डाॅ. शंकरराव भाऊराव चव्हाण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म: १९२०- मृत्यू : २००४)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
शंकरराव भाऊराव चव्हाण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
नाव: शंकरराव भाऊराव चव्हाण
जन्म: १४ जुलै १९२०
जन्मगाव: पैठण जि. औरंगाबाद
वडील : भाऊराव चव्हाण (शेतकरी होते)
शिक्षण : प्राथमिक शिक्षण पैठण, बी. ए., एल. एल. बी उस्मानिया विध्यापीठ (हैद्राबाद)
- लक्ष्मीबाई-भाऊराव हे माता-पिता, ज्येष्ठ बंधू नारायणराव आणि मार्गदर्शक स्वामी रामानंद तीर्थ यांच्या शाश्वत संस्कारांच्या मुशीतून शंकररावजींचे व्यक्तिमत्त्व घडले होते.
- डाॅ.शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चाैथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते.
- १९४५ वकीलीची सनद मिळाली.
- हैद्राबाद मुक्तीसंग्रामात सहभागी झाले. (रामानंद तीर्वाांच्या सल्ल्याने)
- कार्याचे केंद्र – पुसद तालुका, गाव – उमरखेड
- १३ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तुत्वाचे एक पर्व पूर्ण झाले.
राजकीय कारकींद –
- कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नसताना शंकररावजींनी शून्यातून विश्व निर्माण केले.
- राजकीय कार्यकर्तृत्वाची कमान सदैव चढती- वाढती राहिली.
- १९४८-४९ नांदेड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस, १९५२ निवडणूकीत पराभव.
- नांदेड शहरात नगरपालिके सहकारी क्षेत्रात कामगार वर्गात काम केले.
- १९५६ नांदेडचे नगराध्यक्ष
- नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष.
- हैद्राबाद राज्य सहकारी बँकेचे संचालक.
- १९५६ मंत्रीमंडळात उपमंत्री पद मिळाले.
- १९६० मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले
- शंकररावजींनी विविध लघु, मध्यम व मोठे पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करून कोरडवाहू शेतीत रात्रंदिवस राबराब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविली.
- महाराष्ट्राच्या ‘जलसंस्कृतीचे जनक’ असाही शंकररावजींचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येतो, तो अगदी यथार्थ आहे.
- १९७२ ते १९७५ कृषीमंत्री
- २१ फेब्रुवारी १९७५ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
- १३ मार्च १९८६ ते १९८८ पुन्हा मुख्यमंत्री.
राजकीय कार्य :
- पाटबंधारे मंत्री म्हणून काही विशेष कामे.
- कृष्णा गोदावरी पाणी तंटा भूमिका महत्त्वाची आहे.
- गोदावरी पुर्णा आणि मांजरा प्रकल्पामुळे मराठवाड्याचा विकास.
- जायकवाडी धरण हे शंकररावजीं यांच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे
- कोणताही राजकीय प्रश्न ते समजुतीने सोडवीत.
- १९७५ मधील राज्य सहकारी कर्मचाऱ्याचा संप हातळला.
- रामानंद तीर्थ व गोविंद श्रॉफ यांना ते राजकीय गुरू मानत.
- मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे गुणविशेष.
- फेब्रुवारी २६, इ.स. २००४ रोजी त्यांचे निधन झाले.
- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्यांचे सुपुत्र.
निधन : २६ फेब्रुवारी २००४
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents