दिनविशेष १६ नोव्हेंबर : आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन

राष्ट्रीय पत्रकारीता दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
182

१६ नोव्हेंबर : आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन / राष्ट्रीय पत्रकारीता दिन

१६ नोव्हेंबर  : जन्म

ई. पु. ४२: रोमन सम्राट तिबेरीयस यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च ३७)

१८३६: हवाईचा राजा डेविड कालाकौआ यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १८९१)

१८९४: केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७५)

१८९७: भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक चौधरी रहमत अली यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९५१)

१९०४: नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष ननामदी अझीकीवे यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे १९९६)

१९०९: भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरु मिर्झा नासीर अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९८२)

१९१७: संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १९९१)

१९२७: मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म.

१९२८: मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००६)

१९३०: इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९९७)

१९६३: अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांचा जन्म.

१९६८: भारतीय राजकारणी शोभाजी रेगी यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०१४)

१९७३: बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांचा जन्म.

 

१६ नोव्हेंबर : मृत्यू

१९१५: गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आले.

१९४७: व्हेनिस फिल्म फेस्टिवलचे संस्थापक ज्युसेप्पे वोल्पी यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८७७)

१९५०: अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस चे एक संस्थापक डॉ. बॉब स्मिथ यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १८७९)

१९६०: अमेरिकन अभिनेता क्लार्क गेबल यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९०१)

१९६७: संगीतकार रोशनलाल नागरथ ऊर्फ रोशन यांचे निधन. (जन्म: १४ जुलै १९१७)

२००६: नोबेल पारितोषिकविजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमन यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९१२)

२०१५: प्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेते सईद जाफरी यांचे निधन.

१६ नोव्हेंबर : महत्वाच्या घटना

१८६८: लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता हेलिऑस वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.

१८९३: डॉ. अ‍ॅनी बेझंट यांचे भारतात आगमन.

१९०७: ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६ वे राज्य बनले.

१९१४: अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह सुरू झाली.

१९१५: लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आली.

१९३०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्‍नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.

१९४५: युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.

१९८८: अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.

१९९६: कोकण रेल्वेच्या रत्‍नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ.

१९९६: चतुरंग प्रतिष्ठान च्या पर्सन ऑफ प्राईड पुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड.

१९९७: अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.

२०००: कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर.

२०१३: २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्‍च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.

 

 

आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम