पांडुरंग महादेव बापट (सेनापती बापट) 1880 – 1967 यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,748

पांडुरंग महादेव बापट (सेनापती बापट) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

पांडुरंग महादेव बापट ऊर्फ सेनापती बापट (नोव्हेंबर १२, इ. स. १८८० – नोव्हेंबर २८, इ. स. १९६७) हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक होते.
पांडुरंग महादेव बापट (सेनापती बापट)
पांडुरंग महादेव बापट (सेनापती बापट)

जन्म : १२ नोव्हेंबर १८८०, पारनेर (जि. अहमदनगर)

मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६७ – मुंबई

वडील : महादेव बापट

आई : गंगाबाई बापट

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा

शिक्षण :

  • सेनापती बापट यांचे प्राथमिक, माध्यमिक व बी. ए. पर्यंतचे उच्च शिक्षण पुणे येथे झाले.
  • अहमदनगरला मॅट्रीकची परीक्षा दिली, तेव्हा त्यांना संस्कृतची ‘जगन्नाथ शंकरशेठ’ शिष्यवृत्ती मिळाली.
  • १९०३ साली बी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून इंग्लंडला गेले.
  • एडिंबरो येथे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
  • पारनेर मधील घर सेनापती बापट स्मारक म्हणून ओळखले जाते.

कार्य :

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गुप्तपणे बॉम्ब तयार करण्याची कला शिकली व त्यांचे सहकारी सेनापती बापट आणि हेमचंद्र दास या सहकारी मित्रांना हे तंत्र शिकण्यास पॅरिसला पाठवले.
  • अलीपूर बॉम्ब खटल्यात सहभागी असल्याचा अरोप सेनापती बापट यांच्यावर होता.
  • १९२१ पर्यंत स्वतःच्या गावी शिक्षक म्हणून राहीले व समाजसेवा हेच व्रत घेतले.
  • १९२१ ते १९२४ या कालखंडात पुणे जिल्ह्यातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रह अंदोलन चालवले.
  • स्वातंत्र्योत्तर काळातही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महराष्ट्र आंदोलन इत्यादी आंदोलनात बापटांचा पुढाकार.
  • एप्रिल १९१५ मध्ये पुण्यात वासुकाका जोशी यांच्या चित्रमयजगत या मासिकेत नोकरी करु लागले.
  • लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी वृत्तपत्रात, दैनिक मराठात ही नोकरी केली.
  • मराठा सोडल्यानंतर लोकसंग्रह नावाच्या दैनिकात राजकारणावर लिखाण करू लागले.
  • डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ज्ञानकोशाचे कामही बघत.
  • सेनापती बापट यांनी मुंबईत झाडूवाल्यांचे नेतृत्व केले.
  • त्यासाठी मुंबईच्या संदेश नावाच्या वृत्तपत्रात मोठे निवेदन दिले.
  • बापट यांनी झाडू-कामगार मित्रमंडळाची स्थापना केली.
  • अंदमानमध्ये काळ्या पाण्याची जन्मठेप भोगत असलेल्या कैद्यांच्या सुटकेसाठी डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्यासह एक सद्यांची मोहिम चालविली.
  • यासाठी राजबंदी मुक्ती मंडळ स्थापन केले.
  • १९४८ साली नागपूर येथे बापट यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी परिषदेचे आयोजन कण्यात आले.

पांडुरंग महादेव बापट (सेनापती बापट)

नोव्हेंबर १९१४मध्ये सेनापती बापटांना मुलगा झाला. त्याच्या बारशाच्या निमित्ताने बापटांनी पहिले भोजन हरिजनांना दिले. एप्रिल १९१५मधे ते पुण्यात वासूकाका जोशी यांच्या चित्रमयजगत या मासिकात नोकरी करू लागले. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी वृत्तपत्रात, दैनिक मराठातही नोकरी केली आहे. मराठा सोडल्यानंतर ते लोक-संग्रह नावाच्या दैनिकात राजकारणावर लिखाण करू लागले.

त्याच बरोबर डॉ॰ श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ज्ञानकोशाचे कामही ते बघत. बापटांच्या पत्‍नीचे ४ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले. त्यानंतर सेनापती बापट मुंबईतीत झाडूवाल्यांचे नेतृत्व करू लागले. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या संदेश नावाच्या वृत्तपत्रात एक मोठे निवेदन दिले. झाडू-कामगार मित्रमंडळ नावाची संस्था त्यांनी स्थापन केली.

सप्टेंबर १९२९मध्ये, झाडूवाल्यांशी मानवतेने वागण्याचा पुकारा करीत बापटांनी गळ्यात पेटी लटकावून भजन करीत शहरातून मुंबईच्या चौपाटीपर्यंत मोर्चा काढला. शेवटी त्यांनी पुकारलेल्या संपाची यशस्वी सांगता झाला.

स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इ. आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. आंदोलन करीत असताना कारागृहात आंदोलनाला पूरक अशा तऱ्हेचे साहित्य लिहिले व ते प्रकाशित केले. त्यांनी अपुरे राहिलेले छोटेसे आत्मचरित्र लिहिले आहे. बरेचसे लेखन मराठीत व थोडे इंग्रजीत व संस्कृतमध्ये केले; लेखनाला पद्याकार दिला.

क्रांतिवादी राजकारणाचे समर्थन करणारे, भगवतगीतेच्या तत्त्वज्ञानावर आधारलेले, राष्ट्रमुक्ती व अन्याय प्रतिकार या दोन मुद्यांना अनुसरून युक्तिवाद केलेले हे साहित्य आहे. चैतन्यगाथा हे पुस्तक वाचले म्हणजे त्यांचे मूलभूत विचार लक्षात येतात.

मराठीमध्ये योगी अरविंदांच्या इंग्लिशमधील आध्यात्मिक तत्त्वज्ञानावरील ग्रंथांचा उत्कृष्ट अनुवाद बापटांनी केला आहे. अरविंदांचा दिव्यजीवन हा मोठा ग्रंथ बापटांनी प्रसन्न शैलीने मराठीत उतरविला आहे. त्यांचे साहित्य समग्र ग्रंथ (१९७७ ) म्हणून साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानाने प्रसिद्ध झाले आहे.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम