गोपाळ गणेश आगरकर 1856 – 1895 यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८५६ - मृत्यू : १८९५)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,326

गोपाळ गणेश आगरकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

गोपाळ गणेश आगरकर (जन्म : टेंभू-सातारा, १४ जुलै १८५६; मृत्यू : १७ जून १८९५) हे महाराष्ट्रातील पत्रकार व समाजसुधारक होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला.

गोपाळ गणेश आगरकर
गोपाळ गणेश आगरकर

जन्म : १४ जुलै १८५६ (टेंभू जि. सातारा) –

वडिल : गणेश आगरकर

गोपाळ गणेश आगरकर : कऱ्हाड (मामाकडे)

मॅट्रिक पर्यंत शिक्षण – अकोला

  • वऱ्हाड समाचार लेख
  • पुण्यात १८८१ इतिहास व तत्वज्ञान विषय घेऊन एम. ए. केले. १८८० न्यु इंग्लिश स्कूल, स्थापनेत पुढाकार घेतला. (आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूनकर, टिळक)
शैक्षणिक :
  • २४ ऑक्टोबर १८८४ आगरकर आणि टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
  • १८८५ फर्ग्युसन कॉलेज स्थापना.
  • आगरकर १८९२-९५ मध्ये फर्ग्युसन कॉलेजचे प्राध्यापक. १८८५ न्यु इंग्लिश स्कूलचे सुप्रीटेडंट म्हणून नियुक्ती
  • १८९० फर्ग्युसन कॉलेज व डेक्कन एज्यु. सोसायटी सदस्यांचा राजीनामा.
  • प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे.

जे पालक मुलामूलींना प्राथमिक शिक्षण देणार नाही त्यांना दंड.

  • मुलामूलींना बरोबरीने शिक्षण देण्याची भूमिका.
  • विद्यापीठ शिक्षणाचे माध्यम देशी असावे असे त्यांना वाटत होते.
  • प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी.

 

वाङमयीन कार्य :

  • लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या केसरी व मराठा यापैकी केसरीचे संपादक आगरकर.
  • इष्ट असेल तर बोलणार व साध्य असेल तेच करणार हे केसरीचे ब्रिद वाक्य.
  • मतभेदामुळे २५ ऑक्टोबर १८८७ ला केसरीचे संपादकत्व सोडले.
  • १५ ऑक्टोबर १८८८ सुधारक हे साप्ताहिक काढले. (मराठी लेखन)
  • आगरकरांच्या मृत्यूनंतर १९१४ पर्यंत देवधर व पटवर्धन यांनी वृत्तपत्र चालवली. तर १९१४-१६ पर्यंत रामचंद्र विष्णु करनडे यांनी सुधारक चालविली.
  • स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजे असा लेख लिहीला.
  • हिंदूस्थानचे राज्य कोणासाठी या निबंधात त्यांनी सरकारचा स्वार्थीपणा अधोरेखित केला.
  • गुलामांचे राष्ट्र या पुस्तकात त्यांनी भारतीयाकडे धैर्य, ज्ञान, उत्साह यांची उणीव आहे, ते कष्टाळू नाहीत आणि त्यांच्याकडे सत्य सांगण्याची हिम्मत नाही असे लिहिले.

 

सामाजिक कार्य :

– बुद्धीवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला.

– व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला.

– आगरकरांनी सुधारक वृत्तपत्राच्या पहिल्या अंकात हिंदू सामाजाच्या दुरावस्थेची कारणे –

१) लोकांची भूगोल व इतिहासाविषयीचे अज्ञान        २) समाजातील तर्कहीन आकार – विचार

३) समाजातील जातीभेद अस्पृश्यता                          ४) समाजातील स्त्रीयांची हलाखीची परिस्थिती

५) देशातील परंपरागत राजेशाही                              ६) लोकांतील देशाभिमानाचा अभाव

– पुणे पालिकेच्या ताब्यातील पाण्याच्या हौदावर ‘ब्राह्मणासाठी’ व ‘क्षुद्रांसाठी’ असे फलक होते. त्यावर ३० जानेवारी १८९३ ला आगरकरांनी मुन्सिपल हौद व ‘ब्राह्मन्यांवर गदा’ हा लेख लिहून अस्पृश्यतेवर टिका केली.

गोपाळ गणेश आगरकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
गोपाळ गणेश आगरकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

स्त्री सुधारणा :

  • त्यांच्या मते स्त्रियांच्या दुःस्थितीचे सर्वात मोठे कारण म्हणजे बालविवाह.
  • विद्यार्थी व सुशिक्षीत तरुणांना बालविवाह विरोध पुढाकार घ्यायला सांगितले, त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र बालविवाह निर्बंधक मंडळी स्थापावी व त्याची संख्या २००० असावी व निधि उभारावा म्हणजे बालविवाह विरोधात यशस्वी कार्य करता येईल असे सांगितले.
  • स्त्रीयांच्या स्वयंवर विवाह पद्धतीस विरोध
  • ५०/६० वर्षाचा पुरुष व ११/१२ वर्षांची मुलगी यांचा विवाहाला जरठ विवाह म्हणतात. त्यांनी जरठविवाहास विरोध केला.

 

स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार :

  • सुधारकमध्ये मराठमोळा व मराठमोळ्याची पूरवणी हे लेख लिहीले.
  • स्त्री पुरुषात समानता.
  • संतती नियमाला पाठींबा दिला.

 

धार्मिक विचार: मूर्तीपुजा मान्य नव्हती.

  • मुर्तीपूजेचा उद्रेक व मुर्तीपूजेचे प्रकार हा लेख लिहिला.
  • ईश्वराचे अस्तित्व नाकारले.
  • पशुहत्येवर टीका केली.
  • आगरकरांनी १९ व २६ डिसेंबर १८१२ रोजी सुधारकमध्ये प्रेनक्रिया व प्रेतसंस्कार शिर्षकाचे २ लेख लिहिले.
  • सोवळ्यांची मिमांसा व सोवळ्या ओवळ्यांची पूरवणी हे दोन लेख लेहून सोवळ्या ओवळ्यांची कल्पना मांडली.
  • आगरकरांना बद्धीवादाचे जनक म्हटले जाते.

इतर :

  • अकोल्यातील शिक्षण ‘व्ही. एम. महाजनी’ या शिक्षकाच्या मदतीने विधवा विवाहाचा पुरस्कार केला व केशव कर्वे आणि गोंदूताईचा विवाह घडविला.
  • पुण्यातील सनातनी मंडळींनी आगरकर जिवंत असतानाच त्यांची प्रेत यात्रा काढली.
  • वाक्य मिमांसा व वाक्याचे पृथ्यकरण (१८८८), केसरीतील निवडक निबंध भाग – १ व २ (१८८७) जात्युच्छोक निबंध शेठ माधवदास रघुनाथदास व धनकुवरबाई यांचे पूनर्विवाह चरित्र लिहीले.
  • शब्दापेक्षा ज्ञान व ज्ञानपेक्षा विज्ञान शेष्ठ अशी भावना.

 

भाष्यकार:

  • गो. कृ. गोखले विद्वान पंडित, देशभक्त, निर्भय शक्तीवान पुरुष म्हणजे आगरकर यांच्यासारखी माणसे कित्येक – वर्षात एखाद्या वेळीच जन्माला येतात म्हणून त्यांचा मृत्यू राष्ट्रीय आपत्ती ठरतो.
  • मे. पु. गे –  ‘आगरकर हे विवकवादाचा संत होते.
  • गोपाळ गणेश आगरकर याच्या स्मृतीप्रित्यर्थ आचार्य अत्रे यांनी पुण्यात इ. स. १९३४ साली ‘आगरकर हायस्कूल’ ही मूलींची शाळा स्थापन केली.
  • मृत्यू – १८९५

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम