चालू घडामोडी : 28 जुलै 2021
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 28 JULY 2021 | चालू घडामोडी : २८ जुलै २०२१
चालू घडामोडी –
Q1] “युरोपा क्लिपर मिशन” याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1. ती युरोपियन स्पेस एजन्सी या संस्थेची एक अंतरग्रहीय मोहीम आहे.
2. गुरु ग्रहाचा एक नैसर्गिक चंद्र असलेल्या ‘युरोपा’ याचे तपशीलवार अन्वेषण करण्यासाठी पाठविण्यात येणारी पहिली अंतराळ मोहीम आहे.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?
1) फक्त 1
2) फक्त 2
3) 1 आणि 2
4) यापैकी एकही नाही
उत्तर :- केवळ विधान 2 अचूक असल्यामुळे पर्याय (B) उत्तर आहे.
“युरोपा क्लिपर मिशन” ही अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन या अंतराळ संशोधन संस्थेची मोहीम आहे, जी ऑक्टोबर 2024 महिन्यात पाठविण्यात येणार आहे.
चालू घडामोडी –
Q2] ‘PDS 70’ नामक एक तरुण तारा पृथ्वीपासून ______ दूर अंतरावर आहे.
1) 53 प्रकाशवर्ष
2) 239 प्रकाशवर्ष
3) 370 प्रकाशवर्ष
4) यापैकी नाही
उत्तर :- आपल्या सौरमालेच्या बाहेर ‘PDS 70’ या ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणात असलेल्या एका ग्रहाभोवती चंद्राची निर्मिती होण्याच्या स्थितीत असलेला भूभाग पहिल्यांदाच संशोधकांना आढळून आला सापडला आहे. ‘PDS 70’ नामक एक तरुण तारा पृथ्वीपासून 370 प्रकाशवर्ष दूर अंतरावर आहे.
चालू घडामोडी –
Q3] कोणत्या देशात ‘पासेओ डेल प्राडो अँड रेटिरो पार्क’ हे ठिकाण आहे, ज्याला UNESCO संस्थेने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्रदान केला?
1) फ्रान्स
2) पोर्तुगाल
3) मोरोक्को
4) स्पेन
उत्तर :- स्पेनमधील मॅड्रिड येथील ‘पासेओ डेल प्राडो’ आणि ‘रेटिरो पार्क’ हे ठिकाण आहे, ज्याला UNESCO संस्थेने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्रदान केला.
चालू घडामोडी –
Q4] 25 जुलै 2021 रोजी REC लिमिटेड या संस्थेने त्याचा 52 वा स्थापना दिवस साजरा केला. त्याचे मुख्यालय कुठे आहे?
1) नवी दिल्ली
2) बंगळुरू
3) चेन्नई
4) हैदराबाद
उत्तर :- नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या REC लिमिटेड (पूर्वीचे रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड) या संस्थेने 25 जुलै 2021 रोजी त्याचा 52 वा स्थापना दिवस साजरा केला. ती एक नवरत्न संस्था आहे. ते सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून भारतभर ग्रामीण विद्युतीकरण प्रकल्पांना वित्त पुरवते.
चालू घडामोडी –
Q5] 26 जुलै 2021 रोजी, 13 वर्षीय _____ हिने ‘2020 टोकियो ऑलिम्पिक’मध्ये महिलांच्या स्ट्रीट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले?
1) मोमीजी निशिआ
2) रायसा लील
3) फूना नाकायमा
4) यापैकी नाही
उत्तर :- 26 जुलै 2021 रोजी, जपानच्या 13 वर्षीय मोमीजी निशिआ हिने ‘2020 टोकियो ऑलिम्पिक’मध्ये महिलांच्या स्ट्रीट (स्केटिंग) स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. ती ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वात तरुण सुवर्णपदक जिंकणारी ठरली आहे.
चालू घडामोडी –
Q6] कोणत्या राज्य सरकारने ‘MyGov-मेरी सरकार’ संकेतस्थळ कार्यरत केले?
1) मध्य प्रदेश
2) उत्तर प्रदेश
3) बिहार
4) राजस्थान
उत्तर :- राज्य सरकारच्या सेवा नागरिकांना ऑनलाइन पुरविण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने ‘MyGov-मेरी सरकार’ संकेतस्थळ कार्यरत केले आहे.
चालू घडामोडी –
Q7] कोणत्या दिवशी ‘कांदळवन परिसंस्थेच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा करतात?
1) 25 जुलै
2) 26 जुलै
3) 23 जुलै
4) 24 जुलै
उत्तर :-दरवर्षी 26 जुलै या दिवशी ‘कांदळवन परिसंस्थेच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस’ किंवा ‘जागतिक कांदळवन दिवस’ साजरा करतात.
चालू घडामोडी –
Q8] जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) एका अहवालानुसार, _____ देश 2019 साली जगातील तिसरा सर्वात मोठा कापूस निर्यातदार (7.6 टक्के) आणि चौथा सर्वात मोठा आयातदार देश (10 टक्के) होता.
1) मेक्सिको
2) न्युझीलँड
3) भारत
4) मलेशिया
उत्तर :-गेल्या 25 वर्षातील जागतिक कृषी व्यापाराच्या कलाविषयी जागतिक व्यापार संघटनेने (WTO) प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, भारत देश 2019 साली जगातील तिसरा सर्वाधिक मोठा कापूस निर्यातदार (7.6 टक्के) आणि चौथा सर्वाधिक मोठा आयातदार देश (10 टक्के) होता. 2019 साली सर्वाधिक कृषी उत्पन्न निर्यात करणार्या पहिल्या 10 देशांच्या यादीत भारत दाखल झाला आहे.
चालू घडामोडी –
Q9] खालीलपैकी कोणते चक्रीवादळ ‘झेजियांग’ प्रांताला तसेच फिलीपिन्समधील मनिलाला आणि तैवानला नुकसान पोहचविल्यानंतर 26 जुलै 2021 रोजी चीनच्या शांघाय या शहरात दाखल झाले?
1) हिक्का
2) इन-फा
3) महा
4) वायु
उत्तर :- ‘झेजियांग’ प्रांताला तसेच फिलीपिन्समधील मनिलाला आणि तैवानला नुकसान पोहचविल्यानंतर ‘इन-फा’ चक्रीवादळ 26 जुलै 2021 रोजी चीनच्या शांघाय या शहरात दाखल झाले.
चालू घडामोडी –
Q10] कोणत्या दिवशी ‘CRPF’ दलाने त्याचा 83 वा स्थापना दिवस साजरा केला?
1) 25 जुलै
2) 26 जुलै
3) 24 जुलै
4) 27 जुलै
उत्तर :- 27 जुलै 2021 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) त्याचा 83 वा स्थापना दिवस साजरा केला. CRPF हे केंद्रीय गृह कार्य मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असलेले भारतातील सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents