संत ज्ञानेश्वर (1197-1275) यांच्या बद्दल संपूर्ण महिती
(जन्म : 1197 - मृत्यु : 1275)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपाष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत.
संत ज्ञानेश्वर (1197-1275) यांच्या बद्दल संपूर्ण महिती
संपूर्ण नाव : ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
जन्म व निर्वान : जन्मगाव – आपेगाव
समाधी आळंदी – पुणे
जन्म : शके ११९७, इ. स. १२७५
स्वईच्छेने समाधी वयाच्या २१ व्या वर्षी
ज्ञानेश्वरांचे बालपण
ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे अकराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्ती हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.)
आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.
विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यास्याची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले.
लेखन –
- भावार्थ दीपीका किंवा ज्ञानेश्वरी (शके १२१२ इ. स. १२९०)
(आठरा आध्याय नऊ हजार ओवी)
२) पसायदान
३) हरिपाठ
विचार :
- समतेचा पालनकर्ता, सर्वधर्म समभाव
ज्ञानेश्वरांचे कार्य
संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा मराठी संस्कृतीवर असलेला प्रभाव आजही अबाधित आहे.
निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने – ६.१४)
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.
ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ
- अमृतानुभव
- चांगदेव पासष्टी
- भावार्थदीपिका (किंवा ज्ञानेश्वरी) – या ग्रंथाचा शेवट पसायदान या नावाने ओळखला जातो.
- स्फुटकाव्ये (अभंग, विराण्या, आदि.)
- हरिपाठ (श्री ज्ञानदेव हरिपाठ)
चित्रपट
ज्ञानेश्वरांच्या जीवनावर ’संत ज्ञानेश्वर’ नावाचा मराठी चित्रपट प्रभात फिल्म कंपनीने काढला होता. तो १८ मे १९४० रोजी एकाच वेळी मुंबईत आणि पुण्यात प्रकाशित झाला. पुण्यात तो ३६ आठवडे चालला. या चित्रपटामुळे प्रभातची कीर्ती जगभर पसरली. आजही हा चित्रपट गर्दी खेचतो.
- संत ज्ञानेश्वर नावाचा हिंदी चित्रपट सन १९६४ मध्ये बनला होता.
स्मारके
- अहमदनगर जिल्ह्यात नेवासा येथे संत ज्ञानेश्वर नावाची शाळा आहे.
- आळंदीला ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि तिने चालविलेले ज्ञानेश्वर विद्यालय आहे. ही प्रशाला भावी कीर्तनकार, प्रवचनकार घडविणारी प्रबोधन शाळा आहे.
- औरंगाबाद जिल्ह्यातील हर्सूल गावी ’श्री संत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठान’ची वेद शाळा आहे.
- गोंदिया जिल्ह्यात पांढराबोडी येथे संत ज्ञानेश्वर आदिवासी निवासी आश्रमशाळा होती।
- संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा, तळेगांव
- श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय, महर्षीनगर, पुणे
- संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, इस्लामपूर (सांगली जिल्हा)
- एमआयटी संस्थेचे श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय (पुणे)
- संत ज्ञानेश्वर उद्यान, निगडी (पुणे)
श्री संत ज्ञानेश्वर संबंधित निवडक पीएच. डी प्रबंध
· श्री संत ज्ञानेश्वर एक विभूती चिकित्सा
· संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथातील शिक्षण व मुल्यविचारांचा चिकित्सक अभ्यास
· संत ज्ञानेश्वर आणि संत मीराबाई यांच्या मधुराभक्तीपर काव्याचा तौलनिक अभ्यास
· संत साहित्यातील कल्याणाच्या अर्थशास्त्राचा एक तौलनिक अभ्यास : विशेष संदर्भ – संत तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ व नामदेव
· नामदेव- ज्ञानदेवकालीन मराठी संत साहित्याचे सांस्कृतिक, सामाजिक व वाण्ग्मयीन आकलन: एक अभ्यास
संजीवन समाधी
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपआपली इहलोकीची यात्रा संपवली.
इंद्रायणीच्या तीरावर आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्येपर्यंत साजरा केला जातो. यातील प्रत्येक दिवसाला आगळेवेगळे महत्व आहे.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents