चालू घडामोडी : 16 जुलै 2021
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 16 JULY 2021 | चालू घडामोडी : १६ जुलै २०२१
चालू घडामोडी –
Q1] कोणता देश ‘लिंगलोंग वन’ नामक जगातील पहिली व्यावसायिक मॉड्यूलर छोटी अणुभट्टी बांधत आहे?
1) चीन
2) जपान
3) दक्षिण कोरिया
4) यापैकी नाही
उत्तर :- चीन देशाने ‘लिंगलोंग वन’ नामक जगातील पहिल्या व्यावसायिक मॉड्यूलर छोट्या अणुभट्टीच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. या अणुभट्टीची निर्मिती क्षमता 1 अब्ज किलोवॅट प्रती तास असू शकते.
चालू घडामोडी –
Q2] कोणत्या दिवशी ‘जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवस’ साजरा करण्याचा निर्णय भारतीय प्लास्टिक सर्जन संघाने (APSI) घेतला?
1) 15 जुलै
2) 14 जुलै
3) 13 जुलै
4) 12 जुलै
उत्तर :-भारतीय प्लास्टिक सर्जन संघाने (APSI) दरवर्षी 15 जुलै या दिवशी ‘जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवस’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
चालू घडामोडी –
Q3] रेल्वे स्थानकाच्या इमारतीवरील भारतातील प्रथम पंचतारांकित हॉटेल ____ या शहरात उभारण्यात आले आहे.
1) पुणे
2) गांधीनगर
3) मुंबई
4) इंदूर
उत्तर :- गुजरातच्या गांधीनगर रेल्वे स्थानकाच्या इमारतीवर भारतातील प्रथम पंचतारांकित हॉटेल उभारण्यात आले आहे.
चालू घडामोडी –
Q4] खालीलपैकी कोणते पासिघाट (अरुणाचल प्रदेश) येथील पूर्वोत्तर लोक औषधी संशोधन संस्था (NEIFM) याचे नवीन नाव आहे?
1) पूर्वोत्तर आयुर्वेद संस्था
2) पूर्वोत्तर लोक औषधी संघटना
3) पूर्वोत्तर आयुर्वेद व लोक औषधी संशोधन संस्था
4) पूर्वोत्तर वैद्यकीय संशोधन संस्था
उत्तर :- केंद्रीय मंत्रिमंडळाने पासिघाट (अरुणाचल प्रदेश) येथील पूर्वोत्तर लोक औषधी संशोधन संस्था (NEIFM) याचे नवीन नामकरण करण्यासंबंधीचा प्रस्ताव मान्य केला असून त्यानुसार संस्थेचे ‘पूर्वोत्तर आयुर्वेद व लोक औषधी संशोधन संस्था (NEIAFMR)’ असे नवीन नाव असणार आहे.
चालू घडामोडी –
Q5] कोणत्या देशात ‘काबो डेलगॅडो’ नामक प्रांत आहे?
1) मोझांबिक
2) टांझानिया
3) झिंबाब्वे
4) दक्षिण आफ्रिका
उत्तर :- आफ्रिकेच्या मोझांबिक देशात ‘काबो डेलगॅडो’ नामक एक प्रांत आहे.
चालू घडामोडी –
Q6] जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या घोषणेनुसार, कोणत्या देशात 2026 या वर्षात ‘जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद’ स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे?
1) अमेरिका
2) भारत
3) चीन
4) फ्रान्स
उत्तर :- जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या घोषणेनुसार, भारत देशात 2026 या वर्षात ‘जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद’ स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
चालू घडामोडी –
Q7] कोणत्या व्यक्तीची राज्यसभेच्या सभापती पदावर निवड झाली?
1) थावरचंद गहलोत
2) अनुराग ठाकूर
3) नितीन गडकरी
4) पीयूष गोयल
उत्तर :-संसदेच्या पावसाळी सत्राला 19 जुलै 2021 पासून सुरूवात होणार असून त्याचा 13 ऑगस्ट 2021 रोजी समारोप होणार. याच पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या सभापती पदावर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पीयूष गोयल यांची निवड झाली आहे. थावरचंद गेहलोत यांच्या जागी त्यांची नियुक्ती केली गेली आहे.
चालू घडामोडी –
Q8] ‘सायबरट्रॅक’ गाडीत सॅमसंग कंपनीने त्याचा नवीन कॅमेरा वापरण्यासाठी _____ सोबत 436 दशलक्ष डॉलरच्या मूल्याचा करार केला आहे.
1) पोर्श
2) टेस्ला
3) लेक्सस
4) मर्सिडीज-बेंझ
उत्तर :-टेस्ला कंपनीने तयार केलेल्या ‘सायबरट्रॅक’ गाडीत सॅमसंग कंपनीने तयार केलेला नवीन कॅमेरा वापरण्यासाठी सॅमसंग कंपनीने टेस्ला कंपनीसोबत 436 दशलक्ष डॉलरच्या मूल्याचा करार केला आहे.
चालू घडामोडी –
Q9] कोणत्या खेळाडूने ‘युरो चषक 2020’ या फुटबॉल स्पर्धेचा ‘गोल्डन बूट’ सन्मान जिंकला?
1) क्रिस्टियानो रोनाल्डो
2) लिओनेल मेस्सी
3) एंटोइन ग्रीझमन
4) यापैकी नाही
उत्तर :- पोर्तुगालच्या क्रिस्टियानो रोनाल्डो या फुटबॉलपटूने ‘युरो चषक 2020’ या फुटबॉल स्पर्धेचा ‘गोल्डन बूट’ सन्मान जिंकला. ही स्पर्धा इटलीने जिंकली.
चालू घडामोडी –
Q10] कोणत्या दिवशी ‘फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस’ साजरा करतात?
1) 12 जुलै
2) 14 जुलै
3) 13 जुलै
4) 15 जुलै
उत्तर :- फ्रान्स हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. 14 जुलै 1789 रोजी पॅरिस शहरातील बॅस्तिये किल्ल्यावर हल्ला करून तेथील जनतेने फ्रेंच राज्यक्रांतीची सुरुवात केली. त्या दिवशी अन्नाचा तुटवडा आणि कमकुवत, अस्थिर अर्थव्यवस्थेमुळे संतप्त झालेल्या जमावाने किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि राजाचा शिरच्छेद करून इतर सर्व राजकीय लोकांना कैदेत ठेवले होते. तीन वर्षांच्या काळात फ्रान्सवरील अनियंत्रित राजसत्ता जाऊन त्याठिकाणी लोकशाही आली. त्यामुळे दरवर्षी 14 जुलै या दिवशी ‘फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस’ साजरा करतात. या दिनाला ‘बॅस्तिये दिवस’ असेही म्हणता
आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents