उमाजी दादोजी नाईक यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १७९१ - मृत्यू : १८३४)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
उमाजी दादोजी नाईक यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
नाव : उमाजी दादोजी नाईक (खोमणे)
जन्म : ७ सप्टेंबर १७९१ (भिवंडी, पुणे)
मृत्यू : ३ फेब्रुवारी १८३४ (खडकमाळ आळी, पुणे)
वडील : दादोजी खोमणे (नाईक)
आई : लक्ष्मीबाई
- महाराष्ट्राच्या इतिहासात महापराक्रमी यौद्ध्यांच्या नामावलीत आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा पराक्रम लक्षवेधून घेतो.
- लढवय्य क्रांतीकारक आणि प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून त्यांचा पराक्रम प्रेरणा देत राहील.
- इंग्रजाच्या सत्तेचा सूर्य क्षितिजावर उगवत असताना त्याला पायबंद घालण्याचा विडा उचलून त्यांनी क्रांतीचा लढा उभारला.
- राजे उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे 7 सप्टेंबर 1791 रोजी झाला.
- वडील दादोजी नाईक-खोमणे, आई लक्ष्मीबाई, भाऊ अमृता व कृष्णा, बहिण जिजाई, गंगू, म्हाकाळा, तुका व पार्वती असे कुटूंब.
- वयाच्या 10 व्या वर्षी कुस्तीगीर म्हणून त्यांचा लौकिक होता.
- सातारा गादीचे राजे प्रतापसिंह यांच्याकडून नसरापूरला राममंदिरात त्यांचा गौरव करण्यात आला होता.
- कुशल शिस्तप्रिय संघटक आणि धाडसी बाणा यामुळे सुरवातीला 300 च्या वर सैन्याची त्यांनी जमवा जमव केली.
- १८१८ भोर जवळील बिग गावात पहिला दरोडा.
- १८१८ एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा तुरुंगवासामध्ये लिहीणे, वाचणे शिकले.
- १८२४ उमाजीने भावुरडी इंग्रज खजिना लुटला.
- १८२६ ईजांनी उमाजी विरुद्ध पहिला जाहीरनामा काढला.
- १८२७ पुण्याचा कलेक्टर एच. डी. रॉबर्टसन यांच्याकडे खालील मागण्या केल्या.
- इंग्रजांनी अमृता रामोशी व विनोबा यांना मुक्त करावे.
- रामोशांची परंपरागत वतने परत करावीत.
- इंग्रजांनी उमाजीला कैद करून उमाजीकडे पुणे व सातारा भागात शांतता टिकवण्याची जबाबदारी उमाजीकडे सोपविण्यात आली. परंतु भोर संस्थानातील महसुलावरून संघर्ष झाला.
- १५ डिसेंबर १८३१ भोर तालुक्यातील उतरोली या गावी बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले.
- उमाजीवर देशद्रोहाचा खटला जेम्स टेलर या न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली झाला.
- ३ फेब्रुवारी १८३४ पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत ४३ व्या वर्षी फासी देण्यात आली.
- उमाजी बरोबर त्याचे साथीदार खुशाबा नाईक व बापू सोळकर यांनाही फाशी दिली.
- अशा महापुरुषाचे प्रेरणादायी स्मारक त्यांच्या जन्मगावी भिवडी येथे उभारण्याची घोषणा अनेकवेळा झाली.
- पण योग्य तो न्याय अजून राजे उमाजी नाईक यांना मिळाला नाही.
- इतिहासकारांनी त्यांना हवे ते स्थान दिले नसले तरी जनतेच्या मनात स्वातंत्र्याचे महानायक म्हणून उमाजीराजांचे स्थान अबादीत आहे.
- थरकाप उडविणा-या त्यांच्या मोहीमांच्या दंतकथा आजही लोक मोठ्या आपुलकीने सांगत असतात.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents