उत्तर :- दरवर्षी 31 जुलै या दिवशी “जागतिक वनरक्षक (रेंजर) दिवस” साजरा करतात.
चालू घडामोडी –
Q3] कोणत्या राज्यात 31 जुलै 2021 रोजी दिव्यांग लोकांना सहाय्यक ठरणाऱ्या साधन-सामुग्रीच्या वितरणासाठी ‘सामाजिक अधिकारीता शिबिर’ आयोजित करण्यात आले?
1) उत्तर प्रदेश
2) उत्तराखंड
3) मध्य प्रदेश
4) बिहार
उत्तर :- मध्य प्रदेशात 31 जुलै 2021 रोजी दिव्यांग लोकांना सहाय्यक ठरणाऱ्या साधन-सामुग्रीच्या वितरणासाठी ‘सामाजिक अधिकारीता शिबिर’ आयोजित करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या ADIP योजनेच्या अंतर्गत छिंदवाडा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
चालू घडामोडी –
Q4] कोणत्या दिवशी “जागतिक मानव तस्करी दिवस” साजरा करतात?
1) 29 जुलै
2) 27 जुलै
3) 30 जुलै
4) 31 जुलै
उत्तर :- दरवर्षी 30 जुलै या दिवशी “जागतिक मानव तस्करी दिवस” साजरा करतात. 2021 साली हा दिवस “व्हिक्टम्स व्हॉईसेस लीड द वे” या संकल्पनेखाली पाळला गेला.
चालू घडामोडी –
Q5] कोणत्या कंपनीने ‘एआय फॉर ऑल’ उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये सहकार्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि CBSE या संस्थांसोबत भागीदारी केली आहे?
1) एनव्हीडिया
2) डेल
3) आयबीएम
4) इंटेल
उत्तर :- इंटेल या तंत्रज्ञान संशोधक कंपनीने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) सहकार्याने भारतातील प्रत्येकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयासाठी मूलभूत समज तयार करण्याच्या उद्देशाने ‘एआय फॉर ऑल’ उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली.
चालू घडामोडी –
Q6] चिलाहाटी-हल्दीबाडी हा भारत आणि ____ या देशांना जोडणारा एक मार्ग आहे.
1) बांगलादेश
2) श्रीलंका
3) नेपाळ
4) तिबेट
उत्तर :- चिलाहाटी-हल्दीबाडी हा भारत आणि बांगलादेश या देशांना जोडणारा एक मार्ग असून त्या मार्गावर 31 जुलै 2021 रोजी भारताच्या अलीपूरद्वार विभागाकडून बांगलादेशसाठी पहिली मालगाडी रवाना झाली.
चालू घडामोडी –
Q7] _____ या संस्थेने अलीकडेच अशी घोषणा केली आहे की, ते छोला देवी-देवतांच्या मूर्तींसकट 14 प्राचीन कलाकृती भारताला परत करतील.
1) ब्रिटिश म्यूजियम ऑफ लंडन
2) नॅशनल गॅलरी ऑफ ऑस्ट्रेलिया
3) म्यूजियम ऑफ मॉडर्न आर्ट ऑफ न्यूयॉर्क
4) व्हॅटिकन म्यूजियम्स ऑफ व्हॅटिकन सिटी
उत्तर :- नॅशनल गॅलरी ऑफ ऑस्ट्रेलिया या संस्थेने अलीकडेच अशी घोषणा केली आहे की, ते छोला राजवटीच्या काळातील छोला देवी-देवतांच्या मूर्तींसकट 14 प्राचीन कलाकृती भारताला परत करतील.
चालू घडामोडी –
Q8] कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” अशी मान्यता मिळाली?
1) पारंबीकुलम – केरळ
2) वाल्मिकी नगर – बिहार
3) सुंदरबन – पश्चिम बंगाल
4) वरील सर्व
उत्तर :- वाघांचे उत्तमप्रकारे संरक्षण आणि संवर्धन केल्याबद्दल, देशातील 14 व्याघ्र प्रकल्पांना “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” (Global Conservation Assured | Tiger Standards) अशी मान्यता मिळाली आहे.
मानस, काझीरंगा आणि ओरांग (आसाम)
सातपुडा, कान्हा आणि पन्ना (मध्यप्रदेश)
पेंच (महाराष्ट्र)
वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प (बिहार)
दुधवा (उत्तरप्रदेश)
सुंदरबन (पश्चिम बंगाल)
पारंबीकुलम (केरळ)
बंदिपूर व्याघ्र प्रकल्प (कर्नाटक)
मदुमलाई आणि अन्नामलाई (तामीळनाडू)
चालू घडामोडी –
Q9] कोणत्या राज्यात उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘कृषिकर्ण’ नामक प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला?
1) केरळ
2) तामिळनाडू
3) आंध्र प्रदेश
4) ओडिशा
उत्तर :- केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील पल्लीकल पंचायत क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘कृषिकर्ण’ नामक प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत शेतीसाठी मिनी पॉलिहाउस बांधले जाईल.
चालू घडामोडी –
Q10] 30 जुलै आणि 31 जुलै 2021 रोजी _____ येथे भारत आणि इंडोनेशिया या देशांच्या नौदलांचा 36 वा CORPAT सराव आयोजित केला गेला होता.
1) अरबी समुद्र
2) बंगालचा उपसागर
3) हिंद महासागर क्षेत्र
4) यापैकी नाही
उत्तर :- 30 जुलै आणि 31 जुलै 2021 रोजी हिंद महासागर क्षेत्रात भारत आणि इंडोनेशिया या देशांच्या नौदलांचा 36 वा CORPAT सराव आयोजित केला गेला होता.
आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents