अण्णाभाऊ साठे (1920-1969) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट १९२० — १८ जुलै १९६९) हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे एका दलित समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले.
अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
जन्म : १ ऑगस्ट १९२०
मृत्यू: १८ जुलै १९६९
जन्म ठिकाण : वाटेगाव ता. वाळवा, जि. सांगली
पूर्ण नाव: तुकाराम भाऊराव साठे
वडिल : भाऊराव
आई : वालुबाई
पत्नी : कोंडाबाई साठे, जयवंता साठे
आपत्य : मधुकर, शांता, शकुंतला
- १४ व्या वर्षी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात.
- रेठर्याच्या जत्रेत क्रांतीसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले त्यांचा परिणाम भाऊवर झाला.
- कमुनिस्ट पक्षाचे काम करत असताना त्याच्या तुकाराम नावाचे अण्णा मध्ये रुपांतर झाले.
- वयाच्या १७ व्या – १८ व्या वर्षी अण्णांवर कुटूंबाची जबाबदारी आली व गिरणी कामगार म्हणून कामाला सुरुवात केली. – कोहिनुर मिल
- मिलमधील नोकरी सुटल्यानंतर कुटूंबासह वाटेगावला आले इथे गावाकडे रमले नाही व ते नातेवाईकांच्या तमाशा फडात शामिल झाले.
- भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्तीसंग्रामाच्या चळवळीत त्यांनी जनजागृती केली.
- वाटेगावात ते चलेजाव चळवळीत बर्डे गुरूजीसोबत त्यांच्यावर अटकवॉरंट निघाले पुढे ते कम्युनिस्ट पक्षाचे पुर्णवेळ काम करू लागले.
- १९४४ लालबावटा कलापथकाची स्थापना (सहकारी शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर)
- मुंबईतील माटुंगा लेबर कॅम्प या दलीत वस्तीत कमुनिस्ट चळवळीत कार्य सुरु.
(सहकारी आर. बी. मोरे, के. एम. साळवी, शंकर पगारे)
- पहिले गाणे – लेबरकॅम्प मच्छरांवर लिहीले.
- १९५० ते १९६२ हा काळ आण्णांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ.
- मुंबई सरकारने लालबावटा कलापथकावर बंदी घातली.
- तमाशावर बंदी आल्याने आण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला.
- ३०० पेक्षा जास्त कथा.
- १६ ऑगस्ट १९४७ भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून मुंबई येथे २० हजार लोकांचा मोर्चा काढला.
- मोर्चातील घोषणा – ये आझादी झुटी है, देश कि जनता भुखी है !
- १९५८ बॉम्बे – दलित साहित्य संमेलन उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, ‘पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसुन दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे.’
- १ ऑगस्ट २००१-४रू. टपाल तिकिटावर साठेचे चित्र ठेवले होते.
- साहित्य – कथासंग्रह :
१) निखारा २) नवती ३)फरारी
४) पिसाळलेला माणुस ५) जिवंत काडतुस ६) आबी
७) खुळंवाडा ८) गजाआड ९)बरबाद्या कंजारी(१९६०)
१०) चिरानगरीची भुतं (१९७८) ११) कृष्णाकाढच्या कथा १२) उपकाराची फेड
१३) कोंबडी चोर १४) बंडवाला १५) मरीआईचा गाडा
१६) रामोशी १७) वळणसापळा
- कादंबऱ्या :
– १९६१ फकिरा कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ठ कादंबरीचा पुरस्कार.
१) चित्रा (१९४५) २) फकिरा (१९५९) ३) माकडीचा माळ ४)वारणेचा वाघ (१९६८)
५) रानगंगा ६) चिखलातील कमळ ७) वैजयंता ८) रत्ना
९) गुलाम १०) रुपा ११) चंदन १२) मथुरा
१३) आवडी १४) वैर १५) पाझर १६) अग्निदिन्य
१७) संघर्ष १८) अलगुज १९) अहंकार २०) आग
२१) आघात २२) केवड्याच कर्णास २३) कुरूप २४) ठासलेल्या बंदुका
२५) डोळे मारीत राधा चाले २६) धुंद रानपुलाचा २७) फुलपाखरू २८) तास
२९) मंगला ३०) मास्तर ३१) मुर्ती ३२) रावा
३३) रानबोका
- लोकनाट्य :
१) अकलेची गोष्ट (१९४५) २) देशभक्त घोटाळे (१९४६)
३) शेटजीचे इलेकशन (१९४६) ४) बेकायदेशी (१९४७)
५) पुढारी मिळाला (१९५२) ६) लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२)
७) माझी मुंबई ८) कापऱ्या चोर
९) मुक मिरवणुक १०) कलंत्री
११) बिलंदर बुडाचा १२) दुष्काळात तेरावा
१३) निवडणुकीतील घोटाळे
- नाटके:
१) इमानदार (१९५८) २) पेंग्याच लगीन ३) सुलतान
- लेखनावर आधारित चित्रपट :
१) वैजयंता (१९६१, कादंबरी वैजयंता)
२) टिका लावते मी रक्ताचा (१९६९) कादंबरी – आवडी
३) डोंगराची मैना (१९६९ कादंबरी- माकडीचा माळ)
४) १९६९ मुरली मल्हारीरायाची (कादंबरी चिखलातील कमळ)
५) १९७० वारणेचा वाघ (कादंबरी – वारणेचा वाघ)
६) १९७४ अशी ही साताऱ्याची तऱ्हा (कादंबरी – अलगुज)
७) फकिरा (कादंबरी – फकिरा)
८) २०१२ चित्र (कादंबरी – चित्रा)
- पोवाडे :
१) अमळनेरचे अमर हुतात्मे २) तेलंगणाचा संग्राम
३) नानकीन नगरापुढे ४) पंजाब दिल्लीचा दंगा
५) बंगालची हाक ६) बर्लिनचा पोवाडा
७) काळ्या बाजाराचा पोवाडा ८) महाराष्ट्राची परंपरा
९) मुंबईचा कामगार १०) स्टॅलीन ग्राडचा पोवाडा
- आण्णाभाऊ साठे साहित्य :
कादंबऱ्या – ३५ लोकनाट्य – १४
कथासंग्रह – १३ पोवाडे – १०
पटकथा – ८ नाटके -३
प्रवासवर्णन – १ उपहासात्मक – लेख
- अण्णांच्या ‘शाहिर’ या पुस्तकाला जेष्ट कम्युनिस्ट नेते एस. ए. डांगे यांनी प्रस्तावणा लिहून अण्णांचा गौरव केला.
- अण्णांच्या इमानदार नाटकास हिंदी प्रयोगासाठी कम्युनिस्ट पक्षाची संबंधीत इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन (ईप्टा) च्या बलराज सहानी पुढाकार घेतला.
- पुढे आण्णा इप्टाचे अध्यक्ष झाले.
- चिनी जणांची मुक्तीसेवा हे चिनी क्रांतीवरील व जग बदल घालुनी घाव – सांगुन गेले भिमराव हे आंबेडकरावरील गाणे – गाजले.
- मराठीतील ग्रामिण – प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णा भाऊंचे प्रभुत्व होते.
- अण्णांचे साहित्य – जगातील २७ भाषांत भाषांतरीत झाले आहे. (रशियन, फ्रेंच, पोर्तुगिज झेक इ.)
- रशियातील कलावंत अँगले अण्णाभाऊंचे मित्र होते.
- मराठीतील ग्रामिण – प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णा भाऊंचे प्रभुत्व होते.
- अण्णांचे साहित्य – जगातील २७ भाषांत भाषांतरीत झाले आहे. (रशियन, फ्रेंच, पोर्तुगिज झेक इ.)
- रशियातील कलावंत अँगले अण्णाभाऊंचे मित्र होते.
- प्रमोद महाजनांनी महाराष्ट्राचे संत असा त्यांचा गौरव केला.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents