चालू घडामोडी : 29 जुलै 2021

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
158

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 29 JULY 2021 | चालू घडामोडी : २९ जुलै २०२१

चालू घडामोडी – 

Q1] ‘‘धोलावीरा’ – हडप्पाकालीन शहर’ याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. ते UNESCOच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट होणारे भारतातील सिंधू संस्कृतीचे पहिले स्थळ आहे.

2. गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील ते शहर जे. पी. जोशी यांनी 1967-68 या वर्षात शोधले होते.

1) फक्त 1
2) फक्त 2
3) 1 आणि 2
4) यापैकी एकही नाही

उत्तर :- केवळ विधान 1 अचूक असल्यामुळे पर्याय (A) उत्तर आहे.
‘धोलावीरा’ हे हडप्पाकालीन शहर (कच्छचे रण, गुजरात) भारतातील 40 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ ठरले आहे. ते जे. पी. जोशी यांनी 1967-68 या वर्षात शोधले होते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q2] “इंद्र-21” नामक संयुक्त लष्करी सराव 1 ऑगस्ट 2021 पासून _____ येथे सुरू होणार आहे.

1) सेंट पीटर्सबर्ग
2) मॉस्को
3) व्होल्गोग्राड
4) कझान

उत्तर :- भारत आणि रशिया या देशांचा “इंद्र-21” नामक 12 वा संयुक्त लष्करी सराव 1 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2021 या कालावधीत व्होल्गोग्राड (रशिया) येथे होणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q3] कोणत्या कंपनीने ‘इंट्रिन्सिक’ नामक नवीन रोबोट-निर्मिती कंपनी स्थापन केली?

1) मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन
2) फेसबुक
3) टेस्ला
4) अल्फाबेट

उत्तर :- अमेरिकेच्या गूगल कंपनीची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेट कंपनीने ‘इंट्रिन्सिक’ नामक नवीन रोबोट-निर्मिती कंपनी स्थापन केली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q4] खालीलपैकी कोणते ठिकाण UNESCOच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नोंदवले गेले आहे?

1) डच वॉटर डिफेन्स लाईन्स
2) टर्कीमधील अर्स्लान्टेपे माऊंड अर्चेओलॉजीकल टेल
3) बेल्जियम आणि नेदरलँडमधील बेनेवोलेन्सच्या वसाहती
4) वरील सर्व

उत्तर :- जुलै 2021 महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये 4 नैसर्गिक स्थळ आणि 3 सांस्कृतिक स्थळ नोंदवले. त्यामध्ये डच वॉटर डिफेन्स लाईन्स, टर्कीमधील अर्स्लान्टेपे माऊंड अर्चेओलॉजीकल टेल, बेल्जियम आणि नेदरलँडमधील बेनेवोलेन्सच्या वसाहती या तीन सांस्कृतिक स्थळांचा समावेश आहे.
4 नैसर्गिक स्थळांमध्ये जपानमधील चार बेटे, दक्षिण कोरियामधील किनारपट्टी क्षेत्र, थायलंडमधील मलाय द्वीपकल्पामधील पर्वतरांग आणि जॉर्जियातील काळ्या समुद्राच्या पूर्व किनाऱ्यालगतचा एक मार्ग यांचा समावेश आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q5] खालीलपैकी कोणता महिलांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्यावतीने “24/7 हेल्पलाइन” क्रमांक कार्यरत करण्यात आला?

1) 7827170170
2) 8222333444
3) 9679324798
4) यापैकी नाही

उत्तर :- केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते हिंसाचार पीडित स्त्रियांसाठी 27 जुलै 2021 रोजी “विमेन्स 24/7 हेल्पलाइन – 7827170170” हा राष्ट्रव्यापी मदतक्रमांक कार्यरत करण्यात आला. हिंसाचारग्रस्त स्त्रियांसाठी तातडीच्या तसेच तातडीच्या नसलेल्या प्रकरणांसाठीही तक्रार निवारणासाठी मदत उपलब्ध करून देणे व समुपदेशन सेवा पुरवणे हे या सेवेचे उद्दीष्ट आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q6] खालीलपैकी कोणते विधान “राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था विधेयक 2021” याच्या संदर्भात चुकीचे आहे?

1) 26 जुलै 2021 रोजी ते लोकसभेत संमत झाले.
2) विधेयक अश्विनीकुमार चौबे यांनी सादर केले.
3) विधेयक सादर झाल्यानंतर अवघ्या 8 मिनिटांमध्ये संमत झाले, जो की एक विक्रम आहे.
4) सर्व अचूक आहेत

उत्तर :- 26 जुलै 2021 रोजी, “राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था विधेयक 2021” (National Institutes of Food Technology, Entrepreneurship and Management Bill, 2021) संसदेच्या लोकसभेत मंजूर करण्यात आले. हे विधेयक अन्न प्रक्रिया व उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांनी सादर केले.
विधेयकामुळे, अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील हरयाणातील कुंडली येथील ‘राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था’ (NIFTEM) व तामिळनाडूतील तंजावूर येथील ‘भारतीय अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान संस्था’ (IIFPT) या दोन शिक्षणसंस्थांना राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था हा दर्जा प्राप्त होणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q7] 26 जुलै 2021 ते 06 ऑगस्ट 2021 या कालावधीत _____ किनारपट्टीवर ‘एक्झरसाइज कटलास एक्सप्रेस 2021’ हा नौसराव आयोजित करण्यात आला.

1) अटलांटिक महासागर
2) आफ्रिकेचा पूर्व किनारा
3) बंगालचा उपसागर
4) अरबी समुद्र

उत्तर :-भारतीय नौदलाचे INS तलवार जहाजाने ‘एक्झरसाइज कटलास एक्सप्रेस 2021’ या सरावात भाग घेतला, जो 26 जुलै 2021 ते 06 ऑगस्ट 2021 या कालावधीत आफ्रिकेची पूर्व किनारपट्टीवर आयोजित केला गेला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q8] नॅनो यूरिया लिक्विड निर्मितीच्या तंत्रज्ञान हस्तांतरणाकरिता राष्ट्रीय खते मर्यादित (NFL) आणि ______ या संस्थांचा IFFCO संस्थेसोबत सामंजस्य करार झाला.

1) गुजरात राज्य खते आणि रसायने मर्यादित
2) चंबल खते आणि रसायने मर्यादित
3) मंगळुरू रसायने आणि खते मर्यादित
4) राष्ट्रीय रसायने आणि खते मर्यादित

उत्तर :-नॅनो यूरिया लिक्विड निर्मितीच्या तंत्रज्ञान हस्तांतरणाकरिता राष्ट्रीय खते मर्यादित (NFL) आणि राष्ट्रीय रसायने आणि खते मर्यादित (RCF) या संस्थांचा IFFCO संस्थेसोबत सामंजस्य करार झाला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q9] कोणत्या शहरात 26 जुलै 2021 रोजी ईशान्य प्रदेशातील पहिल्या बांबू औद्योगिक पार्कचे उद्घाटन झाले?

1) आसाम
2) नागालँड
3) मिझोरम
4) त्रिपुरा

उत्तर :- आसामच्या दिमा हसाओ जिल्ह्यातील मंदेरडिसा येथे 26 जुलै 2021 रोजी ईशान्य प्रदेशातील पहिल्या बांबू औद्योगिक पार्कचे उद्घाटन झाले. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q10] कोणती व्यक्ती कर्नाटक राज्याचे 23 वे मुख्यमंत्री म्हणून निवडून आली?

1) बी एस येदीयुरप्पा
2) अरविंद बेलाड
3) बसवराज एस बोम्मई
4) यापैकी नाही

उत्तर :- कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बी एस येदीयुरप्पा यांनी 26 जुलै 2021 रोजी पदाचा राजीनामा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना सादर केला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने एकमताने बसवराज एस बोम्मई यांना कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवडले. 

# Current Affairs


mpscexams Free Current Affairs Quiz
Free Current Affairs Quiz

आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम