पंडिता रमाबाई यांच्या बद्दल संपूर्ण माहिती (जन्म : १८५८ – मृत्यू : १९२२)
(जन्म : १८५८ - मृत्यू : १९२२)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
पंडिता रमाबाई यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १८५८ – मृत्यू : १९२२)
(२३ एप्रिल १८५८ – ५ एप्रिल १९२२). स्त्रियांच्या-विशेषतः परित्यक्त्या, पतिता व विधवांच्या-सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेली महाराष्ट्रीय विदुषी. रमा डोंगरे, पंडिता रमाबाई सरस्वती, रमाबाई डोंगरे, मेधावी, मेरी रमाबाई अशा स्थितंतरातून अतिशय खडतर आयुष्य जगलेली पंडिता रमाबाई सरस्वती बनली आणि स्त्री शिक्षणाची दीपस्तंभ ठरली.
नाव: रमा अनंतशास्त्री डोंगरे
जन्म : २३ एप्रिल १८५८
ठिकाण : गंगामुळ- कर्नाटक
वडील: अनंतशास्त्री डोंगरे
आई : लक्ष्मीबाई (आंबाबाई)
शिक्षण : कोलकाता विद्यपीठातून
भाषा : संस्कृत, मराठी, कन्नड, गुजाराती, बंगाली, हिंदी, तुळू, हिब्रू, इंग्रजी
पतीचे नाव : बिपीन बिहारीदास मेधावी
मुलगी : मनोरमा
- रमाबाईच्या आई-वडिलांचा मृत्यू.
- बंधू श्रीनिवासशास्त्री यांच्यासह प्रवास करीत त्या कलकत्याला आल्या.
- १८७५ कोलकत्याच्या सिनेट हॉलमध्ये रमाबाईंना पंडिता व सरस्वती या पदव्या देण्यात आल्या.
- १८७५ बंगाली स्त्रियांनाही त्यांना भारतवर्षीय स्त्रियांचे भुषण म्हणून मानपत्र दिले.
- १८८० बंधू श्रीनिवासशास्त्रींचा मृत्यू.
- १३ ऑक्टोबर १८८० बिपीन बिहारीदास मेधावी यांच्याशी विवाह (शुद्र व्यक्ती, एम. ए. लॉ ग्रज्युएट)
- १८८२ पतीचा मृत्यू
- १८८२ आर्य महिला समाजाची स्थापना (पुणे)
नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इ. ठिकाणी या आर्य महिला समाजाची स्थापना केली.
- ३ फेब्रुवारी १८८२ हंटर आयोगापुढे साक्ष दिली. रमाबाई इंग्लंडला गेल्या.
- २९ सप्टेंबर १८८३ इंग्लंडमधील वॉटिज येथील चर्चमध्ये ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.
- १८८७ रमाबाई असोसिएशन संस्था स्थापन केली.
- ६ मार्च १८८६ आनंदीबाई जोशी यांच्या ६ मार्च १८८६ रोजी होणाऱ्या पदवीदान समारंभास हजर राहता यावे म्हणुन त्या फेब्रुवारी १८८६ मध्ये अमेरिकेस गेल्या.
- १८८७ द हाय कास्ट हिंदू वुमन (पुस्तक) (अमेरिकेतील वास्तव्यात हिंदू बालविधवांच्या समस्यांवर आधारित)
- १८८२ स्त्री धर्मनिती
- १८८६ युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवासवृत्त (पुस्तक)
- ९ मार्च १८८९ शारदा सदन (मुंबई) – विधवा व अनाथ स्त्रियांसाठी.
- १८९० शारदा सदनचे पुण्यात स्थलांतर करण्यात आले.
- २४ सप्टेंबर १८९८ मुक्तिसदन (केडगाव)
मुक्तिसदनात निरक्षित विधवा स्त्रियांसाठी कृपासदन, प्रीतिसदन, शारदासदन, शांतीसदन, बातमीसदन, सदानंद सदन
इ. वेगवेगळे गट करण्यात आले.
- १८९९ कृपासदन (केडगाव)
- १९०७ माझी साक्ष (इंग्रजी आत्मवृत्त)
- १९०८ हिब्रु भाषेचे व्याकरण.
- १९१२ नवा करार (पुस्तक)
- १९१३ बायबलचे मराठी भाषांतर, प्रभू यशू चरित्र
- १९१७ भविष्यकथा (पुस्तक)
- मुक्ति प्रेअर बिल (त्रैमासिक)
- फॅमिन एक्सपिरीअन्स इन इंडिया
- अ. टेस्टम (पुस्तक)
- १९१९ कैसर-ई-हिंद ही पदवी व सुवर्णपदक
- १९२१ मनोरमाचा मृत्यू
- ५ एप्रिल १९२२ – पंडिता रमाबाईचा मृत्यू (पुणे)
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents