विनायक दामोदर सावरकर (1883-1966) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८८३ - मृत्यू : १९६६)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
850

विनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; मृत्यू : मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.भाषाशुद्धीचा आग्रह धरून सावरकरांनी मराठी भाषेला ४५ शब्द दिले आहेत.

विनायक दामोदर सावरकर (1883-1966) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

विनायक दामोदर सावरकर
विनायक दामोदर सावरकर

जन्म: २८ मे १८८३, भगूर (नाशिक)

  • भारतीय स्वातंत्र्य सैनिक, मराठी कवी आणि लेखक
  • विज्ञानाचा पुरस्कार व जातीभेदाचा विरोध करणारे समाज क्रांतीकारक
  • भाषाशुद्धी, लीपी शुद्धी चळवळीचे प्रनेते

प्रभाव – शिवाजी महाराज, जोसेफ मॅझिनी

प्रभावित

नथुराम गोडसे, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, अमित शहा
  • चाफेकर बंधुना फाशी दिल्याचे कळाल्यावर – कुलदेवता भगवतीच्या पुढे ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी शपत घेतली.
  • १९०९ मध्ये यमुना बाई सोबत विवाह
  • १९०२ फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश.
  • १९०६ उच्च शिक्षणासाठी लंडन,
  • राष्ट्रभक्त समुह ही गुप्त संघटना – पागे व म्हस्कर यांच्या मदतीने स्थापन. या संघटनेचे पुढे अभिनव भारत संघटनेत रुपांतर.
  • १९०५ मध्ये पुण्यात विदेशी कापडाची होळी.
  • श्यामजी कृष्णवर्मा यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती वि.दा.सावरकर यांना मिळवून देण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले.
  • लंडनला – इंडिया हाऊसमध्ये भारताचे क्रांतीपर्व सुरु केले.
  • मदनलाल धिंद्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य,
  • १८५७ मध्ये झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहीला. १८५७ चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ प्रकाशनापूर्वी ब्रिटीशांनी हा ग्रंथ जप्त केला.
  • सावरकरांचा मित्र कुटिन्हो यांनी या ग्रंथाची मुळ हस्तलिखीत प्रत जपून ठेवली होती. स्वातंत्र्यानंतर प्रकाशित.
  • सावरकरांना २ जन्मठेपांची सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात ठेवण्यात आले.
  • बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.
  • विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांच्या प्रयत्नांनी आणि सावरकरांनी ब्रिटीशांची काही बंधने मान्य केल्यामुळे सुटका.
  • रत्नागिरी येथे पतित पावन मंदीराची स्थापना केली.
  • जातीभेद कमी करण्यासाठी – सामाईक भोजनालये सुरु.
  • १९३७ हिंदू महासभेचे अध्यक्षपद भुषवले (७ वर्षे)
  • १९३८ अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचे अध्यक्ष – मुंबई

सावरकर साहित्य :

– निबंधकार, नाटककार, कादंबऱ्यांचा लेखक, ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ.

पहिले काव्य फटका (११ व्या वर्षी)

ग्रंथ व पुस्तके :

प्रचंड प्रसिद्ध कविता :

१. सागरा प्राण तळमळला                           २. हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

३. जयोस्तुते                                                    ४. तानाजीचा पोवाडा

 

महत्त्वाची पुस्तके :

१) अखंड सावधान असावे.                                    २) १८५७ चे स्वातंत्र्य समर

३) अंधश्रद्धा भाग १ आणि भाग २                          ४) गांधी आणि गोंधळ

५) माझी जन्मठेप                                                     ६) हिंदूत्व

७) क्ष-किरण

 

इतिहास :

१. भारताच्या इतिहासातील ६ सोनेरी पाने

२. हिंदूपदपादशाही

 

कादंबरी :

१) काळेपाणी

२) मला काय त्याचे (मोल्यांचे मंड)

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर

आत्मचरित्रपर

१) माझी जन्मठेप

२) शत्रुच्या शिबीरात

३) अथांग

 

नाटके :

१) बोधीवृक्ष (अपूर्ण)

२) संगीत उत्तरक्रिया

 

महाकाव्ये :

१) कमला

२) गोमांतक

३) विरहोच्छवास

४) सप्तर्षी

 

पुरस्कार : (सावरकरांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात)

१) निनाद तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर ध्येयवादी

२) दादर – स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने

१. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार                                                            २. विज्ञान पुरस्कार

३. समाजसेवा पुरस्कार                                                                                            ४. शौर्य पुरस्कार

३) वीर सावरकर फाऊंडेशन – वीर सावरकर पुरस्कार

 

  • संपादीत लेख – गाय हा एक उपयुक्त पशू
  • सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी – प्रसिद्ध मराठी लेखक व पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.
  • मृत्यूपत्रात – माझे प्रेत शक्यतो विद्युत चितेवरच जाळण्यात यावे.

मृत्युपत्र

‘माझे प्रेत शक्यतो विद्युत-चितेवरच जाळण्यात यावे. जुन्या पद्धतीप्रमाणे ते शक्यतो माणसांनी खांद्यावरून नेऊ नये, किंवा कोणत्याही प्राण्याच्या गाडीमधून नेऊ नये, तर ते यांत्रिक शववाहिकेतूनच विद्युत – स्मशानात नेले जावे.. माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकाने किंवा व्यवसाय बंद ठेवू नयेत. कारण त्याने समाजाला फार त्रास होतो.

घरोघरीच्या संसारासाठी दैनिक आवश्यकतेच्या वस्तू न मिळाल्याने अडथळा होतो. माझ्या निधनानिमित्त कोणीही सुतक, विटाळ, किंवा ज्यायोगे कुटुंबीयांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो अश्या पिंडदानासारख्या कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत. त्या पिंडांना काकस्पर्श होईतो वाट पाहत बसणे इत्यादी कालबाह्य गोष्टी पाळू नयेत.’ वगैरे

मृत्यू : १ फेब्रुवारी १९६६ (वयाच्या ८३ व्या वर्षी)

अत्र, पाणी, औषधांचा त्याग करण्याचा निर्णय

  • २६ फेब्रुवारी १९६६ ला मृत्यू.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम